एक मित्र, एक वृक्ष

Call Contact the organization

एक मित्र, एक वृक्ष Tree Plantation

09/08/2026

"आईचं झाड" संकल्पनेतून वृक्षारोपण...

07/08/2026

#आईचं_झाड_2026
दरवर्षी प्रमाणे आईचं झाड संकल्पनेत आलेल्या वृक्षांचे रोपण करण्यात आले, या मध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुलिंब, करंज, शिसम, ताम्हण, बकुळ, बुच, या प्रकाराची झाडे लावण्यात आली, वृक्षारोपणासाठी, स्वामी विवेकानंद हायस्कूल आंबेगाव, श्री शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल, व धनाजी शेळके फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते, विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे झाडे लावली, चराऊ जनावरांपासून संरक्षणासाठी प्रत्येक झाडाला ट्री गार्ड लावण्यात आले, या संकल्पनेत दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रातून विविध शहरातून गावातून लोकांचा सहभाग असतो. सहभागी सर्व वृक्ष प्रेमींनी विश्वासाने झाडे दिली त्या सर्व वृक्षप्रेमींचे आभार व धन्यवाद..

For future...
06/08/2026

For future...

04/08/2026

आम्ही विसरलो नाही...
आपल्या एक मित्र एक वृक्ष ग्रुपच्या जेष्ठ सदस्या स्व. वैशालीताई हेरलेकर यांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले, ग्रुपला मार्गदर्शन मिळत असे, त्या नेहमी ग्रुपला सूचना करत असत, त्या नेहमी म्हणत असतात झाडे प्रत्येक जण देतात पण झाडांच्या झाडांच्या संगोपनाला खूप खर्च येतो त्या नेहमीच झाडांच्या संगोपनासाठी आर्थिक मदत पाठवत, त्यांनी मागे एकदा सूचना केली होती की करवंदाची झाडे खूप कमी झाले आहेत आपल्या ग्रुपने झाडे लावली पाहिजे त्यांच्या सूचनेप्रमाणे रोपही मी तयार केली होती पण लावली नव्हती, आज ही रोपे तशीच आहेत नक्कीच त्यांच्या आठवणीत ते लावले जातील. आज वैशालीताईंच्या स्मरणार्थ एक बकुळीचे झाड लावले आहे. नक्कीच हे झाड त्यांनी ग्रुप साठी दिलेल्या योगदानाची आठवण आम्हाला नेहमी करून देईल, मी वैशाली ताईंना ग्रुपच्या वतीने विनम्र अभिवादन करतो...

03/08/2026

"पक्ष्यांना राहायला घर खायला अन्न" मुख्य उद्देश सफल...

29/07/2026

संघर्षातून जंगल....

27/07/2026

जिल्हा परिषद आदर्श शाळा विठ्ठल वाडी, तालुका-दौंड शाळेत "एक मित्र एक वृक्ष ग्रुपच्या वतीने 100 देशी रोपांचे वाटप करण्यात आले, त्या मध्ये प्रामुख्याने चिंच, बकुळ, जांभूळ, मोह, आवळा या प्रकाराची रोपे होती, सदर रोपे ग्रुप सदस्य अभयजी चौधरी यांनी दिली आहेत, सदर रोपे दिल्या बद्दल अभयजी आपले आभार, विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपणाची आवड निर्माण व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ग्रुपच्या माध्यमातून शाळेमध्ये वृक्षारोपण करणे विद्यार्थ्यांना रोपे देऊन त्याचे रोपण करून संगोपन करून घेणे यासाठी नेहमीच शाळेचे शिक्षक व आपल्या ग्रुपचे सदस्य युवराज घोगरे सर यासाठी प्रयत्नशील असतात त्यांचे ग्रुपच्या वतीने आभार...

🌳🌳🌳🌳

एखाद्या वृक्षप्रेमीसाठी झाडांना पाणी ही बाब खूप मोठी असते, काल आपण साकारलेल्या प्रोजेक्टला वृक्षप्रेमी पैलवान उमेश रणदिव...
15/07/2026

एखाद्या वृक्षप्रेमीसाठी झाडांना पाणी ही बाब खूप मोठी असते, काल आपण साकारलेल्या प्रोजेक्टला वृक्षप्रेमी पैलवान उमेश रणदिवे यांनी भेट दिली, नव्याने आपण लावलेल्या झाडांना अजून ठिबक केले नव्हते आणि पाऊस पण लांबला झाडांना पाण्याची गरज होती, बदलीने पाणी देत असताना उमेश झाडाना पाणी देऊ लागला आणि हीच खरी ओळख एक वृक्षप्रेमीची असते. पै उमेश यांच्या रांजणगाव मध्ये आपण आईचं बन साकारलेले आहे. आणि तेथील सगळी झाडे खूप छान वाढली आहेत.

12/07/2026

आज "एक मित्र एक वृक्ष" ग्रुपच्या वतीने एक नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत फक्त पक्षांना उन्हाळ्यात नैसर्गिक अन्न मिळावे या साठी काटेसावर, पळस आणि पांगारा या तीन प्रकारच्या 70 वृक्षाचे रोपण करण्यात आले, ऐन उन्हाळ्याच्या दिवसात या वृक्षांना लाल व नारंगी फुले येतात आणि या फुलांमधून मकरंद घेण्यासाठी साधारणता परिसरातील 50 ते 60 प्रकारचे पक्षी या फुलांवर येतात तसेच भुंगे, मधमाश्या या सर्वांसाठी उपयोगी असणाऱ्या वृक्षांचा नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट करण्यात आला, यावेळी श्री शिवाजीराव जेधे इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राध्यापिका तापकीर मॅडम, नीता टेंगले मॅडम, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी सहभागी झाले होते, यासाठी ग्रुप सदस्यांनी झाडे दिली त्या सर्व सदस्यांचे धन्यवाद..

🌳🌳🌳🌳

Address

Pune
412203

Telephone

+919890037777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when एक मित्र, एक वृक्ष posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to एक मित्र, एक वृक्ष:

Shortcuts

Share