myMPFS MPFS is the flag bearer of Maharashtrians in UAE. We arrange cultural events, entertainment programs and community initiatives.

श्रीरामनवमी सत्य, धर्म आणि आदर्श मूल्यांनी जीवन घडवण्याची प्रेरणा देणारा पावन दिवस आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्...
26/03/2026

श्रीरामनवमी सत्य, धर्म आणि आदर्श मूल्यांनी जीवन घडवण्याची प्रेरणा देणारा पावन दिवस आहे.

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या आदर्श जीवनातून कर्तव्यपरायणता, संयमशीलता आणि नात्यांप्रती असलेली निष्ठा यांचे धडे ज्ञात होतात...

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये

प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने आपणां सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो हीच मंगलमय प्रार्थना. 🚩🙏

आपले कृपाभिलाषी,
*महाराष्ट्र मंडळ (MPFS) दुबई*

🌿 परंपरेची ओळख, संस्कृतीचा साज – गुढी पाडवा आणि चैत्र गौरी 🌿
24/03/2026

🌿 परंपरेची ओळख, संस्कृतीचा साज – गुढी पाडवा आणि चैत्र गौरी 🌿

प्रसन्नतेचा साज घेऊन यावे नववर्ष!आपल्या जीवनात नांदावे सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!*सर्वांना गुढीपाडव्यानिमित्त मनःपू...
19/03/2026

प्रसन्नतेचा साज घेऊन यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
*सर्वांना गुढीपाडव्यानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा…*

07/03/2026
रंग, आनंद आणि प्रेमाने भरलेली होळी तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो. सर्वांना होळी पौर्णिमा निमित्त मनःपूर्वक शुभे...
02/03/2026

रंग, आनंद आणि प्रेमाने भरलेली होळी तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो. सर्वांना होळी पौर्णिमा निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !

नमस्कार 🙏🏻, सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी घरी राहून तसेच शासन व भारतीय दूतावासाच्या सूचनांचे पालन क...
01/03/2026

नमस्कार 🙏🏻,

सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी घरी राहून तसेच शासन व भारतीय दूतावासाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहूया. या संदर्भात कोणाला मदत आवश्यक असल्यास कृपया आमच्याशी जरूर संपर्क साधा. भारतीय दूतावासाने जारी केलेली सूचना (Advisory) सोबत जोडत आहोत.

काळजी घ्या. सुरक्षित रहा.

- महाराष्ट्र मंडळ (MPFS) दुबई

27/02/2026

*नमस्कार मंडळी,*
आपल्या क्रिकेटप्रेमी सदस्या सौ. रुपाली दीक्षित , ८ मार्चला येणार आहेत बॅडमिंटन आणि चमचा लिंबू खेळायला!! त्यांच्या बरोबर खेळायला कोण कोण येतय? पटापट हात ✋🏻🙋‍♀️वर करून कळवा बरं!!

चला तर भेटूया *DANUBE SPORTS WORLD, Al Meydan* मध्ये….खेळांची मनमुराद मजा लुटण्यासाठी !!

*लोकेशन लिंक*

https://maps.app.goo.gl/sdhWaZxjfs4WaRnR9

ज्यांनी अद्याप २०२६–२७ साठी सभासदत्व नूतनीकरण/नोंदणी केलेली नाही, त्यांच्यासाठी *सवलतीच्या दरात वार्षिक सभासद होण्याची आणि क्रीडा दिनाचा भाग बनण्याची ही शेवटची संधी* आहे.

चला, उत्साहाने सहभागी होऊया आणि क्रीडा दिन अविस्मरणीय बनवूया! 💃😊

*महाराष्ट मंडळ (MPFS), दुबई*

सर्वांना *मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा* !  ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मराठी कवी *विष्णू वामन शिरव...
27/02/2026

सर्वांना *मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा* ! ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध मराठी कवी *विष्णू वामन शिरवाडकर* म्हणजेच *कुसुमाग्रज* यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अमूल्य योगदान लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाने २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून घोषित केला आहे.

आपल्या मंडळातर्फे सुद्धा नुकताच मराठी भाषा गौरव दिन दणक्यात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ मंडळाच्या mympfs या इंस्टाग्राम आणि फेसबुक हॅन्डलवर उपलब्ध आहेत.
www.facebook.com/mympfs
www.instagram.com/mympfs

थोर भारतीय  स्वातंत्र्यसेनानी   , नाटककार ,  राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक . तसेच  हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद...
26/02/2026

थोर भारतीय स्वातंत्र्यसेनानी , नाटककार , राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक . तसेच हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते.
श्री. विनायक दामोदर सावरकर यांची दि. २६ फेब्रुवारी, २०२६ रोजी ६० वी पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांना अभिवादन व त्यांच्या स्मृतींना उजाळा. .🙏

25/02/2026

*नमस्कार मंडळी,*
आपल्या सदस्या सौ. मुग्धा, ८ मार्चला येणार आहेत फक्त खेळाची मजा लुटायला!! शाळेत शिक्षिका म्हणून अशा खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करणे ते स्वतः खेळाडू म्हणून खेळांचा आनंद घेणे.. त्यांच्या ह्या प्रवासात सामील व्हायला अजून कोण कोण येतंय, त्यांनी या संदेशावर 👍🏻 नक्की द्या!!

चला तर भेटूया *DANUBE SPORTS WORLD, Al Meydan* मध्ये….खेळांचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी!!

*लोकेशन लिंक*

https://maps.app.goo.gl/sdhWaZxjfs4WaRnR9

ज्यांनी अद्याप २०२६–२७ साठी सभासदत्व नूतनीकरण/नोंदणी केलेली नाही, त्यांच्यासाठी *सवलतीच्या दरात वार्षिक सभासद होण्याची आणि क्रीडा दिनाचा भाग बनण्याची ही शेवटची संधी* आहे.

चला, उत्साहाने सहभागी होऊया आणि क्रीडा दिन अविस्मरणीय बनवूया! 💃😊

*महाराष्ट मंडळ (MPFS), दुबई*

Address

Dubai

Alerts

Be the first to know and let us send you an email when myMPFS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share