26/03/2026
नमस्कार,
शुक्रवार, दिनांक 27/03/2026 रोजी सकाळी 10:00 वाजता “ Ananta Tower Handa Morcha” चे आयोजन केले आहे.
हा मोर्चा आपल्या दोन्ही फेजच्या मध्य भागातून सुरू होणार आहे. पाणी ही अत्यंत गंभीर आणि तातडीची समस्या बनली आहे. गेल्या एक वर्षापासून CIDCO कडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे आपण सर्वजण त्रस्त आहोत. पुढे येणारा कडाक्याचा उन्हाळा लक्षात घेता ही समस्या अजूनच बिकट होणार आहे.
आपण सर्व रहिवासी – मालक तसेच भाडेकरू – यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोर्चाला पाठिंबा द्यावा, ही नम्र विनंती. रोज पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ आपण सर्व अनुभवत आहोत. त्यामुळे “आज घरी पाणी आले नाही” असे समजून खाली उतरून आपल्या एकजुटीची ताकद CIDCO प्रशासनाला दाखवूया.
*👉 मोर्चाचे स्वरूप:*
दिनांक: 27/03/2026 (शुक्रवार)
वेळ: सकाळी 9:00 वाजल्यापासून जमणे (मोर्चा 10:00 वाजता सुरू)
मार्ग: अनंता टॉवर येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक उलवे मार्गे उन्नती सोसायटीजवळील CIDCO कार्यालयापर्यंत
*👉 महत्त्वाच्या सूचना:*
• सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे
• शिस्त आणि शांतता राखावी
• शक्य असल्यास पाण्याचे रिकामे हांडे/बाटल्या प्रतीक म्हणून आणाव्यात
• लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी
चला, एकत्र येऊया आणि आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आवाज उठवूया!
– सिडको हक्क संघर्ष समिती
एकत्र येऊनच लढा देऊ शकतो! ✊
#सिडको #नवीमुंबई #महाराष्ट्र