महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, संलग्न - एक्टू

  • Home
  • India
  • Pune
  • महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, संलग्न - एक्टू

महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, संलग्न - एक्टू Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, संलग्न - एक्टू, Community Organization, Pune.

पुणे महानगरपालिका कामगार युनियनचा (मान्यताप्राप्त) ८२ वा वर्धापन दिन संपन्नपुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या ८२ व्या व...
10/12/2025

पुणे महानगरपालिका कामगार युनियनचा (मान्यताप्राप्त) ८२ वा वर्धापन दिन संपन्न

पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्त कामगार पुतळ्यास अभिवादन करून प्रभातफेरी आणि भव्य मेळावा आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना आणि सेवेत असताना मृत्यू झालेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. युनियनच्या जनरल सेक्रेटरी कॉ. मुक्ता मनोहर यांनी कामगारांनी हक्कांसाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले. तर अध्यक्ष कॉ. उदय भट यांनी नवीन श्रमकायद्यांमुळे कामगारांना धोका निर्माण झाल्याचे सांगत संघर्षाची गरज अधोरेखित केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. वैजीनाथ गायकवाड यांनी तर समारोप कॉ. मधुकर नरसिंगे यांनी केला.

्टू

महापरिनिर्वाण दिन हे आपल्याला वेदनादायक इतिहास आणि गौरवशाली भविष्य यांच्यातील पूल दाखवतो. संघर्षाच्या राखेतून उभ्या राहि...
06/12/2025

महापरिनिर्वाण दिन हे आपल्याला वेदनादायक इतिहास आणि गौरवशाली भविष्य यांच्यातील पूल दाखवतो. संघर्षाच्या राखेतून उभ्या राहिलेल्या पिढ्यांना त्यांनी ज्ञानाची शिदोरी दिली. आजही अनेक लढाया बाकी आहेत, पण दिशा स्पष्ट आहे.

कामगार-कष्टकऱ्यांचे लढवय्ये नेतेकॉ. काशिनाथ आळवणी यांच्या 12 व्या स्मृतिदिनानिमित्तविनम्र अभिवादन आणि क्रांतिकारी सलाम.क...
30/11/2025

कामगार-कष्टकऱ्यांचे लढवय्ये नेते
कॉ. काशिनाथ आळवणी यांच्या 12 व्या स्मृतिदिनानिमित्त
विनम्र अभिवादन आणि क्रांतिकारी सलाम.

कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर झटणाऱ्या या निर्भय नेतृत्वाचे योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या संघर्षशील विचारांमधून आजही श्रमिक चळवळीला दिशा आणि प्रेरणा मिळते.
त्यांनी दाखवलेल्या तत्त्वनिष्ठ मार्गावर चालत राहणे, हीच त्यांना खरी आदरांजली.

समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा देणारे सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित...
28/11/2025

समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा देणारे सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र आदरांजली.🚩



४ श्रमसंहिता विरोधातील निषेध सभा | मुंबईमुंबईत कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४ श्रमस...
27/11/2025

४ श्रमसंहिता विरोधातील निषेध सभा | मुंबई

मुंबईत कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४ श्रमसंहिता विरोधातील निषेध सभेत कॉम्रेड उदय भट यांनी महत्त्वपूर्ण भाषण केले.

या सभेत विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सर्वांनी एकत्रितपणे सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात आवाज उठवला आणि कामगार हितासाठी पुढील काळात अधिक प्रभावी पातळीवर लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

केंद्र सरकारने कामगार, शेतकरी आणि कर्मचार्‍यांच्या हक्कांना बाधा आणणाऱ्या 4 श्रमसहिंता लागू करण्याच्या निर्णयाचा तीव्र न...
27/11/2025

केंद्र सरकारने कामगार, शेतकरी आणि कर्मचार्‍यांच्या हक्कांना बाधा आणणाऱ्या 4 श्रमसहिंता लागू करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध म्हणून कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या संयोजनाने आयोजित करण्यात आलेले निदर्शन काल, बुधवार २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे यशस्वीपणे पार पडले.

या निदर्शनात महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ आणि पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमिक हितांचे मुद्दे ठामपणे मांडले.

भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!आजचा दिवस आपल्याला लोकशाहीची खरी ताकद आणि नागरिकत्वाची जाणीव देतो.भारतीय संवि...
26/11/2025

भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आजचा दिवस आपल्याला लोकशाहीची खरी ताकद आणि नागरिकत्वाची जाणीव देतो.
भारतीय संविधानाने देशाच्या शासनव्यवस्थेला दिशा दिली आणि प्रत्येक नागरिकाला हक्कांसोबत कर्तव्यांचीही समान जाणीव करून दिली.
आपल्या संविधानाने समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही मूलभूत तत्त्वे आपल्या जीवनात रुजवली आहेत.
आजच्या दिवशी या मूल्यांचे पालन करण्याची नवी प्रतिज्ञा करूया.

कामगार वर्गाच्या हक्कांसाठी आयुष्यभर झटणारे आणि अनेकांना प्रेरणा देणारे पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त)...
20/11/2025

कामगार वर्गाच्या हक्कांसाठी आयुष्यभर झटणारे आणि अनेकांना प्रेरणा देणारे पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे संस्थापक सरचिटणीस कॉ. अप्पासाहेब भोसले यांच्या 23 व्या स्मृतिदिनानिमित्त, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांना आदरपूर्वक अभिवादन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे महानगरपालिकेतील कष्टकरी कामगारांच्या मुला-मुलींना शिष्यवृत्ती देण्यात आली. शिक्षणासाठी धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही मदत खरोखर उपयोगाची ठरली. त्यांच्या पुढच्या प्रवासाला यातून नवी ताकद मिळाली.

अप्पासाहेबांच्या कामाची आणि विचारांची आठवण ठेवत, आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती आधार देते. ही फक्त मदत नाही, तर अप्पासाहेबांनी जपलेल्या मूल्यांना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा अर्थपूर्ण प्रयत्न आहे.

या कार्यक्रमाला महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सत्य घटनेवर आधारित प्रसिद्ध (आता थांबायचं नाय) या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवराज वायचळ, ज्येष्ठ शास्त्रज्ञ नॅनो टेक्नॉलॉजीच्या विशेष अभ्यासक डॉ. सुलभा कुलकर्णी, दिग्दर्शक मयूर शितोळे, जनरल सेक्रेटरी कॉ. मुक्ता मनोहर, अध्यक्ष कॉ. उदय भट तसेच अप्पासाहेब भोसले यांचे नातू सत्यजित भोसले उपस्थित होते. त्यांनी मुलांशी संवाद साधला, मार्गदर्शन केले आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरण आणखी सकारात्मक आणि उत्साहपूर्ण झाले.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान, पालकांचा आनंद आणि सगळ्यांचा सहभाग. त्यामुळे हा सोहळा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता एक उबदार, प्रेरणादायी अनुभव बनला.

कार्यक्रमाची प्रस्तावना कॉ. मधुकर नरसिंगे (कार्याध्यक्ष) यांनी मनपूर्वक मांडली.
सुत्रसंचालन कॉ. वैजीनाथ गायकवाड यांनी सहज आणि प्रभावी पद्धतीने केले.
आणि समारोप कॉ. दिलीप कांबळे यांनी आभार आणि सकारात्मक संदेश देत केला.

13/11/2025

किमान 9 हजार रुपये पेन्शन द्या; पेंशनधारकांनी केले मुबंई येथे आझाद मैदानात धरणे यावेळी बोलताना यावेळी कॉ. अतुल दिघे.

सर्व श्रमिक संघटना इ. पी. एस. ९५ संलग्न अखिल भारतीय इ. पी. एस. ९५ पेन्शन समन्वय समितीच्यावतीने पेंशनधारकांच्या विविध मागण्यांसाठी यात किमान ९ हजार रुपये. मासिक पेन्शन द्यावी या व अन्य मागण्यांसाठी काल ११ नोव्हेंबर २०२५ रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यपालांना निवेदनही देण्यात आले.

किमान 9 हजार रुपये पेन्शन द्या; पेंशनधारकांनी केले मुबंई येथे आझाद मैदानात धरणेसर्व श्रमिक संघटना इ. पी. एस. ९५ संलग्न अ...
13/11/2025

किमान 9 हजार रुपये पेन्शन द्या; पेंशनधारकांनी केले मुबंई येथे आझाद मैदानात धरणे

सर्व श्रमिक संघटना इ. पी. एस. ९५ संलग्न अखिल भारतीय इ. पी. एस. ९५ पेन्शन समन्वय समितीच्यावतीने पेंशनधारकांच्या विविध मागण्यांसाठी यात किमान ९ हजार रुपये. मासिक पेन्शन द्यावी या व अन्य मागण्यांसाठी काल ११ नोव्हेंबर २०२५ रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यपालांना निवेदनही देण्यात आले.

१) किमान ९००० रु. पेन्शन त्यावर महागाई भत्ता द्या.
२) सर्व पेन्शनधारक व त्यांच्या पत्नीला मोफत आरोग्य सुविधा द्या.
3) जेष्ठ नागरिक या नात्याने पेन्शन धारकांना रेल्वे भाड्यात सवलत द्या.
4) पेन्शन धारकाला अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभ द्या. या मागण्या या आंदोलना प्रसंगी करण्यात आल्या.
यावेळी कॉ. अतुल दिघे, कॉ.उदय भट, कॉ.बी.के.आंब्रे, कॉ.अनंत मालप, कॉ. शिवाजी ढवळे, कॉ.गोपाळ पाटील, कॉ. धोंडीराम कुंभार, कॉ. आप्पा कुलकर्णी, कॉ. विठ्ठल मोरे, कॉ. संतोष मोरे, कॉ. दिगंबर जोशी, अनंत दाभोलकर, कॉ. बशीर इत्यादीनी भाषणं केली.

सर्व कामगार बांधवांना प्रकाशमय आणि आनंदी दिवाळीच्या शुभेच्छा!🪔 #दिवाळी
21/10/2025

सर्व कामगार बांधवांना प्रकाशमय आणि आनंदी दिवाळीच्या शुभेच्छा!🪔

#दिवाळी



10/10/2025

Address

Pune
411005

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, संलग्न - एक्टू posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share