विश्वव्यापी मानवधर्म

  • Home
  • India
  • Pune
  • विश्वव्यापी मानवधर्म

विश्वव्यापी मानवधर्म सोऽहं आत्मा स्वानंदघन। आजन्मा तो तूंची जाण॥ ऐसे संतांचे वचन। सदृढ जीवी धरावे॥

प्राचीन काळापासुन तर सध्याच्या काळापर्यंत आपल्या जीवनमानात खुपच बदल होत आले आहेत. एकीकडे खुपच विकास आणि एकीकडे सर्वसाधारण जीवनमान , पण या दोन्हीहि परिस्थितीत सुखी आणि आनंदी व्यक्ती सापडणे तसे अवघडच काम आहे. पण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 'अवघाचि संसार सुखाचा करिन। आनंदे भरिन तिन्ही लोकी।।' या ओवीनुसार आपल्या संसारात खऱ्या सुखाचा आनंद मिळविणे शक्य आहे. त्यासाठीचे प्रयत्न मात्र योग्य दिशेने हो

णे गरजेचे आहे. भरकटलेल्या, वाटा चुकलेल्या लोकांना योग्य आध्यात्मिक मार्गदर्शक मिळाल्यास आत्मिक प्रगतिबरोबरच घर, गाव आणि सारा समाज सुधारता येतो.
राहुरी तालुक्यातील ‘तमनर आखाडा’ हे एक छोटेसे खेडेगाव. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेतीच. गावातील परिस्थीती तशी जेमतेम. जमेल तेवढी शाळा करायची वाटले तर कॉलेज करायचे, अन शेवटी शेती, मजुरी, रोजंदारी सुरु करायची. तरुण पिढी तशी साधीच, पण व्यसनांची, दादागिरीची, भांडण्याची सवय असणाऱ्यांची संख्याही बरीच होती. युवकांनी एकत्र येण्यासाठी, त्यांना सन्मार्गावर आणण्यासाठी आणि त्यांच्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या योग्य ते काम करुन घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज होती, पण तेही अराजकीय व्यक्तीची. अशा सत्पुरुषाची वाट पाहणाऱ्या आखाड्याला ‘प. पु. सदगुरु श्री सुमंतबापु’ यांसारखे सद्गुरु मिळाले आणि आखाड्याच्या प्रगतीला वेगच आला.
आत्मशुद्धी व शरीरशुद्धी :
दहा वर्षापूर्वीपासून सर्वच गावात विलक्षण बदल होत गेला. आपण कोण आहोत आणि आपण काय करु शकतो हेच विसरलेल्या, रेंगाळलेल्या तरुणाला या भवसागरातुन तरून जायचा मार्ग मिळाला. हे सर्व शक्य झाले ते फक्त ‘दिनभर प्रपंच करुन केलेल्या क्षणभर नामस्मरणाने’. तमनर आखाड्यातील जवळजवळ सर्वच नागरीकांनी आपल्या स्वधर्माचा अभ्यास सुरु केला. त्यात तरुणांबरोबरच महिलांचा, बालकांचा आणि जेष्ठ नागरीकांचाही सहभाग मोठा होता. जो तो आपल्या परीने सद्गुरुंनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करु लागला. त्यातुन मन, बुद्धी, चित्त याबरोबरच शरीर शुद्ध होत गेले. प्रसन्न मनाने, एकाग्र चित्ताने काम केल्यामुळे कामात यश येवु लागले. शरीरशुद्धी होत असल्यामुळे आजार, रोग आपल्यापासुन चार हात दुर असल्याचा अनुभव बऱ्याच जणांकडून ऎकायला मिळतो.
शैक्षणिक, सामाजिक बदल :
एकमेकांबद्दलचे वादविवाद विसरून जाऊन बरेचजण स्नेहभावाने राहु लागले. तरुण मुले तर स्पर्धापरिक्षांचा एकत्र अभ्यास करु लागले. अभ्यासाठी एकमेकांची मदत करू लागले. विविध विषयावर चर्चात्मक अभ्यास फायदेशीर ठरू लागला. गेल्या काही वर्षात विविध स्पर्धापरिक्षांत बरेच जण यशस्वी झालेत. आज गावातील मुले वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीरित्या काम करताहेत. नविन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धापरिक्षांचे आयोजन करुन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तरुण नेहमीच तयार असतो. गाव शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विकासाच्या मार्गावर यशस्वीपणे वाटचाल करीत आहे.तरुणांनी एकत्र येवुन विविध सामाजिक कार्यास हातभार लावण्यास सुरुवात केली. ‘ एकमेकां साह्य करु अवघे धरु सुपंथ ’ या उक्तीनुसार मदतीचे हात दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. युवकांनी आपल्या चांगल्या वागण्याने अनेकांची मने जिंकुन घेतली. सत्संगाच्या माध्यमातुन जमा होणाऱ्या रकमेतुन गावात मागीलवर्षी युवकांनी घरोघरी जावून स्वतः खड्डे करून झाडे लावुन दिली. आज ती झाडे युवकांच्या कार्याची आठवण करुन देतात. गेल्या वर्षाअखेरीस पुन्हा घरोघरी झाडे लावण्याचा उपक्रम राबवला. आपले गाव स्वच्छ, सुंदर आणि हरीत राहावे, यासाठी युवक नेहमीच प्रयत्नशील राहीला आहे. 'वृक्षवल्लीं आम्हां सोयरिं। वनचरे।।' वृक्ष जणु आपले नातलगच आहेत, असा ध्यासच त्यांच्या मनी रुजला आहे. दोनशेपेक्षा जास्त घरी जावून स्वतः टिकाव, खोरे घेउन खड्डे करुन झाडे लावणे बोलण्याइतकीही सोपी गोष्ट नाही. गावातील शाळेतही जावुन विविध रोपे लावून दिली. या सर्व कामांसाठी युवक संघटीतपणे झटत राहीला. गावातील सर्वांना योगासने यावीत, यासाठी स्वत: आधी शिकुन मग सर्वांना शिकवायलाही सुरुवात केली. शाळेतील मुलांनाही योगासने शिकविली.
युवकांमागील प्रेरणा :
‘युवकांनो, झेप घ्या!! दिशा तुम्हाला शरण येतील’ हे विवेकानंदांचे वाक्य सत्यात उतरविण्यासाठी आजचा युवक कधीही तयार असला पाहिजे. भाषणे करुन, संघटना स्थापन करुन युवक कदाचित संघटीत होइलही, पण कायम तो संघटीतच राहील असे नाही. त्यासाठी अंतःकरण शुद्ध असणे गरजेचे आहे. एखाद्या महापुरुषाच्या नावाने युवक जमविणे सोपे असते. त्यावेळी त्या महापुरुषाच्या फक्त कर्तुत्वावर संघटना उभारली जाते, पण स्वतः काहीतरी करायला मात्र युवक कचरताना दिसतो. याला कारण ते त्याचे अंत:करण,अंर्तमन असते. जोपर्यंत ते शुद्ध होत नाही, तोपर्यंत सर्व काही व्यर्थ आहे. शुद्ध अंतःकरण आणि सात्विक विचाराशिवाय एकमेकांबाबत प्रेम, आपुलकी, स्नेह निर्मान होणे अशक्य आहे. कोणत्याही कामाची स्फुर्ति ही आतुन असावी लागते. तमनर आखाड्यातील झालेला हा बदल अखंडपणे होतच राहील, पण याचा फायदा दुसऱ्यांनाही ह्वावा म्हणून प्रयत्न चालु आहेत. सर्व काही करताना युवकांमागील प्रेरणा मात्र अखंडीतपणे राहीली. युवकांनीही आपल्या सद्गुरुंचा शब्द पाळला आणि पाळत आहेत. ‘दिनभर प्रपंच, क्षणभर नामस्मरण’ ही सद्गुरुवाणी या युवकांनी आचरणात आणली, त्यातुन कायमस्वरुपी संघटीत राह्ण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.
प. पु. सदगुरु श्री सुमन्तबापु यांचे आध्यात्मिक योगदान :
प. पु सदगुरु श्री सुमंतबापुंनी आतापर्यंन्त जी साधना केली, तपश्चर्या केली, जे आत्मज्ञान मिळविले ते दुस~यांनाही मिळावे, सर्व समाज सुखी व्हावा अशी तळमळ त्यांच्यामधे दिसुन येते. त्यासाठी प्रेमाची, आग्रहाची, कळकळीची विनंती करुन नामस्मरण करण्याचा उपदेश बापु सततच देत आले आहेत. आजच्या घडीला या जगात ऎशोआराम सोडून अगदी सर्वसामान्यांत जाउन एवढ्या तळमळनीने आध्यात्माचि खरी ओळख करुन देणारा सत्पुरुष शोधुनही सापडणार नाही. देवाचा खरा मार्ग सांगण्यासाठी गावोगाव हिंडून मानवाचे व एकन्दर जगाचे कल्याण करावे, मोक्षाचा-मुक्तिचा खराखुरा मार्ग सांगावा यापलीकडे ज्यांचे जिवनच नाही असे प. पु सदगुरु श्री सुमंतबापु हंबीर महिन्यातील २४-२५ दिवस गावोगाव प्रवचन, नामस्मरण देन्यासाठी फिरत राहतात. धागेदोरे, कर्मकांड, उपासतापास, विधि , मंत्र तंत्र यापलिकडे कुठेतरी देव असतो हिच शिकवण सद्गुरु देत असतात.
‘‘योगर्याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।। तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।’’
स्वार्थाशिवाय संघटीत होणारे युवक घडविण्याची, खरा ईश्वर, खरे आत्मज्ञान मिळवण्याची हिच वेळ आहे, फक्त गरज आहे ती सुरुवात करण्याची आणि तीही स्वतःपासूनच. आधि अंतःकरण निर्मळ करुन कार्य करुन पहा, आपल्या स्वरुपाचे ध्यान करा, ‘दिनभर प्रपंच करा, क्षणभर नामस्मरण करा’ शेवटी यश हे ओघाने येणारच, हे एका ब्रम्हवेत्त्या पुरुषाचे शब्द कधीच खोटे ठरणार नाही. ‘उठा!! जागे व्हा !!!’.

आयुष्याचे खरे गणित: श्वास आणि ध्यान​सद्गुरू बापूजींचे अनमोल विचार:​"माणसाच्या आयुष्याचे माप हे दिवस किंवा वर्षांवर ठरत न...
15/02/2026

आयुष्याचे खरे गणित: श्वास आणि ध्यान
​सद्गुरू बापूजींचे अनमोल विचार:
​"माणसाच्या आयुष्याचे माप हे दिवस किंवा वर्षांवर ठरत नसून, ते त्याने घेतलेल्या श्वासांच्या संख्येवर अवलंबून असते."
​ध्यानाचे महत्त्व:
​श्वास स्थिरता: ध्यानाच्या नियमित अभ्यासाने विखुरलेला श्वास संथ आणि स्थिर होऊ लागतो.
​आरोग्य लाभ: स्थिर श्वासामुळे शरीरातील ऊर्जेचा समतोल राखला जातो, ज्यामुळे उत्तम आरोग्य लाभते.
​दीर्घायुष्य: श्वासांची गती जितकी कमी आणि खोल असेल, तितकीच तुमची आयुष्य मर्यादा वाढत जाते.
​साधना करा, निरोगी राहा!

11/01/2026

60 seconds · Clipped by GURUDAS PACKAGING · Original video "शनिवार दि. 03/01/2026 पौर्णिमानिमित्त गुरुवर्य श्री हंबीरबापूजी यांचे प्रवचन " by Vishwavyapi Man...

28/09/2025
02/07/2025

Address

Pune
412207

Alerts

Be the first to know and let us send you an email when विश्वव्यापी मानवधर्म posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to विश्वव्यापी मानवधर्म:

Share