जाणता युवा फौंडेशन Janata Yuva Foundation

  • Home
  • India
  • Pune
  • जाणता युवा फौंडेशन Janata Yuva Foundation

जाणता युवा फौंडेशन Janata Yuva Foundation NGO

26/01/2026
26/12/2025

िंद 🇮🇳
िवराय

स्वराज्यभूमी तोरणा आणि राजगड या दोन्हीच्या कुशीत वसलेले आणि पुण्यापासून 3 तास दूर पण निसर्गाशी एकजूट असलेले गाव म्हणजे #खोपडेवाडी(जोरकरवाडी).

याच गावातून आपले सहकारी सचिन पिलावरे आणि सर्व शिक्षक असेच ग्रामस्थ यांच्यामार्फत शाळेला #रंगकाम करण्याची विनंती आपल्या जाणता युवा फाऊंडेशन कडे करण्यात आली.

शाळेची अवस्था पाहून सर्वांनी लगेच या कार्यासाठी होकार दिला आणि लगेचच #विभुते सर, ओंकार आर्ट्स, नसरापूर यांना जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्यांनीं ती दोन दिवसात मोहीम फत्तेसुधा केली.

शाळेला फक्त सामान्य रंगकाम नाही तरी त्यांनी पूर्ण #शाळा अक्षरशः #बोलकी केली. नवीन शाळा पाहून #मुले खूप उत्साहित झाली आणि #आनंदाने #नाचू लागली आणि आम्हाला आपल्या कामाची पावती मिळाली.

संस्थेचे #संस्थापक उमेश शिंदे, कार्यक्रमाचे #अध्यक्ष किशोर जाधव तसेच शिक्षकवर्ग #नेवसे सर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी सर्वांचा सत्कार केला.
आम्ही सर्व मुलांची जेवणाची सोय केली होती मग काय सर्वांनी एकत्रित पंगतीचा आस्वाद घेतला.
यानंतर सर्वांनी दुर्गराज #राजगड आणि #तोरणा याचे दर्शन घेतले आणि पुढील नियोजनासाठी मेट पिलावरे येथे मुक्काम केला. , , आणि निसर्गाच्या सानिध्यात रात्री पुढील भविष्याच्या #गप्पा रंगल्या...

खरंतर हे शिवकार्यचं!

शहरामध्ये आपल्याला एवढ्या सुविधा असून नेहमी काहीतरी कमी वाटत असतं पण ही सर्व ग्रामीण भागातील मंडळी अजूनही निसर्गाशी एकरूप होऊन परिस्थितीशी झुंज देत आहेत. खूप काही शिकण्यासारखे मिळाले. गाव आणि शहर या दोन्हीची सांगड व्यवस्थित घातली की काय जादू होऊ शकते हे आम्ही जाणतो आणि तोच प्रयत्न शेवट पर्यंत करत राहू असे आश्वासन देतो.

#जाणता_युवा_फाऊंडेशन

जाणता युवा फाउंडेशनच्या वतीने पानशेत जवळील  #रुळे या गावातील मातोश्री सोनाबाई रामचंद्र देडगे विद्यालय येथील विध्यार्थ्या...
31/12/2024

जाणता युवा फाउंडेशनच्या वतीने पानशेत जवळील #रुळे या गावातील मातोश्री सोनाबाई रामचंद्र देडगे विद्यालय येथील विध्यार्थ्यांना #करियर_मार्गदर्शन_कार्यशाळा, 2 #संगणक_संच_वाटप आणि 10 विच्या सर्व विध्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी #अपेक्षित_प्रश्नसंच* देण्यात आले....
गेल्या 15 वर्षांपासून दुर्लक्षित ग्रामीण भागातील शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत त्यासाठी सहकार्य करणाऱ्या माझ्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद... शाळेतील मुख्याध्यापक सन्माननीय #नाकती सर यांनी मोलाचे सहकार्य केले.
मल्टीनॅशनल कंपनी EXL चे व्हाईस प्रेसिडंट #श्री_किशोर_जाधव सर यांनी *IT क्षेत्रातील नोकरीच्या संधी* या विषयावर मुलांना मार्गदर्शन केले तर #श्री_विरेंद्र_पडवळ सर ( #लक्ष_करियर_अकादमी) यांनी पोलीस भरती पूर्वतयारी विषयी मार्गदर्शन केले....
पुढच्या काळात जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण भागात पोलीस भरतीसाठी शिबीरे घेणार आहोत..... संस्थेच्या सर्व स्वयंसेवकांचे मनापासून आभार तुमच्या सहकार्याने असा सुंदर उपक्रम पार पडला...

सर्वांचे मनापासून आभार 🙏 #टीम_जाणता_युवा_फाउंडेशन

Address

Pune

Telephone

+919975615656

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जाणता युवा फौंडेशन Janata Yuva Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share