MAHA NGO Federation / महा एनजीओ फेडरेशन

  • Home
  • India
  • Borivli
  • MAHA NGO Federation / महा एनजीओ फेडरेशन

MAHA NGO Federation / महा एनजीओ फेडरेशन MAHA NGO FEDERATION is a Federation of 2500+ NGO's of Maharashtra. It is a group of 2000 social organizations and social workers.

MAHA NGO Federation is a Non-Profit registered (Section 8 Company) organization founded by working for the empowerment of social workers and social organizations. These organizations work on more than 25 different social subjects like health, education for underprivileged children, environmental issues, rural development, employment generation, and so on. MAHA NGO Federation stre

ngthens the social organizations that are working in various social welfare and charitable activities. OUR OBJECTIVES:

-To felicitate social organizations or workers for their work. This will encourage them to improve their productivity in social work services.
-To conduct awareness programs about NGO Legal Compliance, Accountability, Government schemes, bank schemes, the judicial system, NGO administration, and private and institutional donors.
-To establish industrial counseling centers, training classes, and cooperation centres for social causes.
-To promote social organizations and workers in front of private donors, corporate donors, and Government agencies.
-To create a platform for private donors, CSR corporate donors, Government agencies, and NGOs to interact and work together to support different social initiatives.
-To create awareness about CSR opportunities, policies, processes, and build resources for CSR projects.
-To provide employment and self-employment opportunities in the field of social work.
-To provide professional training to NGOs for improving their productivity towards social work.

ज्ञान, ध्यान आणि मानवतेचा मार्ग दाखवणारे प्रेरणास्थान 🙏✨प.पू. श्री श्री रविशंकर गुरुदेव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच...
13/05/2026

ज्ञान, ध्यान आणि मानवतेचा मार्ग दाखवणारे प्रेरणास्थान 🙏✨
प.पू. श्री श्री रविशंकर गुरुदेव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपले मार्गदर्शन सदैव समाजाला सकारात्मक दिशा देत राहो 🌼




💕

!! जय गुरुदेव!!🌸महा एनजीओ फेडरेशन आयोजित🌸भव्य आनंदमय सत्संग सोहळापरमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या 70 व्या व...
10/05/2026

!! जय गुरुदेव!!
🌸महा एनजीओ फेडरेशन आयोजित🌸
भव्य आनंदमय सत्संग सोहळा
परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य आनंदमय सत्संग सोहळ्यास आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून आनंदमयी सत्संग सोहळ्याचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती

🗓️ दिनांक: 13 मे 2026
⏰ वेळ: सायं. 6.00 ते 8.00
📍स्थळ: माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे
https://maps.app.goo.gl/DvznABFGgy1XhkCv9

🎶 विशेष आकर्षण:
प्रसिद्ध गायक शशांक ओंभासे.
(आर्ट ऑफ लिव्हिंग)

या पावन शुभ प्रसंगी भजन, ध्यान आणि गुरुकृपेचा दिव्य अनुभव घेण्यासाठी जरूर सहभागी व्हा.
सत्संगानंतर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
🙏 चला तर, या दिव्य सोहळ्यात सहभागी होऊन आनंद, शांती आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवूया!

आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

मुख्य संयोजक व संस्थापक : शेखर मुंदडा

सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी
महा एनजीओ फेडरेशन संयोजक समिती
📞 संपर्क: ९७६६९९९८८

महाराष्ट्राच्या महान परंपरा, शौर्य आणि कष्टाला सलाम! 🚩महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! चला, एकत्र येऊन...
01/05/2026

महाराष्ट्राच्या महान परंपरा, शौर्य आणि कष्टाला सलाम! 🚩
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! चला,
एकत्र येऊन प्रगतीशील आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया 💪✨




अक्षय तृतीयेच्या पावन दिवशी सुख, समृद्धी आणि यश तुमच्या आयुष्यात अखंड नांदो ✨सोन्यासारखी उजळणारी प्रत्येक क्षणाची सुरुवा...
19/04/2026

अक्षय तृतीयेच्या पावन दिवशी सुख, समृद्धी आणि यश तुमच्या आयुष्यात अखंड नांदो ✨
सोन्यासारखी उजळणारी प्रत्येक क्षणाची सुरुवात आजपासून होवो 💛
लक्ष्मीमातेच्या कृपेने घरात आनंद आणि भरभराट सदैव राहो 🙏
नवीन स्वप्नांना नवी उंची मिळो आणि प्रत्येक प्रयत्न सफल होवो 🌼
अक्षय तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌿

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏समता, न्याय आणि बंधुतेचा मार्ग दाखवणारे महान विचारवंत ...
14/04/2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
समता, न्याय आणि बंधुतेचा मार्ग दाखवणारे महान विचारवंत 🌿
भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान अमूल्य आहे 📜
त्यांच्या विचारांनीच घडतोय सशक्त आणि समतोल भारत 🇮🇳
त्यांच्या प्रेरणेतूनच पुढे जाऊ या 💙

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांनी समाजाला दिली नवी दिशा 🌿स्त्री शिक्षण, समानता आणि सत्यशोधक विचारांच...
11/04/2026

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांनी समाजाला दिली नवी दिशा 🌿
स्त्री शिक्षण, समानता आणि सत्यशोधक विचारांचा दीप आजही उजळतो आहे ✨
अंधश्रद्धा व अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा 🙏
त्यांच्या कार्यातूनच घडतोय प्रगत, समतोल समाज 🌍
जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐

शक्ती, भक्ती आणि निष्ठेचं प्रतीक 🙏संकटातून मार्ग दाखवणारे, श्रीरामाचे परम भक्त 🚩बजरंगबलींच्या कृपेने जीवनात येवो आनंद, य...
02/04/2026

शक्ती, भक्ती आणि निष्ठेचं प्रतीक 🙏
संकटातून मार्ग दाखवणारे, श्रीरामाचे परम भक्त 🚩
बजरंगबलींच्या कृपेने जीवनात येवो आनंद, यश आणि समाधान ✨
आपल्या सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️

अहिंसा, सत्य आणि करुणेचा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या विचारांनी आपले जीवन उजळून निघो. 🙏✨शांतता, संयम आणि प्रेम यांच...
31/03/2026

अहिंसा, सत्य आणि करुणेचा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या विचारांनी आपले जीवन उजळून निघो. 🙏✨
शांतता, संयम आणि प्रेम यांचा मार्ग स्वीकारून समाजात सौहार्द वाढवूया.

भगवान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼

#महावीरजयंती

पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण व कृतीसत्र शिबिर उत्साहात संपन्न.महा एन.जी.ओ.फेडरेशन व इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स यांच्या संय...
30/03/2026

पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण व कृतीसत्र शिबिर उत्साहात संपन्न.

महा एन.जी.ओ.फेडरेशन व इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण व कृतीसत्र शिबिर” हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्षस्थानी मी होतो.कार्यक्रमास मा.अतुल खराटे (सीईओ व्हीपी गॅस विभाग) तसेच मा.श्री.महेश बालदी (आमदार, उरण मतदार संघ),मा.महेश म्हात्रे (सभापती उरण), डॉ.नितीन मार्कंडेय (अशासकीय सदस्य, महाराष्ट्र गोसेवा आयोग),योगेश बजाज यांची सन्माननीय उपस्थिती लाभली.

याशिवाय विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी,अधिकारी व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरामध्ये पशुसंवर्धन, गोसंवर्धन,पशू आरोग्य,आधुनिक व्यवस्थापन पद्धती तसेच पशुपालकांसाठी उपयुक्त अशा विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामुळे उपस्थित पशुपालक, शेतकरी व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

कार्यक्रमाचे आयोजन महा एन. जी. ओ. फेडरेशन व इंडियन ऑईल अदानी व्हेंचर्स यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व मान्यवर, उपस्थित नागरिक, पदाधिकारी व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आयोजकांनी आभार मानले.

*चाकण ग्रामीण रुग्णालयाला अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा; सीएसआरमधून मोठी मदत*पुणे : महा एनजीओ फेडरेशन यांच्या माध्यमातून आण...
29/03/2026

*चाकण ग्रामीण रुग्णालयाला अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा; सीएसआरमधून मोठी मदत*

पुणे : महा एनजीओ फेडरेशन यांच्या माध्यमातून आणि कार्डमॉम लॉजिस्टिक असेट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, जीर्ण झालेल्या पोस्टमार्टम कक्षाची पूर्णपणे पुनर्बांधणी करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे परिसरातील आरोग्य सेवांना मोठा बळ मिळणार आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, कार्डमॉम लॉजिस्टिक्स असेट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक अजित पाटील, महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे, मुकुंद शिंदे, योगेश बजाज, तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत रुग्णालयास अत्याधुनिक केमिकल कचरा व्यवस्थापन यंत्रणा, डिजिटल एक्स-रे मशीन (ज्यामध्ये काही मिनिटांत विविध प्रकारचे एक्स-रे करता येतात), लसीकरणासाठी विशेष फ्रीज, चार गिझर, पाच स्कॅनर व प्रिंटर, चार अत्याधुनिक वजन काटे, दहा डिजिटल बीपी मशीन आणि दहा पल्स ऑक्सिमीटर उपलब्ध करून देण्यात आले. तसेच, अत्यंत खराब अवस्थेतील पोस्टमार्टम कक्षाचे संपूर्ण नूतनीकरण करून तो सुसज्ज करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना शेखर मुंदडा यांनी सीएसआरच्या माध्यमातून लोकाभिमुख आणि परिणामकारक प्रकल्प कशा प्रकारे राबविता येतात, यावर मार्गदर्शन केले.
अजित पाटील यांनी सांगितले की, कंपनी सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांना नेहमीच सहकार्य करत असून, आरोग्य क्षेत्रात आणखी कोणत्या सुविधा देता येतील यावरही कंपनीचा सकारात्मक विचार आहे.
या उपक्रमाचे संयोजक आणि महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांनी सांगितले की, या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा सहज उपलब्ध करून देणे हा आहे.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राहुल जगताप, अपूर्वा कारवा, कोमल गांधी, शिवाजी चव्हाण यांनी समन्वय साधला.

महा एनजीओ फेडरेशन

प्रभू श्रीरामांच्या आदर्श जीवनातून सत्य, धर्म आणि कर्तव्याची प्रेरणा घेऊया. 🙏✨आपल्या आयुष्यात शांतता, सद्भावना आणि यशाची...
26/03/2026

प्रभू श्रीरामांच्या आदर्श जीवनातून सत्य, धर्म आणि कर्तव्याची प्रेरणा घेऊया. 🙏✨
आपल्या आयुष्यात शांतता, सद्भावना आणि यशाची प्रभात उजाडो.
श्रीराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा! 🚩🌼

#श्रीरामनवमी

Address

Office No. 9 & 10, Sujay Garden Commercial Complex, Mukund Nagar, Pune
Borivli
411037

Alerts

Be the first to know and let us send you an email when MAHA NGO Federation / महा एनजीओ फेडरेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MAHA NGO Federation / महा एनजीओ फेडरेशन:

Share