21/10/2025
*विश्व मराठी परिवार संकेत स्थळाचे* *वेबसाईटचे उद्घाटन* 🌹
https://vishwamarathiparivar.com/
लक्ष्मीपूजनाला 2024 रोजी " विश्व मराठी परिवाराची " अनौपचारिक सुरुवात झाली . आज 21 ऑक्टोबर 2025, लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर तिथीनुसार पहिले वर्ष विश्व मराठी परिवाराला पूर्ण झाले आहे !! मराठी गुरु वाय पी बाबा यांच्या प्रेरणेतून या परिवाराचे स्थापना झाली आणि महाराष्ट्र, भारत व जगभरातील अनेक लोक याच्याशी जोडले गेले आणि जात आहेत.
🌹
आज लक्ष्मीपूजनाच्या शुभप्रसंगी विश्व मराठी परिवाराच्या वेबसाईटचे संकेत स्थळाचे उद्घाटन झाले. डॉ उन्मेष कुलकर्णी ( भोसला मिलिटरी कॉलेजचे माजी प्राचार्य, संस्थाचालक आणि प्रसिद्ध लेखक ) यांच्या हस्ते मराठीच्या वैश्विक घरी हे उद्घाटन झाले. या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. विश्व मराठी परिवार हा जगभरात एकत्र होत आहे. " अवघे विश्वची माझे घर " हा संदेश यातून प्रचारीत होत आहे. या संकेत स्थळाद्वारे मराठी संस्कृती आणि सभ्यता यांचे सत्य, सत्व, सत्व, तत्त्व वैश्विक स्तरावर अभिव्यक्त होत आहे.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷