Warkari - वारकरी संप्रदाय

  • Home
  • India
  • Pune
  • Warkari - वारकरी संप्रदाय

Warkari - वारकरी संप्रदाय वारकरी संत व संप्रदाय या विषयाला वाहिलेले पेज

आज भाद्रपद शुद्ध द्वादशी - वामन जयंती पर्व विशेष भागवतधर्मी ।नृसिंहजयंती रामनवमी ।वामनजयंती जन्माष्टमी ।उत्तमोत्तम शिवरा...
23/09/2026

आज भाद्रपद शुद्ध द्वादशी - वामन जयंती

पर्व विशेष भागवतधर्मी ।
नृसिंहजयंती रामनवमी ।
वामनजयंती जन्माष्टमी ।
उत्तमोत्तम शिवरात्री ||
(श्रीएकनाथी भागवत)

बळीचे द्वारी आपण वामन झाला ।
इंद्राच्या कैवारें बळी पाताळीं घातला ॥ १ ॥
तोचि महाराज उभा विटेवरी ।
कर धरिले कटीं पाउलें दोन्हीं साजिरीं ॥ २ ॥
भक्ताचिया काजा विटे उभा राहिला ।
एका जनार्दनीं देव डोळां पाहिला ॥ ३ ॥

उद्या भाद्रपद शुद्ध द्वादशी म्हणजे वामनजयंती आहे.  आजचा एकादशीचा उपवास उद्या दुपारी बारानंतर सोडल्यास वामन जयंतीचा उपवास...
22/09/2026

उद्या भाद्रपद शुद्ध द्वादशी म्हणजे वामनजयंती आहे. आजचा एकादशीचा उपवास उद्या दुपारी बारानंतर सोडल्यास वामन जयंतीचा उपवासही घडतो.
वामनजयंती ही नाथ महाराजांनी सांगितलेल्या पाच पर्वकाळांपैकी एक आहे.

पर्व विशेष भागवतधर्मी ।
नृसिंहजयंती रामनवमी ।
वामनजयंती जन्माष्टमी ।
उत्तमोत्तम शिवरात्री ||

(श्रीएकनाथी भागवत, अध्याय- ११ ओवी १२५७)

आज गौरी विसर्जनानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस अलंकार घालण्यात आले.
19/09/2026

आज गौरी विसर्जनानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस अलंकार घालण्यात आले.

पंढरपूर गोकुळाष्टमी उत्सव – २ https://pandharee.wordpress.com/gokulashtami-2/ आज पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील गोकुळाष्...
11/09/2026

पंढरपूर गोकुळाष्टमी उत्सव – २
https://pandharee.wordpress.com/gokulashtami-2/

आज पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील गोकुळाष्टमी उत्सवाची सांगता बुक्क्याच्या दिंडीने झाली. ही दिंडी काल मध्यरात्री मंदिरातून निघाली व आज सकाळी नगरपदक्षिणा करून मंदिरात परत आली. उत्सव समाप्तीनिमित्त श्रींना अलंकार घालण्यात आले.

या उत्सवाची सविस्तर माहिती पुढील लिंकवर

https://pandharee.wordpress.com/gokulashtami-2/

श्री संतांचिये माथा चरणावरी | साष्टांग हे करी दंडवत ||श्रावण वद्य द्वादशी - संत सेना महाराज पुण्यतिथी #संत_सेना
08/09/2026

श्री संतांचिये माथा चरणावरी | साष्टांग हे करी दंडवत ||

श्रावण वद्य द्वादशी - संत सेना महाराज पुण्यतिथी

#संत_सेना

आज श्रावण वद्य अष्टमी -  गोकुळाष्टमी भगवान श्रीकृष्ण जयंती व संत ज्ञानेश्वर माऊली जयंतीपर्व विशेष भागवतधर्मी ।नृसिंहजयंत...
04/09/2026

आज श्रावण वद्य अष्टमी - गोकुळाष्टमी
भगवान श्रीकृष्ण जयंती व संत ज्ञानेश्वर माऊली जयंती

पर्व विशेष भागवतधर्मी ।
नृसिंहजयंती रामनवमी ।
वामनजयंती जन्माष्टमी ।
उत्तमोत्तम शिवरात्री ||

सासवड,  येथील लक्ष्मी नारायण मंदिरामधून प्रस्थान ठेवणाऱ्या चांगा वटेश्वर पालखी सोहळ्याला महाराष्ट्र शासनाने दिलेला मानाच...
31/08/2026

सासवड, येथील लक्ष्मी नारायण मंदिरामधून प्रस्थान ठेवणाऱ्या चांगा वटेश्वर पालखी सोहळ्याला महाराष्ट्र शासनाने दिलेला मानाचा दर्जा रद्द करावा.

कारणे :-

चांगा वटेश्वर अर्थात चांगदेव महाराज यांची समाधी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र पुणतांबा येथे आहे. चांगदेवांच्या समाधी सोहळ्याचे वर्णन करणारे २६ अभंग संत नामदेव महाराज यांनी रचले असून ते संत नामदेव यांच्या अभंग गाथ्या मध्ये उपलब्ध आहेत. असे असताना सासवड मधून चांगा वटेश्वर या नावाने सुरु केलेला पालखी सोहळा पूर्णपणे चुकीचा व कोणतेही स्थानमहात्म्य नसलेला असा पालखी सोहळा आहे. पूर्वी लक्ष्मी नारायण या नावाने निघणारा पालखी सोहळा आता रूपांतर करून चांगावटेश्वर सोहळा झाला आहे. पूर्वी लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये केवळ लक्ष्मीनारायणाची मूर्ती होती. परंतु आता या मूर्ती समोर एका समाधीचे बांधकाम करण्यात आले आहे व ही चांगदेवांची समाधी / पादुका असल्याचे भासविण्यात येत आहे. ७०० वर्षांपूर्वीच्या इतिहासामध्ये छेडछाड करण्याचा हा प्रकार असल्यामुळे राज्य शासनाने या पालखी सोहळ्याची सखोल चौकशी करून शासकीय मान्यता तातडीने रद्द करावी.

शके १२१८ दरम्यान ५ समाधी सोहळे परमात्मा पांडुरंगाने त्याच्या ५ भक्तांसाठी केले.

१. संत ज्ञानेश्वर (कार्तिक वद्य १३, आळंदी)
२. संत सोपानदेव (मार्गशीर्ष वद्य १३, सासवड)
३. संत चांगदेव अर्थात चांगा वटेश्वर (माघ वद्य १३, पुणतांबा)
४. संत मुक्ताबाई (वैशाख वद्य १०, अंतर्धान तापीतीर)
५. संत निवृत्तीनाथ (ज्येष्ठ वद्य १२, त्र्यंबक)

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी सोहळा आळंदी येथे पार पडल्या नंतर संत सोपानदेव यांना सासवड येथे समाधी देण्याचे स्वतः पांडुरंगाने ठरविले होते असे देखील अभंगांमधून स्पष्ट होते. त्याप्रमाणे आळंदी येथून निघून श्री पांडुरंग सासवड येथे संत सोपानदेव यांच्या समाधी सोहळ्यासाठी आले व मोठा समारंभ होऊन मार्गशीर्ष वद्य १३ चे दिवशी मुख्य समाधी सोहळा पार पडला. या सोहळ्याबद्दलचे विस्तृत वर्णन देखील संत नामदेव यांनी केले आहे.

संत सोपानदेव यांच्या समाधी उत्सवामध्ये कशा प्रकारचा समारंभ झाला याचा सविस्तर उल्लेख या अभंगांमधून होतो. हे पाचही सोहळे भगवान शंकराची पुरातन स्थाने असलेल्या ठिकाणी झाले आहेत. वटेश्वराच्या ( म्हणजे शंकराच्या) सानिध्यात समाधी असावी म्हणून कऱ्हा नदीच्या तीरावरील जागेची निवड झाली हे देखील अभंगांवरून स्पष्ट होते. संत नामदेव महाराजांच्या मुलांनी म्हणजेच नारा, म्हादा विठा आणि गोदा यांनी स्वतः समाधीची जागा झाडून स्वच्छ केल्याबाबतचा उल्लेख आहे. समाधीसाठी लागणारे साहित्य स्वतः संत परिसा भागवत व संत चांगदेव घेवून आले असा उल्लेख आहे.

संत सोपानदेवांचा समाधी सोहळा पार पडल्यानंतर संत चांगदेव महाराज यांनी देखील परमात्मा पांडुरंगाकडे समाधीची मागणी केली हे खालील अभंगांमधून स्पष्ट होते.

वैष्णवांनी केली समाधी प्रदक्षिणा | गेले आचमना भोगावती ||१||
सारी रात्र कीर्तन केले त्रयोदशी | चतुर्दशी दिवशी भोजन केले ||२||
अमावस्ये जागरण केले परिपूर्ण | प्रतिपदे गमन वैष्णवांचे ||३||
निवृत्ती मुक्ताई झाली उदासी | आता ऋषिकेशी बोळवावे ||४||
चांगा म्हणे माझी करा बोळवण | घेउनी नारायण समागमे ||५||
नामा म्हणे देवा माघ मास नेमा | चांगदेवा प्रेमा समाधी देऊ ||६||

सासवड मधील सोपानदेवांचा समाधी उत्सव करून देव व संत मांदियाळी संत चांगा वटेश्वर यांना समाधिस्थ करणेसाठी गोदातीरी गेले.
माघ वद्य त्रयोदशी, शके १२१८ या दिवशी संत चांगदेव अर्थात चांगा वटेश्वर यांना श्री क्षेत्र पुणतांबा, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर येथे समाधी देण्यात आली हे देखील संत नामदेव यांच्या अभंगांमधून स्पष्ट होते. सबब संत चांगदेव यांची समाधी सासवड येथे नसून पुणतांबा येथे आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.

पुणतांबा येथे चांगदेव महाराजांचे भव्य असे समाधी मंदिर उभे असून आषाढी वारीसाठी तिथून चांगदेव अर्थात चांगा वटेश्वर यांचा पालखी सोहळा पंढरपूरला जात असतो.

सासवडच्या लक्ष्मी नारायण मंदिरातून लक्ष्मी नारायण नावाने पालखी सोहळा पूर्वी जात असे व याची नोंद "वारकरी पंथाचा इतिहास" या वै. मामासाहेब दांडेकर यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये आढळून येते. असे असताना अलीकडच्या काळात कोणताही पूर्व इतिहास नसताना आणि कोणतीही पार्श्वभूमी नसताना लक्ष्मी नारायण नाव बदलून चांगा वटेश्वर कसे झाले ? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे इतिहासाची मोडतोड करून मूळ इतिहास बुजून टाकण्याचा प्रयत्न आहे. अशा पार्श्वभूमीवर सध्या सासवडहून निघत असलेल्या चांगा वटेश्वर पालखी सोहळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. हा शासकीय दर्जा खोट्या माहितीच्या आधारावर मिळवला का ? याचीही शासनाने चौकशी करावी.

गावा गणित विठ्ठल रुक्मिणी मंदिरे असून देखील सर्व पालख्या पंढरपूर कडे जातात याचे कारण पंढरपूरचे स्थान महात्म्य होय. मग जिथून पालख्या प्रस्थान करतात त्या ठिकाणी स्थान महात्म्य नको का ? असा सवाल इथे उपस्थित होतो.

श्री विठ्ठल मंदिरातील श्रावणी सोमवारhttps://pandharee.wordpress.com/2020/08/04/shravan-somwar/ #विठ्ठल  #पंढरपूर  #श्राव...
24/08/2026

श्री विठ्ठल मंदिरातील श्रावणी सोमवार

https://pandharee.wordpress.com/2020/08/04/shravan-somwar/

#विठ्ठल #पंढरपूर #श्रावणसोमवार

श्रावण महिन्यातील सोमवारी पांडुरंगास शैव पद्धतीचे आडवे गंध लावले जाते. देवाच्या मस्तकी बेल वाहिला जातो. या दिवशी...

जय जय विठोबा रखुमाई 🙏🌹🚩
24/08/2026

जय जय विठोबा रखुमाई 🙏🌹🚩

21/08/2026

श्रावण शुद्ध भागवत एकादशी सोमवार दि. २४ ऑगस्ट रोजी आहे.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Warkari - वारकरी संप्रदाय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share