साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठान, संगमनेर

  • Home
  • India
  • Sangamner
  • साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठान, संगमनेर

साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठान, संगमनेर स्वातंत्र्यसैनिक, श्रमिक, कष्टकरी, आद?

अदिवासी, कष्टकरी श्रमिकांचे नेते साथी भास्करराव दुर्वे नाना जयंती निमित्ताने साथी भास्करराव दुर्वे नाना ग्रामीण बिगरशेती...
29/04/2026

अदिवासी, कष्टकरी श्रमिकांचे नेते साथी भास्करराव दुर्वे नाना जयंती निमित्ताने साथी भास्करराव दुर्वे नाना ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था घुलेवाडी येथे शहीद कॉ.गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वितरण करण्यात आले.

थोर स्वातंत्र्य सैनिक साथी भास्करराव दुर्वे नाना यांची 29 एप्रिल रोजी जयंती. भास्करराव दुर्वे नाना म्हणजे संगमनेर अकोले ...
29/04/2026

थोर स्वातंत्र्य सैनिक साथी भास्करराव दुर्वे नाना यांची 29 एप्रिल रोजी जयंती.
भास्करराव दुर्वे नाना म्हणजे संगमनेर अकोले परिसराला अभिमान वाटावा असा इतिहास निर्माण करून गेलेलं असामान्य व्यक्तिमत्व.
या परिसरातल्या सर्वसामान्य माणसांना, शेतमजूर, शेतकऱ्यांना विडी कामगार, डोंगरदऱ्यातील आदिवासींना, धरणग्रस्तांना एकूणच सर्व वंचित शोषित व त्याचबरोबर समाजातील विविध प्रवाहातील माणसांना बरोबर घेऊन दुर्वे नानांनी अतुलनीय कामगिरी केली.
भारत देश स्वातंत्र्य व्हावा यासाठी ऐन उमेदीच्या काळात सर्वस्व झोकून दिले ,
ब्रिटिशांच्या विरोधात तीव्र लढा केला तुरुंगवास पत्करला.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे स्वातंत्र्य सर्व गोरगरीब, कष्टकरी, दलित, आदिवासी, कामगार, शेतमजूर, शेतकरी या सर्वांसाठीच सन्मानाने व समतेने, आनंदाने - गुण्यागोविंद्याने जगण्याचं वास्तव यासाठी
नानांनी आयुष्यभर अपार कष्ट घेतले.
नानांचे जीवन हे केवळ आणि केवळ समाजासाठी समर्पित असे जीवन होते.
भास्करराव दुर्वे नाना यांना जयंती निमित्ताने अभिवादन करत असताना,
त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा यासाठी आपणही प्रामाणिकपणे कटिबद्ध होऊन प्रयत्न करुयात.

संविधान संवाद अभियान 2025
15/12/2025

संविधान संवाद अभियान 2025

15/12/2025
स्वातंत्र्य सैनिक साथी भास्करराव दुर्वे नाना स्मृतीदिन रानकवी तुकाराम धांडे यांच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम
13/12/2025

स्वातंत्र्य सैनिक साथी भास्करराव दुर्वे नाना स्मृतीदिन रानकवी तुकाराम धांडे यांच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम

13/12/2025
संविधान गणराज्य महोत्सव २०२५अमृतेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, संगमनेर खुर्द चंदनेश्वर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्या...
26/11/2025

संविधान गणराज्य महोत्सव २०२५
अमृतेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, संगमनेर खुर्द
चंदनेश्वर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, चंदनापुरी

समाजवादी समर्पित कार्यकर्ता साथी भाऊराव बळवंत शिरसाठ वय 102मुक्काम पोस्ट कोल्हार खुर्द तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर ...
21/11/2025

समाजवादी समर्पित कार्यकर्ता साथी भाऊराव बळवंत शिरसाठ
वय 102
मुक्काम पोस्ट कोल्हार खुर्द तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर

राजा अवसक माजी कार्याध्यक्ष राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र

पूर्वीचा अहमदनगर जिल्हा हा कम्युनिस्ट व समाजवादी चळवळीचा बालेकिल्ला होता भौगोलिक दृष्ट्या उत्तरेकडचा मुळा प्रवरेच्या खोऱ्याचा काहीचा समृद्ध भाग तर दक्षिणेला या उलट मराठवाड्याला लागून असलेला कडकडीत दुष्काळाचा पट्टा अशा प्रकारचे नैसर्गिक वातावरण असलेल्या सततच्या पाणी टंचाईने ग्रासलेल्या व मूलभूत साधनांची वानवा असलेल्या दुष्काळी म्हणावे अशा प्रदेशात परिस्थितीवर मात करायला निघालेल्या कणखर माणसांनी जशी संघर्षाची वाट धरली तशीच वैचारिक आघाडीवर स्वतःला समृद्ध करण्यासाठी कम्युनिस्ट व समाजवादी विचारांची कास धरली गोदावरी प्रवरा मुळा खोऱ्याच्या 50 च्या दशकात सोमय्या डहाणूकर यांचे खाजगी साखर कारखाने सुरू झाले चितळीला डीसलरी सुरू झाली उसाची उपलब्धता व्हावी म्हणून शेती महामंडळाच्या निर्मितीसाठी शेतकऱ्याच्या जमिनी संपादित करण्यात आल्या काही प्रमाणात पाठ पाण्याची व्यवस्था करण्यात आली कोपरगाव श्रीरामपूर भागात साखरवाडी टिळक नगर पुणतांबा चांगदेव नगर साखर कारखान्याची धुराडी धुरकु लागली काही प्रमाणात रोजगार तयार होऊन हाताला काम मिळू लागले माणूस जरा निवांत झाला की विचार करू लागतो वैचारिक चळवळीचा संबंध आल्यामुळे लोक समष्टी च्या अंगाने स्वतःचा विचार उन्नत करू लागले साथी गंगाधर ओगले, साथी किशोर पवार साथी सारंगधर पवार साथी गंगाधर मामा गवारे या सर्व साथींनी सर्वसामान्य माणसांच्या हिताचा विचार पुढे नेण्यासाठी कामगार संघटना उभारल्या सर्व दूर समाजवादी विचाराचे कार्यकर्ते तयार झाले राष्ट्रसेवा दलाने शिबिर कलापथक या माध्यमातून लोकशाही समाजवादी धर्मनिरपेक्ष विचारांची पेरणी केली चळवळ आंदोलन मोर्चा सभा याद्वारे कार्यकर्त्यांच्या मनाची मशागत केली अहमदनगर जिल्हा स्वातंत्र्य आंदोलनात अग्रेसर तो यामुळेच याशिवाय गोवा मुक्ती लढ्यात सर्वाधिक लोक वैचारिक कार्यकर्ते पण निभावण्यासाठी सहभागी झाले होते
साथी भाऊराव बळवंत शिरसाट हे स्वातंत्र्य सेनानी अच्युतराव पटवर्धन यांच्या विचारांनी भारवलेले व्यक्तिमत्व स्वातंत्र सैनिक साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या सानिध्यात आले परिस्थिती बेताचीच परंतु विचारनिष्ठा जाज्वल्य स्वाभिमानी बाणा हा स्थायीभाव मोडेल पण वाकणार नाही ही नीडरवृत्ती परिस्थिती फाटकी आपल्या शिवणकामाच्या कौशल्यातून प्रपंच उभा करताना कमाईतला काही भाग वाचन प्रवास यासाठी चळवळीला देण्याचे दातृत्व भाऊराव बळवंत बाबांनी आयुष्यभर जपले
माजी केंद्रीय शेती राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या शेत मळ्यावर सत्याग्रह करताना भाऊराव शिरसाट बाबांचे दाणेदार नेतृत्वाचा कस लागला तुरुंगवा सण करावा लागला आपल्या सहकारी समाजवादी साथीसह हाडकी हाडुकीच्या वतनाच्या जमिनीचा लढा निकराने लढला परिसरात शोषित गरीब गांजलेल्या माणसांचे बाबा आवाज बनले आदिवासी दलित माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढताना प्रस्थापित शक्तीला मुजोर होऊ दिले नाही
साथी भाऊराव बळवंत शिरसाट या सामान्य बेताची परिस्थिती व अल्पशिक्षण असलेल्या फाटक्या माणसांकडे ही नेतृत्वाची धमक येते कुठून यांचा शोध आजच्या फ्लेक्स बोर्ड वर जन्मलेल्या तथाकथित समाजसेवक बिरुद लावणाऱ्या लाभार्थी पोटार्थी पिल्लावळीने घ्यायलाच हवा कार्यकर्ता घडतो मनन चिंतन लोक सहभाग संपर्क व लढ्यातून शिरसाट बाबा यांनी गोवा मुक्तीच्या लढ्यात सीमेवरून माघारी यावे लागले ही हुरहुर त्यांच्या मनात कायम होती याचे कारण हे कृतिशील कार्यकर्ते पण त्यांना कायम जपले आपल्या रोजंदारीचा काही भाग पुस्तक खरेदीवर खर्च करताना परिस्थिती त्यांना कधी आडवी आली नाही.
भाऊराव बळवंत शिरसाट बाबा वयपरत्वे थकले परंतु सेवाभाव थांबला नाही स्वामी समर्थ मंदिर कोल्हार खुर्द ची जबाबदारी त्यांनी घेतली. मूलतः निर्मळ निरलस व स्वच्छ असलेल्या बाबांनी ती जबाबदारी निरपेक्ष भावनेने व प्रामाणिकपणे पार पाडली. सन 2010 रोजी आम्ही साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठान संगमनेर च्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेला पन्नास वर्षे झाली म्हणून संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सहभागी झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील 75 समाजवादी कम्युनिस्ट व आरपीआय कार्यकर्त्यांचा ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भाई एन डी पाटील यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार केला होता त्या कार्यक्रमात साथी भाऊराव बळवंत शिरसाठ यांचाही संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सहभाग घेतल्याबद्दल भव्य कार्यक्रमात सत्कार केला होता त्याही कार्यक्रमाला बाबा आले होते ते आपल्याकडील वाचून झालेली पुस्तके घेऊन त्यानंतर ते संगमनेरला आले नाही अधून मधून आम्हीच कोल्हार ला जाऊन भेटत असू
काही दिवसापूर्वी भल्या सकाळी शिरसाट बाबांच्या नात सुनेचा सोनालीताई चा फोन आला बाबा खूपच थकले आहेत काहीच खात नाहीत स्वातंत्र्यसैनिक दुर्वे नानांच्या आठवणीने सारखे रडत आहेत तुम्ही ताबडतोब या मी साथी श्रीनिवास पगडाल साथी चंद्रकांत एनगंदुल व रजत सह कार्यकर्ते त्वरित कोल्हार ला गेलो शिरसाट बाबा बाजेवर झोपलेले होते सुनबाई ने आवाज दिला आमची चाहूल लागताच सावरून उठून बसले सुनबाईला फर्मान सोडले ते कपाट उघड त्यातला एक डबा व काही पुस्तके यांना देऊन टाक आम्ही बाबांची समजूत काढली अजिबात जेवत नसलेले बाबा पोटभर जेवले सुट्ट्या पैशांचा डबा जो शिरसाट बाबांनी दुर्वे नानांच्या औषध उपचारासाठी ठेवला होता तो आमच्याकडे दिला 450 रुपयांच्या नाण्यांनी भरलेला डबा ही कार्यकर्त्याच्या कृतज्ञतेची आपल्या आदर्शा प्रति असलेली समर्पित भावना होती
साथी भाऊराव बळवंत शिरसाट हे कृतार्थ जीवनाचे व समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून कायम स्मरणात राहतील.
राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र व समाजवादी परिवार संगमनेर यांच्या वतीने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन जय हिंद

वक्तृत्व स्पर्धा 2025
16/08/2025

वक्तृत्व स्पर्धा 2025

Address

Https://maps. App. Goo. Gl/QK1E4CiJjDTakVVX 8
Sangamner
422605

Opening Hours

Monday 7am - 10pm
Tuesday 7am - 10pm
Wednesday 7am - 9pm
Thursday 7am - 9pm
Friday 7am - 9pm
Saturday 7am - 9pm
Sunday 7am - 9pm

Telephone

+917038265265

Alerts

Be the first to know and let us send you an email when साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठान, संगमनेर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठान, संगमनेर:

Share