Swa-Roopwardhinee

Swa-Roopwardhinee Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swa-Roopwardhinee, Nonprofit Organization, Pune.

We are dedicated towards the enrichment of latent qualities of young, intelligent and capable students from the unprivileged and economically weak section of our society.

नवीन वादक, नवा जोश आणि तोच उत्साह! 🥁🚩गणेशोत्सवाच्या परंपरेत आणि वादन संस्कृतीत सहभागी होण्याची हीच वेळ!‘स्व’-रूपवर्धिनीच...
14/08/2026

नवीन वादक, नवा जोश आणि तोच उत्साह! 🥁🚩

गणेशोत्सवाच्या परंपरेत आणि वादन संस्कृतीत सहभागी होण्याची हीच वेळ!
‘स्व’-रूपवर्धिनीच्या गणेशोत्सव २०२६ साठी नवीन वादक नोंदणी सुरू आहे.

🥁 वाद्य हातात घेऊया, तालात रंगूया आणि गणरायाच्या सेवेत सहभागी होऊया!
आजच QR कोड स्कॅन करून नोंदणी पूर्ण करा.

गणपती बाप्पा मोरया! 🚩❤️

#स्वरूपवर्धिनी #गणेशोत्सव२०२६ #नवीनवादकनोंदणी #तालपथक #वाद्यपुजन गणपतीबाप्पामोरया पुणे

🥁 वाद्यपूजन व सराव शुभारंभ! 🥁गणेशोत्सवाच्या आगमनाची चाहूल लागली असून, ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहाच्या वातावरणात आपल्...
09/08/2026

🥁 वाद्यपूजन व सराव शुभारंभ! 🥁

गणेशोत्सवाच्या आगमनाची चाहूल लागली असून, ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहाच्या वातावरणात आपल्या 'स्व-रूपवर्धिनी' ढोल-ताशा पथकाचा वाद्यपूजन व सराव शुभारंभ होत आहे!
नादाची नवी अनुभूती घेण्यास आणि या उत्सवाचा भाग होण्यास नक्की या! 🙏✨

📅 दिनांक: रविवार, ९ ऑगस्ट २०२६

⏰ वेळ: सायंकाळी ६:३० वाजता

📍 स्थळ: डेम्को कंपनी, आरटीओ जवळ, पुणे.

सर्वांनी उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती! 🙌

- श्री.शुभम अशोक बिबवे
उत्सवप्रमुख, गणेशोत्सव २०२६
‘स्व’- रूपवर्धिनी

🎉 यशाचा आणखी एक अभिमानास्पद टप्पा! 🎉'स्व' - रूपवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्र लोकसेवा आयो...
29/07/2026

🎉 यशाचा आणखी एक अभिमानास्पद टप्पा! 🎉

'स्व' - रूपवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्र लोकसेवा आयोग व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये २०२६ मध्ये यश संपादन केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

तुमच्या मेहनतीला, चिकाटीला आणि समर्पणाला मनापासून सलाम! तुमचे हे यश अनेक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

स्व-रूपवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्राला तुमचा अभिमान आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 💐

"मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि सातत्य यांचा संगम म्हणजे यश!"

#स्वरूपवर्धिनी

📍 स्व-रूपवर्धिनी▫️भगिनी निवेदिता शाखा▫️🏡 ”गाव” — केवळ एक ठिकाण नाही, तर संस्कार, माणुसकी आणि आपुलकीची ओळख!🌾💛आज वारकऱ्यां...
12/07/2026

📍 स्व-रूपवर्धिनी
▫️भगिनी निवेदिता शाखा▫️

🏡 ”गाव” — केवळ एक ठिकाण नाही, तर संस्कार, माणुसकी आणि आपुलकीची ओळख!🌾💛

आज वारकऱ्यांसमोर ”गाव” या विषयावर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. 🎭✨ गावाशी असलेली नाळ, नात्यांची ऊब आणि संस्कारांची श्रीमंती यांचा सुंदर संदेश या सादरीकरणातून मांडण्यात आला. 🤝🌿

👏 वर्धिकांच्या प्रभावी अभिनयाला वारकऱ्यांनी उत्स्फूर्त दाद देत मनापासून कौतुक केले. 🙏 हा अनुभव सेवाभाव, संस्कार आणि सामाजिक जाणीव अधिक दृढ करणारा ठरला.

💛🚩

#स्वरूपवर्धिनी #भगिनीनिवेदिताशाखा #पथनाट्य #गाव #पालखीसोहळा वारकरी संस्कार माणुसकी सेवाभाव Palkhi2026

🚩 स्व-रूपवर्धिनी 🚩▫️भगिनी निवेदिता शाखा▫️🏡 ”गाव” — केवळ एक ठिकाण नाही, तर संस्कार, माणुसकी आणि आपुलकीची ओळख!🌾✨आज वारकऱ्य...
12/07/2026

🚩 स्व-रूपवर्धिनी 🚩
▫️भगिनी निवेदिता शाखा▫️

🏡 ”गाव” — केवळ एक ठिकाण नाही, तर संस्कार, माणुसकी आणि आपुलकीची ओळख!🌾✨

आज वारकऱ्यांसमोर ”गाव” या विषयावर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. गावाशी असलेली नाळ, नात्यांची ऊब आणि संस्कारांची श्रीमंती यांचा सुंदर संदेश या सादरीकरणातून देण्यात आला.

वर्धिकांच्या प्रभावी अभिनयाला वारकऱ्यांनी उत्स्फूर्त दाद देत भरभरून कौतुक केले. 👏🙏

#स्वरूपवर्धिनी #भगिनीनिवेदिताशाखा #पथनाट्य #गाव #संस्कार वारकरी पालखी माणुसकी आपुलकी

11/07/2026

🚩 ’स्व’-रूपवर्धिनी | 🦋 **बालवाडी विभाग

”लहान हात... पण सेवाभाव मात्र मोठा!” ❤️🙏

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आमच्या चिमुकल्यांनी वारकऱ्यांना पाण्याच्या बाटल्या वाटल्या, त्यांच्या सेवेत सहभागी झाले, भजने-घोषणा दिल्या आणि प्रेमाने संवाद साधला.

या छोट्याशा सेवेतून मुलांनी सेवाभाव, नम्रता, करुणा, भक्ती आणि मानवतेचे संस्कार प्रत्यक्ष अनुभवले.

#स्वरूपवर्धिनी #बालवाडी #पालखी #सेवा #संस्कार l

यशोवार्ता'स्व' - रूपवर्धिनी संस्थेच्या स्वामी श्रद्धानंद अभ्यासिकेतील युवक कु. प्रथमेश पोकळे याची CM Fellowship (Chief M...
07/07/2026

यशोवार्ता

'स्व' - रूपवर्धिनी संस्थेच्या स्वामी श्रद्धानंद अभ्यासिकेतील युवक कु. प्रथमेश पोकळे याची CM Fellowship (Chief Minister Fellowship), Maharashtra 2026 च्या अंतिम यादीत निवड झाली आहे.

CM Fellowship (Chief Minister Fellowship), Maharashtra हा महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत प्रतिष्ठित 12 महिन्यांचा नेतृत्व व सार्वजनिक धोरण (Public Policy) कार्यक्रम आहे. यामध्ये निवड झालेल्या तरुणांना राज्य प्रशासनासोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळते.
महाराष्ट्रभरातून हजारो अर्ज येतात, पण अंतिम निवड अतिशय मर्यादित उमेदवारांचीच होते.

CM Fellowship 2026 मध्ये अंतिम निवड होणं ही साधी गोष्ट नाही. प्रथमेशच्या सातत्यपूर्ण मेहनतीचं आणि चिकाटीचं हे सुंदर फळ आहे.

प्रथमेशचा हा प्रवास समाजासाठी अर्थपूर्ण ठरो ही सदिच्छा

खूप खूप अभिनंदन! 💐
भारत माता की जय! 🇮🇳

❇️ ‘स्व’ - रूपवर्धिनी ❇️🇮🇳 युवा विभाग 🇮🇳प्रिय निर्माण / नेतृत्व शाखा युवक,(इयत्ता ११ वी ते वय वर्ष २५ पर्यंत)━━━━━━━━━━━...
27/05/2026

❇️ ‘स्व’ - रूपवर्धिनी ❇️
🇮🇳 युवा विभाग 🇮🇳

प्रिय निर्माण / नेतृत्व शाखा युवक,
(इयत्ता ११ वी ते वय वर्ष २५ पर्यंत)
━━━━━━━━━━━━━━━
*💥 युवक शिबिर २०२६-२७ 💥*
━━━━━━━━━━━━━━━
*🇮🇳 शिबिर विषय:*
✨ सजग व्यक्ती, सुजाण नागरिक ✨

स्वतःला घडवत समाजाला जोडणारा,
कर्तव्य, संस्कार आणि नेतृत्व जपणारा…
स्वतःच्या विकासातून समाजाचा विचार करणारा,
हाच खरा सजग व्यक्ती आणि सुजाण नागरिक !

🌱 ‘स्व’ घडले तर व्यक्तिमत्व उजळते,
🤝 संघटन घडले तर नेतृत्व फुलते,
🌍 सामाजिक भान जागले तर समाज बदलतो !

📚 स्व-विकासातून व्यक्तिमत्व,
🏅 संघटनातून नेतृत्व,
❤️ सामाजिक जाणिवेतून राष्ट्रनिर्मिती !

“मी बदललो तर समाज बदलेल,
समाज बदलला तर राष्ट्र घडेल !”

🌿 सजग व्यक्ती म्हणजे केवळ स्वतःपुरती मर्यादा नसते, तर समाज, पर्यावरण, संविधान आणि राष्ट्र यांच्याशी जोडलेली जबाबदारी असते !
“व्यक्तिमत्व विकासातून नेतृत्व, नेतृत्वातून संघटन, आणि संघटनातून सक्षम समाजनिर्मिती !”

“स्वतःसाठी घडणे,
संघटनेसाठी उभे राहणे,
आणि समाजासाठी झटणे —
यातूनच निर्माण होतो आदर्श भारत !”

━━━━━━━━━━━━━━━
📞 संपर्क:
🤳 सौरभ मोरे – 9325387613
(शिबिर प्रमुख)
🤳🏻 शुभम कामठे – 7820809016
(व्यवस्था प्रमुख)
━━━━━━━━━━━━━━━
🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swa-Roopwardhinee posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Swa-Roopwardhinee:

Shortcuts

Share