05/08/2023
३ ऑगस्ट २०२३ रोजी Women's Reforms साठी चा charity कार्यक्रम अतिशय शिस्त आणि नियोजनबद्ध प्रकारे कृती फाउंडेशन मार्फत जळगाव जिल्हयातील ग्रामीण भागातील बायकांसाठी पार पाडण्यात आला ..
भारतातल्या टीम ने Factory Outlet मधून शिलाई मशिन्स कार्यक्रम स्थळी उपलब्ध केल्या.
श्री प्रशांत पगारिया यांनी सामाजिक जाणीवा जपत ना नफा ना तोटा या तत्वावर अगदी बेसिक म्हणजे मुळ किमतीत या मशिन्स उपलब्ध करून दिल्या.
एकूण 8 मशिन्स चे वाटप ह्या charity कार्यक्रमात करण्यात आले.
जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव आणि शहरातील slum areas मध्ये राहणाऱ्या अतिशय गरजू आणि उत्पन्नाचे कुठलंही साधन नसलेल्या महिलांना या मशिन्स आपण दिलेल्या आहेत. यातील दोन महिला HIV positive आहेत. ह्या मशिन्स वाटप झाल्यानंतर लाभार्थीच्या घरी मशिन्स पोहचविण्या साठी 2 मालवाहतूक मिनी टेम्पोची व्यवस्था करण्यात आली होती.
भाऊसाहेब पाटील, त्यांचे जय श्रीराम ग्रुप मित्र मंडळी, राहुल पवार, राजेश पाटील, सचिन झुंजे, स्वप्नील पाटील, विक्रम पवार, विशाल गोकुळे. योगेश चव्हाण, जय गायकवाड , दीपक इंगळे, विनायक वेल्हाळ संदीप घोजगे अमोल भालेराव, राजू चव्हाण ,आनंद शिंदे, कमलेश फाठक संतोष मते, योगेश दड्डीकर ह्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भरपूर मदत केली. त्यामुळे आर्थिक निधी उपलब्ध करायला सोयीचे झाले.
ह्याच बरोबर मराठी कट्टा ऑस्ट्रेलिया चे विवेक खलाने , राजीवजी चांदुरकर व कल्लोळ धर ह्यांनी मोलाची साथ दिली .
पण सगळ्यात जास्त महत्वाचे योगदान सिनेमाच्या फ्लायर वरील दहा RSVP टीमच्या सर्व ladies नी केले. त्याबाबद्दल त्यांचे खूप आभार.
ऑस्ट्रेलियात लिवरपूल सिडनी येथे राबविलेला बाईपण भारी देवा ह्या सिनेमाच्या शो मधून झालेला नफा , तसेच ..मराठी स्वाद ऑस्ट्रेलियाचे ( MARATHI SWAD Australia)चे योगेश चव्हाण यांचे आर्थिक सहकार्य बाबत उपस्थिताना कृती फौंडेशन च्या कार्यकर्त्यांनी माहिती दिली.
महाराष्ट्रातून आपल्याला ह्या उपक्रमासाठी सर्वांचे लाडके अभिनेता, लेखक व दिग्दर्शक श्री प्रवीणजी तरडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते,
लिव्हरपूल सिडनी येथे सिनेमाच्या शो नंतर आपण सिनेमा चे Director श्री केदार शिंदे यांना ह्या charity उपक्रमाबद्दल माहिती दिली होती . त्यांनी सिनेमाच्या शो चे उत्पन्न अश्या सामाजिक उपक्रमासाठी होत असल्याचे जाणून समाधान व्यक्त केले.
PN Gadgil ह्यांनी या कामी निशुल्क हॉल उपलब्ध करून दिला.
सोमनाथ शिंपी यांनी सूत्रसंचलन केले..
चेतन निंबोळकर यांनी ऋण निर्देश व्यक्त केले..
आपल्या कोअर टीम चे अमित माळी ह्यांनी मनपुर्वक आभार व्यक्त केले.
चेतन निंबोलकर: पत्रकार
भारती काळे: NGO: Healthplus Institute.
निवेदिता ताठे :सामाजिक कार्यकर्त्या
विद्या सोनार : महिला बाल हकक संरक्षण समिती जळगाव
सोपान गणेशकर : दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगाव
सुरेश राजपूत : Welfare Department
ह्यांनी सर्वांनी उपक्रम राबवण्यात बहुमूल्य योगदान केले.
सिडनीतील मराठी लोकांना सिनेमाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनस्वी खूप आभार