कृषी महाविद्यालयातील होतकरू व नावीन्याची कास धरू पाहणार्या विद्यार्थी - विद्यार्थिनीसाठी आपली माती आपला महाराष्ट्र या स्पर्धेची मागील वर्षापासून सुरुवात करण्यात आली. आपण सर्वांनी या स्पर्धेत मनापासून सहभाग नोंदवून नुसतीच स्पर्धा पार पाडली नाहीत, तर तिचा दर्जाही उंचवलात. आपल्याकडील 'अग्रि' मध्ये 'कल्चर' ही आहे हे तुम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने सिद्ध करून दाखवीलेत, त्याबद्दल आपणां सर्वांचे मन:पूर
्वक अभिनंदन!
आपणां सर्वांच्या सूचनेप्रमाणे यंदाचे वर्षीपासून कृषी महाविद्यालये व कृषी शाळा यांच्या स्पर्धा वेगवेगळ्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यपद्धतीनेच स्पर्धेची आखणी केलेली आहे त्याचबरोबर यंदाचे वर्षीपासून पारितोषिकांमध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होत आहे.
या स्पर्धेमध्ये मनोरंजन व प्रबोधन यांचा मेळ साधलेला आहे. यात विद्यार्थ्यांना, त्यांच्यातील गुणांना एक व्यासपीठ मिळेल व रोजच्या अभ्यासक्रमातून एक चेंजही मिळेल. सोबतच नामवंत शेतीतज्ञांचे मार्गदर्शनही मिळेल. तरी सर्व महाविद्यालये, कृषी विद्यापीठे व शेती संलग्न संस्थांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत जरूर भाग घ्यावा व संपूर्ण महाराष्ट्रात ही आगळी वेगळी स्पर्धा यशस्वी करण्यास साहाय्य करावे.
जयहिंद - जय महाराष्ट्र !