आनंदवन मित्र मंडळ, महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Pune
  • आनंदवन मित्र मंडळ, महाराष्ट्र

आनंदवन मित्र मंडळ, महाराष्ट्र Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आनंदवन मित्र मंडळ, महाराष्ट्र, Nonprofit Organization, ५६८, नारायण पेठ, केसरी, टिळक वाडा, केळकर रोड, Pune.

दरवर्षी १५ ते २२ मे दरम्यान महाराष्ट्रासह देशभरातील अनेक युवक श्रमर्षी बाबा आमटे यांनी सोमनाथ (ता. मुल, जि. चंद्रपूर) येथे स्थापन केलेल्या ‘श्रमसंस्कार छावणी शिबिरा’निमित्त एकत्र येत असतात. या छावणी शिबिरात युवक धर्म, जात, पंथ, वंश, भाषा, इ. भेद विसरून श्रमसंस्कार व समाजसेवेची दीक्षा घेत असतात. हे सात दिवसीय शिबीर आटोपून युवक आपापल्या गावी, आपापल्या परीने समाजकार्य करतात.
सन २०१२ सालच्या श्र

मसंस्कार छावणी शिबिरात एकत्र आलेल्या पुणे शहरातील युवकांनी पुण्यात काहीतरी सामाजिक कार्य करावे असे ठरवले. अनेक जेष्ठ व अनुभवी मंडळींनी या विचाराचे स्वागत केले. बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी स्थापन केलेल्या ‘आनंदवना’त भेटलेल्या या युवक मित्रांनी आपल्या मंडळास ‘आनंदवन मित्र मंडळ, महाराष्ट्र’ हे नाव दिले.
दि. १२ ऑगस्ट २०१२ रोजी सर्व ‘सोमनाथ कॅम्पर्स’चा ‘स्नेहमेळावा’ आयोजित केला होता. याचदिवशी ‘स्नेहभेट प्रकल्पाचे’ उद्घाटन करण्यात आले.

‘स्नेहभेट प्रकल्पा’विषयी :
आनंदवन मित्र मंडळाच्या सदस्यांनी पुणे शहरात एक अनोखा ‘स्नेहभेट प्रकल्प’ सुरु केला. लोकांकडे अनेक वस्तू विनावापर, अनावश्यकरित्या पडून असतात. अशा वस्तूंचा त्यांना उपयोगच नसतो; परंतू त्या भंगारातही देता येत नसतात. अशा वापरायोग्य वस्तू लोक आनंदवन मित्रमंडळाच्या टिळकवाडा येथील स्नेहभेट प्रकल्पात आणून देतात.
दर रविवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंडळाचे कार्यकर्ते या वस्तूंचे संकलन, विभागणी करून त्यांची बांधणी करतात. विविध सामाजिक संस्था आपापल्या गरजेनुसार आवश्यक त्या वस्तू या प्रकल्पातून घेऊन जातात.

‘स्नेहभेट प्रकल्पा’त या वस्तू स्वीकारल्या जातात:
वैयक्तिक वापराच्या वस्तू (अंघोळीचा साबण, कपड्याचा साबण, तेल,ताट, वाट्या, पेला, इ.)
स्वयंपाकाची तसेच जेवण वाढण्याची भांडी,
गाद्या, उश्या, चादर, पडदे, बेडशीट, गरम कपडे,
शालेय व अवांतर पुस्तके, कोऱ्या वह्या, शैक्षणिक साहीत्य (पेन, पेन्सिली, रबर, कंपास पेटी, फळा)
धान्य, डाळी, साखर, तेल, इ.
खेळणी, गेम्स, गाण्याच्या कॅसेट्स-सीडीज,
कॉम्प्युटर, इलेक्ट्रोनिक उपकरणे (TV, कुलर, फ्रिज, वॉशिंग मशीन, इ.), फर्निचर, वैद्यकीय उपकरणे
वाहने (दुचाकी, चारचाकी), सायकल,
प्रवासी बॅगा, सुटकेस, शालेय दप्तरे,

आनंदवन मंडळाशी संलग्न संस्था :
महारोगी सेवा समिती (आनंदवन, हेमलकसा)
स्नेहालय, (अ.नगर)
सहारा अनाथालय, (गेवराई, जि. बीड)
लुई ब्रेल अंध-अपंग कल्याण संस्था (लोणीकंद, पुणे)
पसायदान बालभवन अनाथालय, (जुन्नर, जि. पुणे)
स्व. वेदप्रकाश लच्छीराम गोयल निवासी मतिमंद विद्यालय, (फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे)
नारी समता मंच- खेळघर, (ता. मुळशी, जि.पुणे)
पालकनीती परिवार, (पुणे)
सेवालय, (लातूर)
अभिनव मित्र मंडळ, (शिंदेवाडी, पुणे)
भारत जोडो युवा अकादमी,(किनवट, जि. नांदेड)
तथापि, (पुणे)
मैत्री, (पुणे)
माई बालभवन, (पुणे)
प्रबुद्ध बहुउद्देशीय प्रतिष्ठान, (पुणे)
बाबा आमटे विद्यार्थी सहाय्यक समिती, (श्रीगोंदा)
शांतीवन, (बीड)

Address

५६८, नारायण पेठ, केसरी, टिळक वाडा, केळकर रोड
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when आनंदवन मित्र मंडळ, महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share