"सावली"
कडक उन्हात चालत असताना सुखद थंडाव्याचा अनुभूती देते ती सावली. मनाला सुखावून जाणारी एक थंडगार झुळूक म्हणजे "सावली". श्रमाचा ताण विसरायला लावणारी "सावली".
आपली हि सावली पण अशीच आहे, एक सुरेख कल्पना, नात्यांचा अनोखा बंध, जबादारीचे एक सुंदर नाते, सामाजिक जाणिवेची गाठ, हवाहवासा वाटणारा एक सहवास. आपण समाजाचे काही देणे लागतो या जाणीवेमधून तयार झालेली एक संस्था म्हणजे "सावली", गरजूंना वेळेवर आ
णि खात्रीशीर मदत करणारी संस्था म्हणजे "सावली", सर्वांना मदतीसाठी तत्पर असणारी संस्था म्हणजे "सावली".
लहानपणापासून आपण सगळे जण ऐकत आलो आहोत कि आपण सर्व या समाजाचा देण लागतो. या समाजाने कोणाला नाव दिल, कोणाला प्रसिद्धी दिली, तर कोणाला सन्मान. आपल्या यश, अपायशामध्ये थोडा फार का होईना समाजाचा हातभार असतो. समाजाचे हेच ऋण परत फेडायची संधी आपल्याला "सावली" देते. "सावली" हे नुसते नाव नाही तर संधी आहे, नुसता घेण नाही तर समाजाचा देण आहे.
आज काल माणसाचे जीवन यंत्रवत होत चालले आहे. आज माणसाला माणसासाठीच वेळ उरला नाही. प्रत्येक जण आपल्या दैनंदिन कारभारमध्ये व्यस्त आहे. आज समाजामध्ये असे किती प्रसंग घडतात पण आपण त्या कडे साफ दुर्लक्ष करतो का, तर हि वेळ आपल्यावर आली नाही ना म्हणून आपण सोडून देतो. :-( काय आपली सामाजिक जाणीव बधिर होत चालली आहे ?
हीच गोष्ट मनामध्ये ठेवून आम्ही सावली चि निर्मिती केली. आज समाजामध्ये असे किती तरी लोक आहेत ज्यांना समाजासाठी काही तरी करायचा आहे, पण त्यांना मार्ग माहिती नाही. असे कितीतरी लोक आहेत जे संधीच्या शोधामध्ये आहेत. या सर्वांसाठी आहे "सावली".
सावलीमधून आम्ही…
• माणसाला माणसाशी जोडतो.
• प्रत्येकाबरोबर जिव्हाळ्याचा संवाद साधतो.
• प्रत्येकाला समाजाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करतो.
• प्रत्येकाच्या सामाजिक जाणीवेला जपतो. आमचा एकच ध्येय आहे ते म्हणजे रक्तदात्यांना जोडणे आणि गरजूंना वेळेवर मदत करणे.
आज सावलीच्या छत्राखाली १००० सभासद जोडले गेले आहेत तसेच रोज नव्याने येणारे सभासद पण आहेत.
आमचा कार्य एवढयावरच थांबलेला नाही. कारण आमचा नात या मातीशी पण आहे. आणि मातीच हे ऋण इतक्या सहज सहजी फिटत नाही. महाराष्ट्रामधील संस्कृती जपण्यासाठी आम्ही याच सावलीमार्फत सांस्कृतिक कार्यसुधा करतो. अरे याच मातीला थोर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. अवघ वय १६ असताना त्यांही घेतलेली स्वराज्याची ती शपथ, स्वराज्य मिळवण्यासाठी साठी केलेल शर्थीचे प्रयत्न. आणि या अथक प्रयत्नातून मिळालेला ते स्वराज्य हे सर्व आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.
सध्या आम्ही सावली तर्फे "रक्तदान" आणि "पोवाडा" गायन स्पर्धा हे उपक्रम चालवात आहोत.
आपल्या मदतीची तसेच सहभागाची अपेक्षा आहे. आमच्या संकेतस्थळा भेट दिल्याबद्दल धन्यवाद.