02/06/2018
डीजी व्हिजीट क्रमांक ६६
माननीय लायन श्री.अक्षयजी गुजराथी
प्रेसिडेंट, लायन्स क्लब ऑफ पुणे किरकी
सस्नेह नमस्कार.
२६ मे रोजी प्रांतपाल या नात्याने आपल्या क्लबला भेट देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. कॅनॉट बोट क्लब(पुणे) येथे आपण या भेटीच्या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले होते. तेथील शानदार आणि प्रसन्न वातावरणात आपल्या क्लबच्या लौकिकाला साजेसा असाच हा कार्यक्रम झाला. अचूक नियोजन ही आपल्या क्लबची खासियत असल्याचे पुन्हा एकदा या निमित्ताने अनुभवायला मिळाले. ही भेट संस्मरणीय ठरण्यासाठी आपण आणि आपल्या लायन सहका-यांनी घेतलेल्या परिश्रमांसाठी सर्वांचे कौतुक करावे तितके थोडेच होईल.
२६ मे १९६३ रोजी स्थापन झालेल्या आपल्या क्लबला समाजसेवेची तब्बल पन्नास वर्षांची सुवर्णमहोत्सवी परंपरा लाभलेली आहे. त्या परंपरेचे खरेखुरे पाईक आपण आणि आपले सर्व सहकारी शोभतात अशी भरीव कामगिरी आपण करून दाखविली आहे. आपल्या क्लबने घेतलेली गरुडझेप लक्षवेधी असल्याचे आपल्या उपक्रमांची भारदस्त यादी पाहिली कि सहजपणे कोणाच्याही ध्यानात येईल. सांघिक कामगिरीचे उत्तम उदाहरण म्हणून आपल्या क्लबचे नाव माझ्या मनावर कायमचे कोरले गेले आहे. क्लबचे प्रेसिडेंट म्हणून सर्वांना सोबत घेऊन आपण साधलेली प्रगती अन्य क्लब्जना अनुकरणीय वाटावी अशीच आहे.
या भेटीच्या वेळी आपल्या डीस्ट्रीकट च्या आयटी कमिटीचे चेअरपर्सन लायन धनंजयजी धुमाळ, कॅबीनेट सेक्रेटरी लायन रवीजी सातपुते, रिजन चेअरपर्सन (रिजन-३)लायन श्रेयसजी दीक्षित, प्रीति दिक्षित उपस्थित होते.
सुरुवातीला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मीटिंग झाली. परस्परांच्या ओळखीने या मिटींगची सुरुवात होऊन अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
लायन अक्षयजी, एका गोष्टीचा उल्लेख जरूर करावासा वाटतो. आपला संपूर्ण परिवारच लायनसमर्पित परिवार आहे. आपले पिताश्री जीएमटी चेअरपर्सन एमजेएफ लायन अजयजी गुजराथी, मातोश्री लायन मोनाजी तसेच आपल्या सुविद्य पत्नी लायन श्रुतीभाभीजी मीटिंगला हजर होत्या. आपल्या परिवाराचे योगदान अनमोल आहे. आपण स्वतः अत्यंत विनम्र स्वभावाचे आहात. आपल्या स्वभावात एक प्रकारची धडाडी आहे. तरुण रक्त किती उपक्रमशील असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले डायनॅमिक व्यक्तिमत्त्व आहे.लायनीझमच्या कार्यात सर्वांनाच रस निर्माण व्हावा यासाठी आपण अनेक महत्त्वाच्या आणि अभ्यासपूर्ण सूचना मांडल्या. त्यावर मीही माझी मते मोकळेपणाने मांडली. रिजन चेअरपर्सन लायन श्रेयसजी दीक्षित यांनीही त्यांचे विचार यावेळी सहज सुंदर शैलीत मांडले. या चर्चेचा आपल्या क्लबला भविष्यात नक्कीच उपयोग होईल अशी खात्री वाटते. बीओडी मीटिंग मध्ये अनेक विषयांवर विचारमंथन होऊन ती संपन्न झाली. त्यानंतर १० मिनिटांची विश्रांती घेण्यात आली.
नंतर जनरल बॉडी मीटिंग झाली. सुरुवातीला आपण आणि अजयभाऊंनी काही आठवणी कथन केल्या. लायन राजीवजी धालवानी यांनी माझा परिचय सर्वांना करून दिला. ट्रेझरर अशोकजी हरपलानी यांनी ट्रेझरर रिपोर्ट मुद्देसूद रीतीने आणि प्रभावीपणे सादर केला. क्लबचे प्रेसिडेंट या नात्याने आपण आयपोड च्या आधारे आपण प्रशासकीय व सेवाकार्य आदी उपक्रमांचा अहवाल उत्कृष्टपणे सादर केला. यंदाच्या वर्षी पीएसटी स्कुलींगचा अनुभव खूप उपयुक्त ठरला असे आपण सांगितले. एकूणच हे वर्ष खूप छान आणि अनुभवांची समृद्धी देणारे ठरले असे आपण सांगितले. सदस्य संख्या वाढविण्याच्या बाबतीत यावेळी सांगोपांग चर्चा झाली.
प्रांतपाल या नात्याने मनोगत व्यक्त करताना मी आपल्या क्लबने वर्षभरात केलेल्या चमकदार कामगिरीची प्रशंसा केली. आपल्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या संपूर्ण टीमचे मी कौतुक केले. त्यानंतर मी प्रश्नोत्तराचे सत्र सुरु केले. त्यास फारच छान प्रतिसाद मिळाला. खूपच मस्त वैचारिक देवाणघेवाण झाली. त्यात आपले पूज्य पिताश्री लायन अजयजी, पंज्य मातोश्री लायन मोनाजी,लायन श्रुतीवहिनी, लायन इंदिराजी पूनावाला, लायन संजयजी सहानी, लायन कैलासजी झंवर, लायन करणजी भोजवानी, आदींनी सहभाग घेतला.
कॅबीनेट ऑफिसर लायन कैलासजी झंवर यांनी रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनाचे रहस्य सांगितले. एका दिवसात रक्ताच्या ५११ पिशव्या जमा करण्यात कसे यश मिळाले याविषयी त्यांनी दिलेली माहिती खरोखर नवलाईची होती. आभारप्रदर्शनही लायन कैलासजींनीच अतिशय सुंदर शैलीत केले. त्या नंतर ‘पे अँड स्माईल’ तसेच ‘फेलोशीप’ आणि सुरुची भोजनाचा चवदार कार्यक्रम झाला. एकंदरीतच माझी ही भेट आपल्या प्रयत्नाने संस्मरणीय ठरली.
ही भेट यशस्वी होण्यासाठी आपण आणि आपल्या लायन सहका-यांनी घेतलेल्या मेहनतीसाठी सर्वांना मनोमन धन्यवाद. प्रांतपाल म्हणून आपण माझ्याविषयी दाखविलेले प्रेम आणि केलेले आदरातिथ्य मान सन्मान यासाठी मी आपला निरंतर आभारी आहे. आजवर आपल्या क्लबने केलेल्या भरीव कामगिरीसाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातील सर्व उपक्रमांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
कायम स्वरूपी प्रकल्प म्हणून आपला क्लब विविध रुपात सतत समाजसेवा करीत आहे. कोंढवा पुणे येथील कुष्ठरोग्यांच्या रुग्णालयास पिण्याच्या शुध्द पाण्याचा पुरवठा, शंकरशेठ रोड वरील धर्मादाय होमीओपॅथी रुग्णालयाचे संचालन, ससून हॉस्पिटल मधील शस्त्रक्रिया विभागास वैद्यकीय उपकरणांचे सहाय्य, खडकवासला येथील यशवंत विद्यालयास वर्गखोल्या आणि स्वच्छतागृहे निर्माण करून देणे, मदर तेरेसा अनाथ गृहास मदत तसेच महावीर मतीमंद निवासी विद्यालयास मदत ही आपल्या सेवाभावी प्रकल्पांची काही ठळक उदाहरणे आहेत. तशी संपूर्ण यादी पहिली तर ती खूपच मोठी आहे. आपल्या प्रांताला भूषण ठरणारे असे आपल्या क्लबचे कर्तृत्त्व आहे. भविष्यात अशा स्वरूपाचे आणखी कार्य आपल्या हातून होवो हीच मनोमन सदिच्छा.
आरोग्य शिक्षण समाजसेवा
हा तर आपला प्राण
सुख कसे वाटावे याची
तुम्हास पुरती जाण
कार्य आपले ‘अक्षय’ राहो
अशीच कर्तबगारी
म्हणून येते चालत कौतुक
सहज आपल्या दारी
जिथे समस्या दिसते तेथे
आपण घेता धाव
कार्याने लखलखीत होते
लायनीझमचे नाव !
जय लायनीझम
एमजेएफ लायन गिरीश मालपाणी
प्रांतपाल डीस्ट्रीकट ३२३४ डी- २