Sharada Shakti

Sharada Shakti NGO ‘Sharada Shakti Pune’ A National Movement for Women
Details about its activities
Mail at: [email protected]
Phone 020-24474295

About NGO Sharada Shakti:
Vision
Empowering woman towards:
Intellectual development
Social reformation
Cultural development
Economic independence
For creating a Developed India



Mission and Goals
To work towards Woman empowerment through science and Technology.

‘Shakti’ believes in Complimentary developmental role of Men and Women towards Nation building

22nd AGM of Shakti Shakti successfully conducted its 22nd Annual General Meeting in Pune on 14–15 November 2025.During t...
17/11/2025

22nd AGM of Shakti

Shakti successfully conducted its 22nd Annual General Meeting in Pune on 14–15 November 2025.

During the inaugural session, the annual publication Prama, focused on the theme Women in Physics, along with the Shakti Newsletter, was formally released.

The esteemed presence and guidance of *Mananeey Shivkumar ji, Adarneeya Vivaswan ji, Adarneeya Shriprasad ji, and Adarneeya Ranjana Aggarwal ji* graced with gratitude

भोंडला
05/10/2025

भोंडला

दिनांक 25 जुलै 2025 रोजी चंद्रकांत दरोडे हायस्कूल, बी एम सी सी कॉलेज जवळ येथे जागृती अभियान चा कार्यक्रम अतिशय सुंदर झाल...
05/08/2025

दिनांक 25 जुलै 2025 रोजी चंद्रकांत दरोडे हायस्कूल, बी एम सी सी कॉलेज जवळ येथे जागृती अभियान चा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. डॉ. अमृता जोगळेकर यांनी अतिशय सोप्या शब्दांमध्ये वेगवेगळी झाडं, वने, फुलपाखरे, प्राणी, पक्षी, त्यांचे अधिवास याबद्दल त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातील माहिती सांगितली. विविध फोटो दाखवले आणि मुलांना प्रश्न विचारून चर्चा घेतली. मुलांचा रिस्पॉन्स पण अतिशय छान होता. एकूण कार्यक्रम खूप रंगला. पाचवी सहावी सातवी ची शंभर मुले कार्यक्रमाला उपस्थित होती. अमृता मॅडमनी शाळेमध्ये पर्यावरण संदर्भात एक नोंदवही ठेवायला सांगितली. आसपास आढळणाऱ्या झाडं, प्राणी, पक्षी यांचे फोटो काढायला सांगितले आणि त्यांची माहिती जमवायला सांगितली. कार्यक्रमातून मुलांना हे करण्यासाठी प्रेरणा मिळाली.
हा कार्यक्रम घडवण्यासाठी डॉ. राजश्री कशाळकर मॅडम, सीमंतिनी वझे मॅडम आणि डॉ. उज्ज्वला माटे मॅडम यांचे बहुमूल्य योगदान होते. ललिता गौरी डांगे मॅडम आणि सहस्रबुद्धे मॅडम सुद्धा उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाची रंगत वाढली.

आज जागृती अभियान अंतर्गत रामचंद्र राठी विद्यालय, लॉ कॉलेज रोड येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. त्यासाठी शारदा शक्तीने ...
05/08/2025

आज जागृती अभियान अंतर्गत रामचंद्र राठी विद्यालय, लॉ कॉलेज रोड येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. त्यासाठी शारदा शक्तीने पुढाकार घेऊन शाळेला 43 रोपे दिले यातली अश्वगंधा, मेहंदी, रिठा, झेंडू, कृष्णतुळस अशी काही छोटी झाडे शाळेत लावली. तर कांचन, हिरडा, आवळा, बेहडा अशी काही मोठी वाढणारी झाडे सिम्बॉयसिस जवळच्या टेकडीवर लावण्यात आली. हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये शारदा शक्ती कार्यकर्त्या डॉ. राजश्री कशाळकर व सीमंतिनी वझे यांचा महत्त्वाचा वाटा होता. डॉ. उज्ज्वला माटे, ललिता गौरी डांगे, डॉ. मानसी देशपांडे यांचाही उत्साही सहभाग होता. यानिमित्ताने पर्यावरण गतिविधिच्या नॅशनल कार्यकर्त्या गार्गी वेर्लेकर आपल्याशी जोडल्या गेल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा पवार तसेच शिक्षिका स्वाती वेताळ यांचा मोलाचा सहभाग आपल्याला लाभला. डॉ. उज्ज्वलाताई माटे यांनी झाडे लावण्याचे महत्त्व, पर्यावरण म्हणजे काय आणि आपल्या जीवनातले पर्यावरणाचे स्थान मुलांना कळेल अशा भाषेत समजावून सांगितले. शाळेतील पाचवीच्या मुलांनी कुदळ फावडेच्या साह्याने खड्डे खोदले व झाडे लावून त्यांना पाणी घातले. शाळेतील झाडे जगवण्याची जबाबदारी शाळेने घेतली आहे. तसेच टेकडीवरची झाडे जगवण्यासाठी शाळेने वनविभागालाही संपर्क केला आहे. अशाप्रकारे जागृती अभियानचा रामचंद्र राठी विद्यालयातला पर्यावरणासंदर्भातील जागृती व वृक्षारोपण हा कार्यक्रम उत्साहाने पार पडला.

75th vigyan katta७५वा विज्ञान  कट्टा श्रावणातल्या रान भाज्या यांची छान ओळख करून दिली आहे. नक्की जॉइन व्हा. आणी आप आपल्या...
31/07/2025

75th vigyan katta
७५वा विज्ञान कट्टा

श्रावणातल्या रान भाज्या यांची छान ओळख करून दिली आहे. नक्की जॉइन व्हा. आणी आप आपल्या ग्रुप्स वर लिंक शेअर करा जास्तीत जास्ती जण जॉइन व्हा. 👌😊

सरिता विद्यालय येथील दिनांक 12 जुलै च्या कार्यक्रमाचा रिपोर्ट आणि फोटो दिनांक 12 जुलै रोजी सुंदराबाई राठी विद्यालय म्हणज...
27/07/2025

सरिता विद्यालय येथील दिनांक 12 जुलै च्या कार्यक्रमाचा रिपोर्ट आणि फोटो

दिनांक 12 जुलै रोजी सुंदराबाई राठी विद्यालय म्हणजेच सरिता विद्यालय मित्र मंडळ हॉलच्या जवळ येथे जागृती अभियान च्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला

सध्याच्या पावसाळ्याच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचा विषय प्रामुख्याने पाऊस आणि पाणी असा होता. पाऊस कसा आणि कशात मोजतात, पावसाची शेतीसाठी आवश्यकता, पावसामध्ये होणारे साथीचे रोग कोणते आणि कसे टाळता येतात, acid rain म्हणजे काय, त्याचे दुष्परिणाम कोणते इत्यादी विषयावर सीमाताई वझे आणि ललिता गौरी डांगे मॅडम यांनी छान चर्चासत्र घेतले.

तसेच गुरुपौर्णिमा नुकतीच झाल्यामुळे गुरुपौर्णिमेचे महत्त्वही थोडक्यात सांगितले निसर्ग हाच गुरु याबद्दल माहिती सांगितली आणि त्याबद्दल होमवर्क सुद्धा दिले.

मूल्य शिक्षणासाठी डॉक्टर उज्ज्वलाताई माटे यांनी साने गुरुजींची अंघोळीची गोष्ट सांगितली. साने गुरुजींना आईने दिलेली शिकवण- मनाला घाण लागू नये म्हणून पण जप. ऐकताना मुले गंभीर झाली.

मनाला घाण लागू नये म्हणजे काय, हे त्यांच्या वयाला शोभेल असे सांगितले. शाळेच्या बाहेर विक्रीला असलेला बंटा किंवा इतर गोष्टी, व्यसनामुळे काय काय होते, रोज रात्री आई-वडिला नमस्कार करणे, शुभंकरोती म्हणणे, प्रामाणिकपणे वागणे, मदत करणे इत्यादी बद्दल थोडक्यात बोललो

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर राजश्री कशाळकर मॅडम, सीमंतिनी वझे मॅडम, ललिता गौरी डांगे मॅडम, डॉ. उज्ज्वला माटे मॅडम यांचे अमूल्य योगदान होते. शाळेच्या शिक्षिका पण या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. शारदा शक्तीच्या वर्षा बक्षी मॅडम आणि धायगुडे मॅडम पण आल्यामुळे कार्यक्रमाला रंगत चढली.

Preparation for जागृती अभियान
12/07/2025

Preparation for जागृती अभियान

04/06/2025

भाग 10 - अहिल्याबाईंची धार्मिक कामे -

अहिल्याबाईंनी जागोजागी धर्मशाळा, अन्नछत्रे, पाणपोया
उभारल्या. विहिरी खोदल्या, कुंडांची उभारणी केली. त्यांनी खोदलेल्या विहिरींची रचना सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. काही विहिरींना पाण्यापर्यंत जाण्यासाठी खालपर्यंत पायऱ्या खोदल्या आहेत. काही विहिरींना पूर्णपणे टोपलीच्या आकाराचे आच्छादन बांधलेलं आहे. त्यामुळे उन्हामध्ये सुद्धा आतलं पाणी एकदम थंड राहतं आणि स्वच्छ राहत. अहिल्याबाईंनी अनेक नद्यांना घाट बांधले. घाटामुळे नदीपर्यंत व्यवस्थित जाता येऊ लागले. स्त्रियांना पाणी भरणे सुलभ होऊ लागले आणि संध्याकाळच्या वेळी नदीकाठी गार हवा खाण्यासाठी एक पर्यटन स्थळ सुद्धा आपोआप निर्माण झाले. अहिल्याबाईंनी काही देवळांना वर्षासने दिली, तिथल्या दिवाबत्तीची सोय केली, दीपमाळा बांधल्या, पूजेची सोय केली. गंगेचं पाणी देवांना मिळावं म्हणून त्यांनी कावड यात्रा सुरू केल्या. पूर्वेला जगन्नाथपुरी पासून पश्चिमेला द्वारकेपर्यंत आणि उत्तरेला केदारनाथपासून दक्षिणेला रामेश्वर पर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांची कामे विखुरली आहेत. बारा ज्योतिर्लिंग च्या ठिकाणी सुद्धा त्यांनी कामे केली आहेत. महाराष्ट्रातील घृष्णेश्वर, परळी वैजनाथ, भीमाशंकर या ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी त्यांची कामे आहेत. ज्या ज्या ठिकाणी जी जी कमतरता होती, ती ती त्यांनी पुरी केली. देवळांचा जीर्णोद्धार करताना त्यांनी असा विचार केला नाही, की हे देऊळ माझ्या राज्यात आहे का नाही. ही सर्व कामे त्यांनी आपल्या वैयक्तिक खाजगी खर्चातून केली आहेत हे आणखी विशेष. अहिल्याबाईंच्या एकूण कामांची यादी बारा हजार पर्यंत जाते. म्हणून त्या आपल्यासारख्यांच्या कवेत मावू शकत नाहीत. त्यांनी केलेलं काम अद्वितीय असंच आहे आणि म्हणून त्या पुण्यश्लोक ठरतात, लोकमाता ठरतात.

04/06/2025

लोककल्याणकारी अहिल्याबाई होळकर भाग 9 -
अहिल्याबाई या अतिशय कर्तबगार अशा प्रशासक होत्या. आपल्या राज्यामध्ये शांती, सुरक्षा, समृद्धी आणि सुबत्ता नांदण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. माळव्यांवरून वाहणाऱ्या नर्मदा नदीला मुळातच पाणी मुबलक आहे त्यातही अहिल्याबाईंनी नदीला कालवे काढले, पाट बांधले आणि प्रत्येक शेताला शेतीसाठी आणि सर्व माणसांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. "पाणी शुद्ध तर आरोग्य मस्त" हा मूलमंत्र त्यांनी जाणला होता. त्यामुळे पिण्याचे पाणी शुद्ध राहावे यासाठी पिण्याच्या पाण्याचे कालवे वेगळे असत. तर कपडे धुण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, जनावरे धुण्यासाठी असणारे पाट वेगळे असत. सांडपाणी निचरा होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असे. जागोजागी विहिरी खणून, कुंडे उभारून जल व्यवस्थापन केले जाई. आंबा, वड, पिंपळ, चिंच अशी झाडे लावून माती वाहून जाणार नाही अशी व्यवस्था केली जाई. झाडांची मुळे मातीला घट्ट धरून बसत त्यामुळे भूजल पातळी स्थिर राहण्यासाठी मदत होई. झाडांमुळे पांथस्थांना सावली मिळे आणि फळेही खाण्यास मिळत. जमीन नसलेल्या शेतकऱ्यांना झाडे लावण्यासाठी पडीक जमीन दिले जात असे शेतकऱ्याने जर वीस झाडे लावली तर त्यातील नऊ झाडाचे उत्पन्न शेतकऱ्याचे आणि 11 झाडांचे उत्पन्न सरकारचे असा नियम होता. एखाद्या वर्षी पीक कमी आले तर शेतसारा कमी केला जाई. गाई गुरांना चरण्यासाठी त्यांनी वेगळी शेते राखून ठेवली. माळवा प्रांत देशाच्या मध्यभागात येत असल्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तर दक्षिण जाणाऱ्या लोकांसाठी,व्यापाऱ्यांसाठी, यात्रेकरूंसाठी हा जायचा रस्ता होता. लोकांची यात्रा सुलभ आणि आनंददायी व्हावी आणि व्यापार वाढावा म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी रस्ते बांधले. रस्त्याच्या कडेला सावली देणारी झाडे लावली. लोकांना अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध व्हावा, सुखी समृद्ध आयुष्य जगता म्हणून त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न असत.
वेगवेगळ्या उद्योगांना व कलांना त्यांनी प्रोत्साहन दिले एका विशिष्ट प्रकारचे दगड नर्मदेच्या परिसरात भरपूर उपलब्ध असत त्याच्यातून शिल्प करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले मोरोपंतांसारखे विद्वान कवी तसेच अनंत फंदीसारखे कवी यांना त्यांनी आपल्या राज्यात बोलावून राजाश्रय दिला. एकदा एका कवीने त्यांच्या स्तुती पर काव्य लिहिल, तेव्हा त्यांनी ते सरळ नर्मदेत अर्पण केले आणि त्यांना सांगितले की माझ्याबद्दल लिहिण्याऐवजी परमेश्वराचे गुणगान गा म्हणजे तुमचं कल्याण होईल. अशा होत्या अहिल्याबाई, लोककल्याणकारी आणि तरीही अध्यात्मिक आणि विरागी !

Address

Savitribai Phule Pune University, University Road, Ganeshkhind, Pune
Pune
411007

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharada Shakti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sharada Shakti:

Share