16/06/2025
बारा तासाचा प्रवास चार तासावर आला तरी मानव म्हणतोय वेळ नाही
बारा माणसांच कुटुंब दोन माणसांवर आला तरी मानव म्हणतोय वेळ नाही
चार आठ दिवसांनी मिळणारा निरोप आता चार सेकंदात मिळतोय तरी मानव म्हणतोय वेळ नाही
30 मिनिट नाही तर फ्री अशी सुविधा झाल्यानंतर ही मानव म्हणतोय वेळ नाही
वर्ष लागायचे दूरच्या माणसाचा चेहरा पाहायला जो आता सेकंदात दिसतोय तरी मानव म्हणतोय वेळ नाही
घराचे मजले वर खाली करण्यासाठी लागणारी शक्ती आणि वेळ लिफ्ट मुळे सेकंदावर आला तरी मानव म्हणतोय वेळ नाही मला
तासनतास बँकांच्या काऊंटर वर वेळ घालवणारा माणूस आता काही सेकंदात व्यवहार करतोय आणि तरी मानव म्हणतोय वेळ नाही पुरत.
काही आठवड्याचा कालावधी लागणाऱ्या आरोग्य तपासण्या आता काही तासात होतात तरी देखील वेळ नसल्याची तक्रार करत आहे माणूस
एक्टिवा चालवताना एका हातात हँडल एका हातात मोबाईल घेऊन माणूस बोलत असतो कारण थांबून बोलायला वेळ नसतो त्याला.
कार चालत असताना देखील एका हातात स्टेरिंग एका हातात मोबाईल ठेवून तो व्हाट्सअप पाहत असतो कारण वेळ नसतो त्याला.
रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाली तर दोन लेन्सला ओव्हरटेक करून तिसऱ्या लेनने तयार करून तो पुढे जातो कारण वेळ नसतो त्याला.
चार माणसांत बसला की तो अस्वस्थपणे मोबाईल मध्ये बोटं घालत बसतो कारण त्याला कुठेतरी जायचं असतं, कारण वेळ नसतो त्याला.
एकटा असला की तो निवांतच असतो, पण समोर कोणी येताच त्याची चलबिचल होते कारण वेळ नसतो त्याला.
आयपीएलसाठी वेळ आहे, चित्रपटांसाठी वेळ आहे, टाईमपास करण्यासाठी वेळ आहे, सटरफटर कार्यक्रमांसाठी वेळ आहे, पण स्वतःसाठी वेळ नसतो त्याला.
वेळ आणि जीवनात सुलभता यावी म्हणून अविरत काम करणारा माणूस, वेळ नाही म्हणून कांगावा करतोय. पण चोवीस तासाचं गणित अजून तेवढंच आहे मग वेळ नाही म्हणणारा माणूस वेळ का मारतोय..
कॉपी पेस्ट....
*🙏🏻शुभ सोमवार सकाळ*🙏🏻🙏🏻🙏🏻