Vachanvel - The Palghar Book Club

Vachanvel - The Palghar Book Club Book lovers unite! Join वाचनवेल: The Palghar Book Club for lively discussions, literary exploration

'वाचनवेल' सह सुरू झालेली सकाळ ही नेहमीच खास असते. आज हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यानात कोवळ्या उन्हाच्या लपा...
09/11/2025

'वाचनवेल' सह सुरू झालेली सकाळ ही नेहमीच खास असते. आज हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यानात कोवळ्या उन्हाच्या लपाछपतीत वाचनप्रेमींनी पुस्तकांच्या सहवासाचा मनमुराद आनंद लुटला. 📚☀️

यावेळी रोटरी क्लब ऑफ पालघर चे श्री. भूषण सावे सर आणि श्री. निनाद सावे सर यांनी आवर्जून उपस्थित राहून उपक्रमाविषयी सविस्तर माहिती घेतली. वाचनवेल अधिक फुलावी, बहरावी यासाठी त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य निश्चितच मोलाचे ठरेल असा आमचा विश्वास आहे. 🌿

वाचनवेलचे नियमित वाचक आणि मार्गदर्शक ॲड. राहुल ठाकरे सर यांनी संविधानाची प्रत भेट देत, वाचनवेलच्या पुस्तकविश्वात एक मौल्यवान भर घातली. राहुल सर, तुमच्या या प्रेरणादायी कृतीबद्दल मनःपूर्वक आभार!



भावनांनी ओथंबलेले नभ आज कवितांच्या स्वरांतून बरसले...!सोनपंत दांडेकर महाविद्यालय आणि वाचनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आ...
24/08/2025

भावनांनी ओथंबलेले नभ आज कवितांच्या स्वरांतून बरसले...!

सोनपंत दांडेकर महाविद्यालय आणि वाचनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या "नभं उतरु आलं" या ना. धों. महानोर यांच्या कवितांवर आधारित मैफल आपल्या सर्वांचे लाडके कवी अरुण म्हात्रे यांनी गाजवली. शब्दांच्या ओलाव्यातून नितळ हास्य फुलवण्याची जादू काय असते हे आज आम्ही अनुभवले.

या कार्यक्रमादरम्यान खगोलप्रेमी लेखक चंद्रकांत घाटाळ यांचे 'बिन आडनावाची पोरी' आणि 'अनुराधा इंदुलकर' या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या मराठी वाङमयाचे देखील उद्घाटन झाले. त्याद्वारे आपल्याला वर्षभर साहित्य पर्वणी अनुभवायला मिळणार आहे.

आज तुडुंब भरलेले सभागृह पाहून खरंच आनंद झाला. मान्यवरांचे आणि साहित्य रसिकांचे मनापासून आभार 🙏🏼

वाचनवेल

सविस्तर वृतांत लवकरच...

ज्या रसिक प्रेक्षकांना या कार्यक्रमास येणे शक्य झाले नाही, त्यांना पुढील लिंकवर संपूर्ण कार्यक्रम पाहता येणार आहे. उशिरा का होईना पण भावनांच्या कोमल सरींचा आनंद घेता येणार आहे. 😊

https://www.youtube.com/live/hAFI_heKa2o?si=EywgFuoHnjJvpzGq

#काव्यमैफल #नभं_उतरू_आलं #अरुण_म्हात्रे #वाचनवेल #सोनोपंत_दांडेकर_महाविद्यालय

03/08/2025

🔭 कुतूहल – ज्ञानाच्या दुर्बिणीतून विज्ञानाच्या कथा!

वाचनवेल🌿 द पालघर बुक क्लबच्या उपक्रमांतर्गत आज आर्यन हायस्कूल, पालघर येथे पार पडलेल्या विशेष विज्ञान सत्रात विज्ञानलेखक आणि अनुजा अवकाश संस्थेचे संस्थापक चंद्रकांत घाटाळ यांनी विद्यार्थ्यांना दोन विज्ञानकथा सांगितल्या. एक📘 “-बिन आडनावाची पोरी ही कथा ग्रामीण व एकूणच समाजातील त्या काळातील भुताटकी सारख्या अंधश्रद्धेवर आधारित होती.जी राज्य पातळीवरील कथास्पर्धेत प्रथम क्रमांकाने निवडली गेली आहे. तर दुसरी कथा 'डम्पी' कथासंग्रहा मधील 'चंद्रावर आरसा धरला तर काय होईल' या संबंधीचे कुतूहल जागविणारी होती.

🎤सुप्रिया पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात वाचन वेल ची सविस्तर माहिती दिली.
शाळेतर्फे माधवी माधवी राऊत मॅडम यांनी स्वागत केले आणि सुनिता घुगे(पर्यवेक्षिका) मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.
वाचनवेल तर्फे प्रत्येक विद्यार्थाला झेंडूचे रोपटे🌱 भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत च्या या उपक्रमांतून भावी वाचक तयार होतील आणि वाचन वेल च्या पुस्तक वाचन उपक्रमा मध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा वाचनवेल च्या सदस्या सुप्रिया पाटील यांनी व्यक्त केली.
👩‍🏫 कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका, इतर शिक्षकवर्ग, वाचनवेलचे सदस्य आणि नियमित वाचक उपस्थित होते.

💐 घाटाळ सरांचे आणि आर्यन हायस्कूल शाळेचे विशेष आभार!

आम्ही आजी आजोबांमध्ये विठ्ठल रखुमाईची सावली पाहिली❤️"वाचनाची वारी, आजी आजोबांच्या दारी" वाचनवेलचे हे विशेष सत्र पालघर ये...
07/07/2025

आम्ही आजी आजोबांमध्ये विठ्ठल रखुमाईची सावली पाहिली❤️

"वाचनाची वारी, आजी आजोबांच्या दारी" वाचनवेलचे हे विशेष सत्र पालघर येथील "आनंद वृद्धाश्रम" येथे संपन्न झालं. आम्हाला आमचं आजोळ अनुभवायची संधी दिली त्यासाठी ट्रस्टच्या संचालिका मनिषा कोटक मॅडम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. आजी आजोबांकडून हट्टाने गोष्ट ऐकून घेणारी आम्ही नातवंड काल मात्र गप्पा गोष्टी, नाच गाणी, भजनात रमलो. आर्यन हायस्कूलच्या शिक्षिका आणि कवयित्री प्रीती भोई मॅडम यांच्या सादरीकरणाने सर्वांना खिळवून ठेवले. आजी आजोबांनी उत्स्फूर्तपणे आपली कला सादर करत बालपण अनुभवलं. वाचनवारीचा हा सोहळा थेट विठ्ठलाच्या चरणी लीन झाला.

वाचनवेलच्या उपक्रमाला ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळाला. आम्ही भरून पावलो🙏📚🌿

आपल्याला इतकं निवांत करण्याचं सामर्थ्य फक्त निसर्गात आणि पुस्तकांत असतं. तुम्हाला पटतंय का? 🌿📚📖रविवार, १ जून, २०२५ | वेळ...
30/05/2025

आपल्याला इतकं निवांत करण्याचं सामर्थ्य फक्त निसर्गात आणि पुस्तकांत असतं. तुम्हाला पटतंय का? 🌿📚📖

रविवार, १ जून, २०२५ | वेळ: सकाळी ८.३० ते १०.००

ठिकाण:
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यान, भगिनी समाज शाळेसमोर, पालघर

पावसाची चाहूल, वाफाळता चहा आणि हातात पुस्तक!आणखी काय हवं? 😍🌧️📚☕१ जून, २०२५ | वेळ: सकाळी ८.३० ते १०.००ठिकाण:हिंदुहृदयसम्र...
28/05/2025

पावसाची चाहूल, वाफाळता चहा आणि हातात पुस्तक!
आणखी काय हवं? 😍🌧️📚☕

१ जून, २०२५ | वेळ: सकाळी ८.३० ते १०.००

ठिकाण:
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यान, भगिनी समाज शाळेसमोर, पालघर

17/05/2025

वाचनात दंगलेला एक निवांत क्षण स्वतःसाठी...!

पुढील बालक पालक विशेष सत्र उद्या १८ मे, २०२५ रोजी पुन्हा एकदा रंगणार आहे. तुम्ही आपल्या पाल्यांना घेऊन येताय ना?

वेळ: सकाळी ८.३० ते १०.००
ठिकाण: सोनोपंत दांडेकर महाविद्यालय प्रांगण, पालघर

14/05/2025

मागच्या वेळी वाचनवेलच्या विशेष सत्रात प्रा. विवेक कुडू सरांनी गप्पागोष्टींची रंगतदार मैफल सजवली. नारळाच्या झाडांनी देखील रांगेत बसून त्यात सहभाग नोंदवला🌴🌿📚

पुढील बालक पालक विशेष सत्र येत्या १८ मे, २०२५ रोजी पुन्हा एकदा रंगणार आहे. तुम्ही आपल्या पाल्यांना घेऊन येताय ना?

वेळ: सकाळी ८.३० ते १०.००
ठिकाण: सोनोपंत दांडेकर महाविद्यालय प्रांगण, पालघर

वाचनवेलच्या उन्हाळी सुट्टी विशेष "बालक-पालक" वाचन सत्राची लोकसत्ता वृत्तपत्राने घेतलेली दखल...!Loksatta                 ...
08/05/2025

वाचनवेलच्या उन्हाळी सुट्टी विशेष "बालक-पालक" वाचन सत्राची लोकसत्ता वृत्तपत्राने घेतलेली दखल...!

Loksatta

इथे वाऱ्याची गाणी होतातपक्षांची किलबिलाट फांद्यावर झुलते शब्दांच्या कथा पानांवर उतरतातआणि वाचकांचे मन कथेत मुरते...!    ...
04/05/2025

इथे वाऱ्याची गाणी होतात
पक्षांची किलबिलाट फांद्यावर झुलते
शब्दांच्या कथा पानांवर उतरतात
आणि वाचकांचे मन कथेत मुरते...!

03/05/2025

आपल्या आजीची गोष्टीची पोतडी उघडली की, आपण त्या विश्वात रमायचो. डोळे बंद करून कधी फुलपाखरांसोबत हिंडायचो, तर कधी पाठी शेपटी लावून वानरसेनेत सहभागी व्हायचो.

"बालक पालक" वाचन सत्रादरम्यान अशाच गोष्टींचा खजिना घेऊन लेखक प्रा. विवेक कुडू सर मुलांशी सकाळी ९.३० ते १० यावेळेत गप्पा करणार आहेत.

आपल्या मुलांना घेऊन येताय ना?

दिनांक: ४ मे २०२५
वेळ: सकाळी ८.३० ते १०.००
ठिकाण सोनोपंत दांडेकर महाविद्यालय प्रांगण, पालघर


झाडाच्या सावलीत बसून पुस्तक वाचण्याचे सुख काय असते याचा अनुभव आपल्या पाल्याला नक्की द्या🙂बालक - पालक या सत्रात छोट्या वा...
02/05/2025

झाडाच्या सावलीत बसून पुस्तक वाचण्याचे सुख काय असते याचा अनुभव आपल्या पाल्याला नक्की द्या🙂

बालक - पालक या सत्रात छोट्या वाचकांना आपल्याला सामावून घ्यायचे आहे. त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी आपण पुढाकार घेऊयात. आपल्या घरातील, परिसरातील लहान मुलांना नक्की घेऊन या!

दिनांक : ४ मे, २०२५
*वेळ: सकाळी ८.३० ते १०.००*
ठिकाण : सोनोपंत दांडेकर महाविद्यालय प्रांगण, पालघर

(उन्हाची दाहकता पाहता, सर्वांशी विचारविनिमय करून आपल्या सत्राची वेळ बदलली आहे याची सर्व वाचनप्रेमींनी नोंद घ्यावी 😊)

Address

Palghar
401404

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vachanvel - The Palghar Book Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share