चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाज पनवेल

  • Home
  • India
  • Panvel
  • चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाज पनवेल

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाज पनवेल श्री लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्ट
शिवाजी रोड ,प्रभु आळी, पनवेल-४१० २०६
ए /८४ आर
(कार्य

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाज
श्री लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्ट
शिवाजी रोड ,प्रभु आळी, पनवेल-४१० २०६
फोन : २७४९१०३२
ए /८४ आर
(कार्यालयीन वेळ स.९ ते १ व सा. ४.३० ते ८.३०)
दिनांक: २१/०६/२०१७
आवाहन

प्रति,
समस्त पनवेलकर सी.के.पी ज्ञातीबांधव आणि भगिनीनो

आपण सर्व पनवेलकर ज्ञातीबांधव आणि भगिनींना कळवण्यास आम्हाला आनंद होत आहे कि २०१९ सालच्या रायगड विभागीय मेळाव्याचे यजमानपद आपण स्वीकारले आहे आणि त्य

ा अनुसार हा मेळावा दि.६/१/२०१९ रोजी पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे स्टेडियम येथे घेण्याचे ठरवले आहे.
हा मेळावा फक्त आणि फक्त आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागानेच यशस्वी होणार आहे आणि याची सुरूवात म्हणून आम्ही पनवेलकर न्याती बांधवानकडून आपल्या संकल्पना किंवा एक दिवसीय मेळाव्याचे स्वरूप कसे असावे संबंधित सूचना व आपले मार्गदर्शन घेण्याचे ठरविले आहे. आपण सर्व जण विविध कार्यक्रम, अधिवेशन, मेळावे याला जात असतो तिथे पाहिलेले काही उपक्रम काही संकल्पाना आपल्याला भावलेल्या असतात तर आता हिच संधी आहे कि आपल्या विभागीय मेळाव्यात त्याचा अंतर्भाव करून हा सोहळा दैदिप्यमान व यशस्वी करण्याचा.
आपल्या ह्या उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद द्याल याची आम्हाला खात्रीच आहे. आपल्या या सूचनां बरोबरच आपण कशाप्रकारे या मेळाव्याचा नियोजनात सहभागी होऊ शकता तेही आपण लिहावे जेणे करून आपला सहभाग हा आपली आवड असलेल्या कमिटीत झाल्यास मेळावा यशस्वी होण्यास ते जास्ती फायद्याचे आणि योग्य ठरलं.
मेळावा यशस्वी होण्यासाठी आर्थिक पाठबळा बरोबरच कार्यकर्त्याचा सक्रीय सहभाग तेवढाच महत्वाचा असतो आणि हे दोन्ही हि पाठबळ आपल्याला भरभरून मिळेल याची आम्हाला खात्री आहे. तर चला मंडळी उचला आपली कायस्थांची निशाणी ......... लेखणी आणि उतरवा आपल्या कल्पना, सूचना कागदावर
आम्ही आपल्या सूचनांची वाट पहातोय

आपला विश्वासु
सी.के.पी समाज, पनवेल

अध्यक्ष
श्री.आशिष अरुण गुप्ते

 # गुरुवार दिनांक २६/०३/२६@ रोजी दुपारी १२ वाजता पनवेल सी के पी समाजाच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात श्री राम जन्मोत्सव ...
19/04/2026

# गुरुवार दिनांक २६/०३/२६@ रोजी दुपारी १२ वाजता पनवेल सी के पी समाजाच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला #

सोमवार दिनांक ०२/०३/२०२६ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता श्री लक्ष्मीनारायण मंदिरासमोर, पनवेल सीकेपी समाजा कडून होळी पेटवण्या...
07/03/2026

सोमवार दिनांक ०२/०३/२०२६ रोजी संध्याकाळी ७:३० वाजता श्री लक्ष्मीनारायण मंदिरासमोर, पनवेल सीकेपी समाजा कडून होळी पेटवण्यात आली.

सीकेपी सोशल क्लब ठाणे येथे झालेल्या  #मराठी_राजभाषा_गौरव_दिना # निमित्त नाट्य अभिवाचन स्पर्धा दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ ...
07/03/2026

सीकेपी सोशल क्लब ठाणे येथे झालेल्या #मराठी_राजभाषा_गौरव_दिना # निमित्त नाट्य अभिवाचन स्पर्धा दिनांक २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाणे येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये समूह गटात प्रथम पारितोषक #स्नेहश्री_सीकेपी_महिला_मंडळ व द्वितीय पारितोषक #सीकेपी_समाज_पनवेल मिळाले.

दोन्ही गटांचे खूप खूप अभिनंदन

श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त 28 जानेवारीला 26 श्री सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली.  श्री राज...
07/03/2026

श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त 28 जानेवारीला 26 श्री सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली. श्री राजू गुप्ते दरवर्षी हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करतात. यावर्षी श्री नरेंद्र रणदिवे व सौ नीला रणदिवे यांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. सौ मुक्ताताई गुप्ते यांनी त्यांच्या घरून पूजेचा प्रसाद करून आणला. सौ निशा चौबळ यांनी नैवेद्य करून आणला. सौ योगिनी गडकरी यांनी पूजेसाठी पंचामृत केले. पूजेसाठी सर्वांची मदत झाली. श्री सत्यनारायणाच्या पूजेला ज्ञाती बंधू भगिनींची अतिशय चांगली उपस्थिती होती. सर्वज्ञाती बंधू भगिनींचे व ज्या सर्वांनी मदत केली त्या सर्वांचे खूप खूप आभार.

सीकेपी समाज पनवेल

दिवाळी निमित्त पनवेल सीकेपी समाजा कडून ११/१२ ऑक्टोबर २५ ला दिवाळी फराळ व गृहपयोगी वस्तूंची विक्री व प्रदर्शन भरवण्यात आल...
16/10/2025

दिवाळी निमित्त पनवेल सीकेपी समाजा कडून ११/१२ ऑक्टोबर २५ ला दिवाळी फराळ व गृहपयोगी वस्तूंची विक्री व प्रदर्शन भरवण्यात आले होते.
श्री नितीन शृंगारपुरे (भांडुप) आणि श्री सुरेंद्र प्रधान यांच्या शुभहस्ते याचे उद्घाटन झाले. श्री नितीन शृंगारपुरे यांनी या प्रदर्शनासाठी स्पॉन्सरशिप दिली , सीकेपी समाजातर्फे त्यांचे खूप खूप आभार...

बंधू-भगिनीं ना नमस्कार 🙏🏻दिवाळी निमित्त पनवेल सीकेपी समाजा कडून ११/१२ ऑक्टोबर २५ ला म्हणजेच शनिवार / रविवार श्री लक्ष्मी...
08/10/2025

बंधू-भगिनीं ना नमस्कार 🙏🏻
दिवाळी निमित्त पनवेल सीकेपी समाजा कडून ११/१२ ऑक्टोबर २५ ला म्हणजेच शनिवार / रविवार श्री लक्ष्मीनारायण देवळाच्या आवारात दिवाळी फराळ आणि इतर गृहोपयोगी वस्तूंचा स्टॉल ठेवत आहेत.
आपल्या भगिनींच्या स्टॉलवर प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी शिवाय आपल्या नातेवाईकांना मित्र-मैत्रिणींना सुद्धा येण्यास सांगावे.

सीकेपी समाज पनवेल कोजागिरी 2025 @ हौजी।गेम मधील काही निवडक विजेते
08/10/2025

सीकेपी समाज पनवेल कोजागिरी 2025 @ हौजी।गेम मधील काही निवडक विजेते

सीकेपी समाज पनवेल, श्री लक्ष्मीनारायण मंदिर न्यास.नवरात्री निमित्त देवळात आरत्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.दिनांक २२ सप्ट...
03/10/2025

सीकेपी समाज पनवेल, श्री लक्ष्मीनारायण मंदिर न्यास.
नवरात्री निमित्त देवळात आरत्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.
दिनांक २२ सप्टेंबर २५ ते ०१ ऑक्टोबर २५.

CKP Samaj Panvel Ganesh utsav 2025
03/10/2025

CKP Samaj Panvel Ganesh utsav 2025

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाज पनवेल. श्री लक्ष्मीनारायण मंदिर न्यास.श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा २०२५@१५_१६/०८/२०२५.गोपाळ क...
22/08/2025

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाज पनवेल. श्री लक्ष्मीनारायण मंदिर न्यास.
श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा २०२५@१५_१६/०८/२०२५.गोपाळ काला@मानाची हंडी@बाळ गोपाळ दही हंडी.

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाज पनवेल. श्री लक्ष्मीनारायण मंदिर न्यास.श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा २०२५@१५/०८/२५
22/08/2025

चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाज पनवेल. श्री लक्ष्मीनारायण मंदिर न्यास.
श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा २०२५@१५/०८/२५

Address

Shri. Laxmi Naryan Trust Prabhu Aali
Panvel
410206

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

02227491032

Alerts

Be the first to know and let us send you an email when चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाज पनवेल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाज पनवेल:

Share