19/05/2024
सर्वाँना सप्रेम नमस्कार ,🙏
प्रिय सन्माननीय युवा राष्ट्र परिषदेचे सर्व सदस्यगण , सर्व प्रथम आपल्या सर्वांचे आभार व अभिनंदन करतो. गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या परिषदेचे मार्गदर्शक तथा सहसंस्थापक मा. अक्षय जी मेहरे भारतीय हे देशातील सर्वात मोठी आणि महत्वाची निवडणूक ही लोकसभा आणि त्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून रिंगणात होते ही आपल्या सर्वांनसाठी फार अभिमानाची बाब आहे.त्याचं धाडस बघून विविध स्तरावर त्यांच कौतुक सुद्धा करण्यात आले,त्या करीता त्यांना आपण दिलेला विश्वास,साथ,समर्थन हे अनमोल तथा बळ देणार होत आणि पुढेही राहील,असा विश्वास आहे.जेणे करून देशाला एक तरुण नेतृत्व अक्षय जी रूपाने लाभेल. आपण आपल्या भागातून भविष्यात देशाच्या राजकीय ,सामाजिक आर्थिक शैक्षणिक जडणघडणीत मोलाचा वाटा देणार यात शंका नाही. उज्वल, संपन्न व विकसित राष्ट्र विश्वगुरूच्या रूपाने भारत देश ओळखला जाईल. या करीता आज देशात महत्वाचा घटक म्हणजे "युवा" असून तो देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी तत्पर असला पाहिजे, एकंदरीत सांगायचं झाल्यास आज त्याची गरज आहे. आणि हा बदल आपल्या भागातून आपण करतो आहे यात तुमचा सहभाग हा आशादायी वाटचाल सहकार्य, समर्थनाच्या रूपाने दिसून आले आणि पुढेही राहील .... पुनश्च एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार
जय हिंद 🇮🇳जय भारत🙏🙏
___'आपलाच __
राजेंद्र माकोडे भारतीय
(अध्यक्ष युवा महाराष्ट्र परिषद)