Sahgami Foundation

Sahgami Foundation समविचारी लोकांनी एकत्र येऊन चालवलेला उपक्रम

Gratitude..❤️Once again we want to say thanks to Dr. Krutika and Abhijeet Patil, Varsha Lokhande, Reena Vegad, Trupti Ma...
21/08/2026

Gratitude..❤️

Once again we want to say thanks to Dr. Krutika and Abhijeet Patil, Varsha Lokhande, Reena Vegad, Trupti Magdum, Rachana Pampatwar, Varsha Lokhande, Dr. Navin Dond, Payal Dond, Pushpa Dond, Mayuri Patil, Ishrat Ahmad, Ravinder Guleria, Sachin Kadam, Ashwini Bacche, Kusum Majjagi, Ratna Shindolkar for serving yummy food, donating grains and for gifting bags and stationery.

Your contribution is highly appreciated We anticipate your continued support 🙏🏻🙏🏻

- Masti ki Pathshala, Ravet
By Team Sahgami Foundation

🎓 Celebrating a Meaningful Summer Internship! 🌟We are proud to share that 12 students have successfully completed their ...
20/08/2026

🎓 Celebrating a Meaningful Summer Internship! 🌟

We are proud to share that 12 students have successfully completed their two-month Summer Internship Program at Masti Ki Pathshala.

This initiative goes beyond academics—it is about learning through experience, contributing to society, and creating meaningful impact. The purpose behind such programs is truly commendable, giving young students an opportunity to step beyond the classroom and understand the importance of community engagement and social responsibility.

A big appreciation to all 12 students for their enthusiasm, dedication, and sincere efforts throughout the internship. They have done an excellent job and demonstrated that technical knowledge combined with empathy and social commitment can make a real difference.

Wishing all the students continued success in their academic and professional journeys!
Learn. Serve. Inspire. Make a Difference. ❤️

-Team Sahgami Foundation

सायकल डोनेशन ❤️नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या शाळेत जाण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बससेवा ...
19/08/2026

सायकल डोनेशन ❤️

नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या शाळेत जाण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बससेवा उपलब्ध नसल्यामुळे दररोज पायी चालत जावे लागते. या विद्यार्थ्यांसाठी सायकल ही केवळ गरज नसून त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाची सोय आहे. ही गरज ओळखून अश्विनी बच्चे यांच्या वतीने मस्ती की पाठशाळेतील नववी व दहावीच्या ५ विद्यार्थ्यांना नवीन सायकली डोनेशन देण्यात आल्या.
या सायकलींमुळे विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास आता अधिक सोपा, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या गरजेची जाणीव ठेवून त्यांना दिलेल्या या मोलाच्या मदतीबद्दल अश्विनी बच्चे आणि परिवाराचे मनःपूर्वक आभार.
एका सायकलीची मदत म्हणजे एका विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या वाटेला मिळालेली नवी गती आहे.📚🚲✨

-टीम सहगामी फाउंडेशन

मस्ती की पाठशाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 🇮🇳🇮🇳मस्ती की पाठशाळा येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत...
15/08/2026

मस्ती की पाठशाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 🇮🇳🇮🇳

मस्ती की पाठशाळा येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपायुक्त मा. ममता शिंदे मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध परीक्षांमध्ये यश संपादन करून पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शिष्यवृत्ती. स्व. दिनेश राव रावळ यांच्या स्मरणार्थ दहावी व बारावीमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या चार विद्यार्थिनींना प्रत्येकी रुपये ३,००० रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. काजल चौहान, रेश्मा चौहान, आंचल चौहान आणि नयना बिऱ्हाळे या विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शिवाजी गवारे सर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मस्ती की पाठशाळेतील दोन गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. यंदाही या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली.
तसेच पद्मा राव यांच्या वतीने काजल चौहान या विद्यार्थिनीच्या नर्सिंग कॉलेजच्या शिक्षणासाठी लागणारी संपूर्ण फी देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. याशिवाय दहावी व बारावीमध्ये यश मिळवणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनाही त्यांच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात आली.
कीर्ती विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांना दहावीचे शिक्षण घेताना शाळा व क्लासेसला जाण्यासाठी सायकलींचे डोनेशन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी मदत मिळणार आहे.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर भाषणे सादर केली तसेच देशभक्तीपर गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.
याच कार्यक्रमात स्व. अक्षय धाडे यांच्या स्मरणार्थ येत्या २६ जानेवारी रोजी रुपये १०,००० रोख रकमेची शिष्यवृत्ती देण्याची घोषणा करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाठबळ उभे करणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. विविध मान्यवर, दाते, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आजचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाला. सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻

-टीम सहगामी फाउंडेशन
मस्ती की पाठशाळा

अनेकदा दाते आम्हाला विचारतात, "मस्ती की पाठशाळेला सध्या नेमकी कशाची गरज आहे?"सहगामी फाउंडेशनचे बँक खाते नसल्यामुळे आम्ही...
07/08/2026

अनेकदा दाते आम्हाला विचारतात, "मस्ती की पाठशाळेला सध्या नेमकी कशाची गरज आहे?"

सहगामी फाउंडेशनचे बँक खाते नसल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करत नाही. त्यामुळे त्या त्या वेळी विद्यार्थ्यांना ज्या वस्तूंची गरज असते, त्याची माहिती आम्ही दात्यांना देतो आणि ते वस्तूरूपाने मदत करतात. परंतु काही वेळा अशीही परिस्थिती असते की विद्यार्थ्यांना त्या क्षणी कोणत्याही वस्तूची गरज नसते. अशावेळी आम्ही दात्यांना एकच विनंती करतो की तुमचा मदतीचा संकल्प आमच्या नावाने राखून ठेवा. जेव्हा खरी गरज निर्माण होईल, तेव्हा आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.

असाच एक अनुभव नुकताच आला.

एप्रिल महिन्यात एका दात्यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त मदत करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. मात्र शैक्षणिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता नव्हती. म्हणून आम्ही त्यांना त्यांचा संकल्प काही काळासाठी राखून ठेवण्याची विनंती केली.

त्यावर त्यांनी अतिशय सुंदर शब्दांत उत्तर दिले,
"हे पैसे आज मी देवासमोर ठेवते. तुम्हाला जेव्हा मदतीची गरज भासेल, तेव्हा मला कळवा. त्यावेळी मी ही मदत नक्की करेन."

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आमच्या अकरावीतील तीन विद्यार्थिनींचे महाविद्यालयात प्रवेश झाले. त्यांच्या वार्षिक शुल्कासाठी, गणवेशासाठी आणि पाठ्यपुस्तकांसाठी मदतीची गरज होती. आम्ही हक्काने त्या दात्यांशी संपर्क साधला आणि त्यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ मदत केली. इतकेच नव्हे, तर नियमित अभ्यासक्रमातील पुस्तकांसोबतच विद्यार्थिनींना पोलीस भरतीच्या तयारीसाठी लागणाऱ्या पुस्तकांचीही त्यांनी व्यवस्था करून दिली.
हे सर्व करताना त्यांची एकच अट होती की त्यांचे नाव कुठेही प्रसिद्ध होता कामा नये. त्यांच्या या इच्छेचा पूर्ण आदर ठेवून आम्ही त्यांचे नाव कुठेही जाहीर केलेले नाही. मात्र अशा संवेदनशील, विश्वासू आणि निःस्वार्थी दानशूर व्यक्तीप्रती आमची मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे कर्तव्य आहे.

अशा प्रत्येक दात्यामुळे आमचा विश्वास अधिक दृढ होतो, मदत ही केवळ पैशांची नसते; ती विश्वासाची, संवेदनशीलतेची आणि योग्य वेळी दिलेल्या आधाराची असते.
आमच्या या दात्याचे मनःपूर्वक आभार! 🙏

-टीम सहगामी फाउंडेशन

नवा गणवेश, विद्यार्थ्यांची एक नवी ओळख ❤️शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची पहिली पायरी असते आणि  शाळेत विद्यार...
06/08/2026

नवा गणवेश, विद्यार्थ्यांची एक नवी ओळख ❤️

शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची पहिली पायरी असते आणि शाळेत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, समानता आणि एकतेची भावना निर्माण करण्यासाठी शालेय गणवेशाला विशेष महत्त्व आहे. गणवेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, वेळेचे पालन आणि जबाबदारीची भावना विकसित होते. शाळेबाहेरही गणवेशामुळे विद्यार्थ्यांची सहज ओळख पटते, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेस मदत होते. गणवेशामुळे शाळेची ओळख होते. तो विद्यार्थ्यांमध्ये साधेपणा, समानता आणि शिस्त यांसारखे चांगले गुण रुजवतो.

गणवेशाचे असे अनेक फायदे असले तरी सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे त्यामुळे व्यक्तिमत्व विकास होऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. यावर्षी आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना गणवेशांमध्ये एक सुंदर जॅकेट दिले आहे. आज या मुलांना जॅकेटमध्ये पाहून त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला दिसला. कुठल्याही खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांपेक्षा ही मुलं कुठे कमी दिसत नव्हते. आनंदाची गोष्ट म्हणजे महानगरपालिकेच्या शाळा विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे मोफत शिक्षण देत आहेच परंतु त्याचबरोबर अश्याप्रकारे पुढाकार घेऊन मुलांचे व्यक्तीमत्व विकास करून त्यांचे व देशाचे राहणीमान उंचावण्यास मदत करत आहे. या पुढाकाराबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त व शिक्षण समिती सर्वांचे मनापासून कौतुक.

-प्राजक्ता राहुल रुद्रवार
संस्थापक/ अध्यक्ष
सहगामी फाउंडेशन रावेत

मस्ती की पाठशाळा मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली ❤️
29/07/2026

मस्ती की पाठशाळा मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली ❤️

वृत्तपत्र - ज्ञानाचा खजिना...मुलांना जागतिक घडामोडी कळाव्यात आणि काळासोबत रहावे यासाठी दररोज वृत्तपत्र वाचले पाहिजे या ह...
28/07/2026

वृत्तपत्र - ज्ञानाचा खजिना...

मुलांना जागतिक घडामोडी कळाव्यात आणि काळासोबत रहावे यासाठी दररोज वृत्तपत्र वाचले पाहिजे या हेतूने आमच्या एका दात्यांनी गेल्या सात वर्षांपासून मस्ती की पाठशाळेत मोफत वृत्तपत्र सेवा सुरु केली आहे. इंग्रजी व मराठी असे दोन्ही भाषेतील वृत्तपत्र पाठशाळेत येतात. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करताना या अवांतर वाचनाचा खूप उपयोग होतं असतो. त्यामुळे रोज पेपर वाचा म्हणून आम्ही मुलांच्या कायम मागे लागत असतो.

आज सकाळी पाठशाळेच्या समोरून बाहेर जात असताना पाठशाळेच्या पायऱ्यांवर लोक बसलेली दिसत होती. नेहमीप्रमाणे कामगार वर्ग बसलेला दिसतोय असे म्हणत मी गाडी वळवणार तेवढ्यात एक गोष्ट जाणवली. त्यातील काही कामगार हे पेपर वाचत होते. ते दृष्य बघूनच खूप छान वाटलं. पाठशाळा सुरु करताना फक्त मुलांनी शिकून पुढे जावे हा हेतू नव्हता तर वस्तीतील कामगार वर्गात बदल घडावा असे वाटले होते. आज सकाळी या कामगार वर्गाला असे वाचताना पाहून काही अंशाने मस्ती की पाठशाळेचा उद्देश सफल झाला असे वाटले. दुरूनच त्यांचा एक मस्त फोटो घेऊन विचार केला की या लोकांशी बोलावे. त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणे की आम्ही दररोज येथे पेपर वाचत असतो. खूप छान असे म्हणत त्यांचे कौतुक केले आणि ही वाचन संस्कृती अशीच पुढेही चालत राहु देत म्हणत निघाले.

Summer Internship Program @ Masti ki Pathshala ❤️Heartfelt thanks to City Pride School, Nigdi, for inviting us to the cl...
22/06/2026

Summer Internship Program @ Masti ki Pathshala ❤️

Heartfelt thanks to City Pride School, Nigdi, for inviting us to the closure ceremony of their 5-day social internship program done by their students at Masti ki Pathshala. We were honoured to represent Masti ki Pathshala and present certificates of appreciation to four talented students who completed the program.

A big thank you to the School Management, Soft Skill department and the dedicated teachers of CPS for making this internship program successful. Special thanks to Ashwini Kulkarni ma'am for felicitating us as a mentor 🙏🏻

--Team Sahgami Foundation

आंतरराष्ट्रीय योगदिन विशेष...आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मोरेश्वर भोंडवे सोशल फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या रावेत ...
21/06/2026

आंतरराष्ट्रीय योगदिन विशेष...

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मोरेश्वर भोंडवे सोशल फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या रावेत योग उत्सव कार्यक्रमात मस्ती की पाठशाळेतील मुलांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sahgami Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sahgami Foundation:

Shortcuts

Share