31/08/2024
धाराशिवचे नवीन पोलीस अधीक्षक संजय जाधव साहेबांची भेट व चर्चा...!
धाराशिव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नुकतेच पदभार घेतलेल्या संजय जाधव साहेबांची भेट घेऊन त्यांचं स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यात एकता फाउंडेशन वतीने एकता परिवाराचे सदस्य श्री.अतुल जगताप व श्री.सचिव अभिलाष लोमटे यांनी जाधव साहेबांचे जिल्ह्यात स्वागत केले.
धाराशिव जिल्हा प्रेमळ आणि संस्कृती, परंपरा जपणारा जिल्हा आहे. येथील नागरिक कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणारे आहेत. त्यामुळे, नागरिक आणि #एकता_फाउंडेशन चे पदाधिकारी यांनी जाधव साहेबांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच, आगामी गणेशोत्सवासाठी देखील पोलीस यंत्रणांना एकता परिवार सर्व ते सहकार्य करेल, असे आश्वस्त केले.
Abhilash Lomate Dharashiv Police
- Ekta Foundation, Dharashiv - एकता फाऊंडेशन,धाराशिव