SFI Pune Official

SFI Pune Official Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SFI Pune Official, B. 3/4/5/Umashankar Complex, 594, Narayan Peth, Near Kanyashala, Pune.

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) पुणे सर्वांसाठी सुलभ, समावेशक आणि दर्जेदार शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही विद्यार्थी कल्याण, सामाजिक न्याय चळवळीमध्ये सक्रियपणे सहभागी होतो आणि प्रगतीशील मूल्ये, लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देतो.

16/08/2026

शासन निर्णय रद्द करा _ अन्यथा तीव्र आंदोलन

14/08/2026

Happy Independence Day

14/08/2026
14/08/2026

आदिवासी वसतिगृहांची सुधारित नियमावली तात्काळ रद्द करण्यासाठी एसएफआय चे घोडेगाव प्रकल्प कार्यालयाच्या बाहेर आंदोलन (दि.१४/०८/२०२६)

#आदिवासी #वसतिगृह #शासननिर्णय

आदिवासी वसतिगृहांची सुधारित नियमावली तात्काळ रद्द करा; अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन – एसएफआयघोडेगाव : महाराष्ट्र शासनाच्य...
14/08/2026

आदिवासी वसतिगृहांची सुधारित नियमावली तात्काळ रद्द करा; अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन – एसएफआय

घोडेगाव : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी शासकीय आदिवासी वसतिगृहांसाठी जारी केलेली सुधारित नियमावली आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अधिकारावर गदा आणणारी आहे. हा विद्यार्थी विरोधी शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी आक्रमक मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय), पुणे जिल्हा समितीने केली आहे.
एसएफआयच्या प्रमुख मागण्या:
• पदव्युत्तर व संशोधक विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा ३० वर्षे करावी आणि पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा ₹२.५० लाखांवरून किमान ₹६ लाख करावी.
• ५ ते १५ किमी अंतराची अट, विवाहित विद्यार्थ्यांना प्रवेश बंदी, तसेच एका पदवीनंतर दुसऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश न देण्याचे नियम रद्द करावेत. दोन वर्षांचा शैक्षणिक गॅप असलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिज्ञापत्राच्या आधारे प्रवेश द्यावा.
• तांत्रिक अडचणींमुळे दुर्गम भागातील विद्यार्थी वंचित राहू नयेत म्हणून १५ दिवसांची दुरुस्ती मुदत, एसएमएस सूचना व मदत केंद्र सुरू करावीत.
• विद्यार्थ्यांना दरमहा ₹४,००० निर्वाह भत्ता, विद्यार्थिनींना अतिरिक्त ₹५०० स्वच्छता भत्ता, तर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनुक्रमे ₹१,५०० आणि ₹२,५०० गणवेश भत्ता द्यावा.
• विद्यार्थिनींची अपमानकारक तपासणी व ‘मासिक पाळी नोंदवही’ची तरतूद तात्काळ रद्द करावी. आजारी विद्यार्थ्यांसाठी विलगीकरण कक्ष व मोफत उपचार द्यावेत, त्यांना आजार आहे म्हणून प्रवेश रद्द करू नये.
• ई-लायब्ररी, उच्चगती इंटरनेट, व्यायामशाळा, रिक्त पदांची भरती, शिष्यवृत्तीचे तात्काळ वितरण करावे. तसेच विद्यार्थ्यांचे संघटन व अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवावे.
आदी मागण्या एसएफआय ने आपल्या निवेदनात केलेल्या आहेत. सबंधित मागण्यांचा संदर्भात सहाय्यक प्रकल्प अधिकारी मा. संदिप पाटील यांच्या सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी ‘मागण्यांबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे त्वरित पाठपुरावा करण्याचे आश्वासन’ एसएफआय च्या प्रतिनिधींना दिले.

दि. ५ ऑगस्ट २०२६ चा विद्यार्थीविरोधी शासन निर्णय तात्काळ रद्द करून वरील मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा एसएफआयच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प कार्यालये, अपर आयुक्त कार्यालये व आदिवासी वसतिगृहांसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच राज्यभर या शासन निर्णयाची होळी करण्यात येईल. याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन व आदिवासी विकास विभागाची राहील, असा इशारा यावेळी एसएफआय चे पुणे जिल्हा सचिव अक्षय घोडे यांनी दिला आहे.

यावेळी एसएफआय चे राज्य उपाध्यक्ष नवनाथ मोरे, राज्य सहसचिव निशा साबळे , एसएफआय चे पुणे जिल्हाध्यक्ष संस्कृती गोडे, सचिव अक्षय घोडे , आंबेगाव तालुकाध्यक्ष समीक्षा केदारी, सचिव रोहिदास फलके, मयूर हिले, प्रियंका गोडे, आकाश खामकर, कुणाल दाभाडे,प्रिया पारधी व इतर विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

SFI - Students' Federation of India

आज युवा - विद्यार्थी निर्धार सभा | पुणे
13/08/2026

आज
युवा - विद्यार्थी निर्धार सभा | पुणे

12/08/2026

युवा - विद्यार्थी निर्धार सभा | पुणे | दि.१३ ऑगस्ट,२०२६
SFI Maharashtra SFI Pune City SFI - Students' Federation of India SFI Ambegaon Taluka

९ ऑगस्ट - जागतिक आदिवासी दिन !सर्वांना SFI महाराष्ट्र राज्य कमिटी तर्फे हार्दिक शुभेच्छा !* आदिवासी विशेष पदभरती झालीच प...
09/08/2026

९ ऑगस्ट - जागतिक आदिवासी दिन !
सर्वांना SFI महाराष्ट्र राज्य कमिटी तर्फे हार्दिक शुभेच्छा !

* आदिवासी विशेष पदभरती झालीच पाहिजे!
* विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारी सेंट्रल किचन पद्धती बंद करा!
* आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांचा दर्जा सुधारा!

TET पेपरफुटी प्रकरणी २९ जून 2026  स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे येथे आंदोलन ...
05/08/2026

TET पेपरफुटी प्रकरणी २९ जून 2026 स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे येथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात दिलेल्या लेखीनुसार आज दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी मा. आयुक्त महशे चोथे यांच्या उपस्थितीत एसएफआय च्या शिष्टमंडळाची बैठक संपन्न झाली.

यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, परिषदेच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, तसेच परिक्षा पारदर्शक परिक्षा घेण्यात यावी, TET परिक्षा पध्दती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी, परिक्षांचे आऊटसोर्सिंग बंद करावे, पुन्हा TET परिक्षा देणाऱ्या परिक्षार्थींना मोफत बस व रेल्वे प्रवास उपलब्ध करून देण्यात यावा, आदी मागण्या आग्रहाने मांडण्यात आले. तसा पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

यावेळी शिष्टमंडळात एसएफआय चे राज्य उपाध्यक्ष नवनाथ मोरे, जिल्हा अध्यक्षा संस्कृती गोडे, शहर उपाध्यक्ष आदित्य कासारे, पुणे विद्यापीठ सचिव निकिता मेचकर, जिल्हा कमिटी सदस्य मयुर हिले, अभिषेक शिंदे, पवन जाधव आदी उपस्थित होते.

राज्यव्यापी इंकलाब मार्च , पुणे राज्यभरातील विद्यार्थी युवक पुण्यात येणार स्वागत आहे.इंकलाब जिंदाबाद!  #धर्मेंद्र_प्रधान...
25/07/2026

राज्यव्यापी इंकलाब मार्च , पुणे
राज्यभरातील विद्यार्थी युवक पुण्यात येणार स्वागत आहे.
इंकलाब जिंदाबाद!

#धर्मेंद्र_प्रधान_राजीनामा_झालाच_पाहिजे
#दादा_भुसे_राजीनामा_द्या #जंतर_मंतर #पुणेकर

Address

B. 3/4/5/Umashankar Complex, 594, Narayan Peth, Near Kanyashala
Pune
411030

Telephone

+918788043788

Alerts

Be the first to know and let us send you an email when SFI Pune Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to SFI Pune Official:

Shortcuts

Share