Ammunition Factory Mazdoor Union - INTUC

Ammunition Factory Mazdoor Union - INTUC TRADE UNION - for benefits of all workers

अभिनंदन श्री:  वैभव वारके भाऊ...🙏🙏🚩*सेवा.... साधना.... आणि आचरण.... या त्रिवेणी संगम ज्याकडे असतो... तो आध्यात्मात सात्व...
14/12/2025

अभिनंदन श्री: वैभव वारके भाऊ...🙏🙏🚩

*सेवा.... साधना.... आणि आचरण.... या त्रिवेणी संगम ज्याकडे असतो... तो आध्यात्मात सात्विक माणूस म्हणून ओळखला जातो*..... आणि सात्विकता आल्यावर आपल्या वाणीतील वकृत्वला तलवारी सारखी धार येते.......

नेमकी हेच ....*F4 सेक्शनच्या कोपरा सभा मीटिंग मध्ये विशेष दिसून आले... विरोधक आपल्या संघटनेचे सात्विक विचार ऐकण्यासाठी जमा झाले होते*...

खऱ्या अर्थाने संपूर्ण फॅक्टरीमध्ये इंटक कोपरा सभांमध्ये... बोलत असताना महाराष्ट्राचे *कुलदैवत आई तुळजाभवानी*.... तसेच *ज्ञानाचे महासागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर*... *महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज*... आणि सर्वधर्म समभाव तसेच सर्व जातींचा विचार करून .. आणि महामानवांना अभिवादन करून .... नतमस्तक होऊन...
कोपरा सभेची सुरुवात होत होती.......

आपण जर कोपरा सभांमध्ये टीका केली असती तर नक्कीच हे यश आपल्याला कदाचित मिळाले नसते...
म्हणून समाजामध्ये... असो किंवा अध्यात्मात असो.... आपल्याला बेनिफिट ( फायदा) मिळेल म्हणून काम करायचे नसते.....

तर माझ्या पदाला शोभेल अशी कामगिरी करणे माझे कर्तव्य आहे.. असे समजून सर्वाची कामे आपण करतो आणि काळजी घेतो....तेव्हा नक्कीच एक दिवस सर्वजण आपली काळजी घेतात...... *हे आजच्या विजयातून श्री: वैभव वारके भाऊ यांनी दाखवून दिले आहे*.....
परत एकदा वैभव वारके भाऊ यांना.... जय सियाराम 🙏🙏🚩🚩

“हे विश्वच माझे घर आहे” असा अनुभव आज प्रत्यक्षात आलावैभव वारके यांना निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.या यशासाठी ज्यांन...
14/12/2025

“हे विश्वच माझे घर आहे” असा अनुभव आज प्रत्यक्षात आला

वैभव वारके यांना निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
या यशासाठी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मेहनत घेतली, साथ दिली आणि विश्वास ठेवला त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.

इंटक युनियनचे तब्बल ७०० मावळे रात्र-दिवस एक करून काम करत होते. त्यांच्या कष्टांमुळे आणि निष्ठेमुळे आज हे यश मिळू शकले. या निवडणुकीत आपल्या युनियनची एकजूट, ताकद आणि शिस्त स्पष्टपणे दिसून आली, याचा आम्हाला अभिमान आहे.

जे उमेदवार निवडून येऊ शकले नाहीत, तेही आपल्या युनियनमधीलच आहेत. त्यांनीही भरघोस मतांनी लढत दिली — त्यांच्या प्रयत्नांचे व धैर्याचे आम्ही मनापासून कौतुक करतो.

तसेच निवडणुकीत सहभागी झालेल्या सर्व १० उमेदवारांचेही हार्दिक अभिनंदन.

इंटक युनियन तर्फे सर्व सभासदांना व समर्थकांना मनःपूर्वक धन्यवाद.
आमच्या पाठीशी प्रेमाने, विश्वासाने आणि एकजुटीने उभे राहिलात, यासाठी आम्ही सदैव ऋणी आहोत.

13/12/2025
🙏 जाहीर आभार 🙏सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व सन्माननीय सभासद व मतदार बंधू भगिनी ....अशक्यप्राय परिस्थिती...
13/12/2025

🙏 जाहीर आभार 🙏

सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व सन्माननीय सभासद व मतदार बंधू भगिनी ....

अशक्यप्राय परिस्थिती मध्ये स्वतंत्र लढण्याचा निर्णय आपण घेतला, आणि घेतलेल्या निर्णयाला यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी यथाशक्ती योगदान दिले. संख्येचं गणित माहीत असताना देखील... माझ्या युनियनच्या अस्मितेचा प्रश्न आहे म्हणून आणि युनियनचा आदेश म्हणून प्रतिकूल परिस्थिती मध्ये निवडणुकीला उभे राहिलेले आपले १० योद्धे... मित्रांनो या योद्ध्यांनी तेव्हाच सर्व इंटक प्रेमींचं मन जिंकलं.
... माझी संघटना स्वतंत्र निवडणूक लढणार आहे म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे कार्यकर्ते , तन मन व धनाने आपापले योगदान देणारे सर्व हितचिंतक, मार्गदर्शक, निष्ठावंत सभासद... त्याच प्रमाणे युनियनच्या आवाहनाला पाठिंबा देत भरघोस मत देणारे ज्ञात अज्ञात मतदार बंधू भगिनी...

आज आपल्यामुळे जो सन्मानाचा, प्रतिष्ठेचा,आनंदाचा, जल्लोषाचा क्षण प्राप्त झाला...
त्यासाठी खरतर आपले आभार मानण्यासाठी अक्षरशः शब्द नाहीत..... या अविस्मरणीय विजयाबद्दल विजयी उमेदवार श्री. वैभव वारके सह इंटकचे सर्व उमेदवार यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा...💐

आपणा सर्वांचे युनियनचे सन्मा. अध्यक्ष, सन्मा. जनरल सेक्रेटरी व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने मनःपुर्वक आभार 🙏🙏🙏

हा विजय इंटक युनियनच्या सर्वसामान्य निष्ठावंत सभासदांना समर्पित करत आहोत 🙏

💪👊 इंटक युनियन झिंदाबाद......

10/12/2025

🙏 जाहीर आभार 🙏
आपल्या इंटक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यास सर्व कामगार बंधू–भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. आपल्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली...
प्रत्येक कामगाराचे मनःपूर्वक आभार…

🌅कामगारांच्या हक्कांसाठी, न्याय आणि प्रगतीसाठी आपली इंटक 🌅

जाहीर मेळावा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम🗓 दिनांक : 10 डिसेंबर 2025 (बुधवार)⏰ वेळ : दुपारी 12:00 ते 2:00📍 स्थळ : श्रीराम मंग...
09/12/2025

जाहीर मेळावा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम

🗓 दिनांक : 10 डिसेंबर 2025 (बुधवार)
⏰ वेळ : दुपारी 12:00 ते 2:00
📍 स्थळ : श्रीराम मंगल कार्यालय, खडकी

आपण आपल्या अमूल्य वेळातून क्षण काढून या स्नेहभोजन सोहळ्यास उपस्थित राहावे,
हीच विनम्र विनंती.

आपली INTUC (इंटक) संघटना

09/12/2025

Address

Pune

Opening Hours

Monday 8am - 5pm
Tuesday 8am - 5pm
Wednesday 8am - 5pm
Thursday 8am - 5pm
Friday 8am - 5pm
Saturday 8am - 5pm

Telephone

+912025922764

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ammunition Factory Mazdoor Union - INTUC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ammunition Factory Mazdoor Union - INTUC:

Share