F Type owners welfare association, Kharghar

F Type owners welfare association, Kharghar This group objective is to highlight the issues faced by Rowhouse owners of F-Type and also, CHS.

Association to be formed for issues like Water Supply, Drainage and sewage cleaning and Road.

18/7/2025आज असोसिएशन ने रहिवाशासोबत सिडको अधिकाऱ्यांची भेट घेतली. गेले एक महिना होणाऱ्या त्रासाबद्दल महिलांनी त्यांच्याश...
18/07/2025

18/7/2025
आज असोसिएशन ने रहिवाशासोबत सिडको अधिकाऱ्यांची भेट घेतली. गेले एक महिना होणाऱ्या त्रासाबद्दल महिलांनी त्यांच्याशी संवाद साधला.

उद्या दिनांक 18 रोजी बेलापूर पासून पुढे पाणी बंद राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या वाट्याचे सर्व पाणी खारघर साठी वापरणार आहोत असे आश्वासन दिले जेणेकरून उद्या दिवसभर पाणी आपल्या विभागात सुरू राहील व सिडकोच्या टाक्यातील पाण्याचा तुटवडा भरून निघेल. तुटवडा भरून निघाल्यानंतर पाण्याची पूर्तता अधिसारखी पूर्ववत होईल. असा विश्वास सिडको अधिकारी श्री सरोदे यांनी दिला आहे.

धन्यवाद🙏🙏

एफ टाइप ऑनर वेलफेअर असोसिएशन.
खारघर.

17/10/2024

गाव एक परिपूर्ण संकल्पना...
गाव हि संकल्पना बनविताना तिथे राहणाऱ्या प्रत्येकाच्या गरजा पूर्ण होतील याचा विचार करूनच वेगवेगळी मंडळी निर्माण झाली, एकत्र आली अथवा आणली गेली. पोटाला अन्न लागत म्हणून माणूस पहिला शेतकरी बनला.. राहायला घर हवं म्ह्णून त्यातील काही सुतार झाले, घराला विटा, मडकी यांची कमतरता भासू लागली म्हणून कोणी कुंभार बनले. रोजच्या जीवनात तेलाचं महत्व अधिकआहे हे जाणून कोणी घाणे टाकले ते तेली झाले.. देवला फुल लागतात. म्हणून काहीनि माळी बनून मळा फुलवला.. देवाची पूजा वव्हायला हवी म्हणून त्यातलेच काही गुरव जंगम बनले..दागिने हवेत म्हणून कोणी सोनारकामात प्रवीण झाले.. व्यवसाय करण्यासाठी काही देशोदेशी फिरून आले ते वैश्य झाले.. या सर्वाना बाहेरील लोकांपासून वाचवण्याची वेळ आली म्हणून काहींनी तलवारी हातात घेतल्या ते क्षत्रिय झाले.. पण या सगळ्यांचा खरा पिंड शेतकऱ्यचाच होता..मानवाच्या वेगवेगळ्या गरजेने उद्योग निर्माण झाले आणि तीच परंपरा पिढ्यानपिढ्या चालू राहिली म्हणून त्याचाच जाती निर्माण झाल्या.. आज जाती इतक्या घट्ट चिकटल्या आहेत कि "जात नाही ती जात" असं म्हणावं लागत.. माणसं तीच.. रक्त हि लाल.. मग हा जातीपातीचा भेद का.. ?पंधराव्या सोळाव्या शतकात हे जातीचं प्राबल्या एवढं वाढलं कि ज्ञानोबांना ज्ञानेश्वरी सांगावी लागली.. आपल्या संतांनी हा भेदाभेद दाखविण्याचा प्रेमाने तर कधी कठोर होऊन दाखविण्याचा लोकांना प्रयत्न केला. सोळाव्या शतकात ज्ञानोबांच्या वैष्णव धर्माने महाराष्ट्रात क्रांती केली आणि लहानथोर उच्च निच्च हे सारे प्रमाद बाजूला ठेऊन प्रत्येकात देव आहे या भावनेने प्रत्येकजण एकमेकांच्या पायावर डोकं टेकू लागला.. आणि वारकरी संप्रदायाला सुरुवात झाली.

बरे झाले देवा कुणबी केलों ।नाही तरी दंभे असतो मेलो ।।१।।

असे म्हणत जगाला मानवता शिकवणारे तुकाराम महाराज याच मातीत जन्माला आले.. कुणीच लहान नाही कुणी थोर नाही सारी देवाचीच लेकरं आहेत हे सांगणारे सानेगुरुजी याच मातीतले. . गावातील एका समाजला बाजूला काढला तर गाव हि संकल्पना पूर्ण होऊच शकत नाही..आणि म्हणून . आज गरज आहे सर्व जातींनी एकत्र येऊन एकत्र काम करण्याची.. सेतू बांधा रे सागरी ..सेतू बांधा रे सागरी म्हणत रामसेतू उभा राहिला... पण यात हजारो माकड, मनुष्य यांच्याबरोबर लहान खारीचा हि वाटा तितकाच मोलाचा होता.. आणि म्हणूनच रामसेतू पाण्यावर तरंगू शकला. मानवतेचा सेतू तरंगत ठेवायचा असेल तर माणसाला माणूस म्हणून पाहायला शिकुया. रामायणातील राम आणि गीतेतील कृष्ण आपल्याला हेच सांगत आहेत.
एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ..

सुहास शिर्के.. १७-१०-२०२४

15th aug 2024
06/09/2024

15th aug 2024

19/08/2024

महाराष्ट्रातील राजकारणीहो,

गणेशोत्सव महारष्ट्राचा एक सर्वात मोठा सण...
१८९४ मध्ये टिळकांनी समाज एकत्र येण्याच्या उद्देशाने सुरु केलेला गणेशोत्सव आज लहान लहान गल्ल्यांमध्ये विभागला जाऊ लागला आहे. आजपर्यंत आपण गणेश गल्लीचा राजा. चिन्चपोकळीचा राजा असे गणपती पाहत आलो आहोत. त्यांची मनोभावे दर्शन हि घेत आलो आहोत. सांस्कृतिक आणि एकात्मता यांची सांगड आपण पाहत आलो आहोत. पण सध्या हे स्तोम इतकं भयानक झालं आहे कि, प्रत्येक राजकीय पक्षामुळे स्पॉन्सर करण्याची इतकी चढाओढ लागली आहे कि एकाच गल्लीत सुरुवातीला काँग्रेसचा गणपती, मध्ये भाजपचा आणि दुसऱ्या टोकाला शिवसेनेचा गणपती बसू लागले आहेत. एकाच गल्लीत ३-४ गणपती बसवून समाज एकत्रीकरणाच्या असा कोणता प्रयत्न हे आजकालचे राजकारणी करीत आहेत?. स्वतःच्या बॅनरबाजीसाठी भविष्यातील निवडणूका लक्षात घेऊन जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारे राजकारणी याचे कान जनतेने पकडण्याही गरज आहे.

सार्वजनिक गणेशत्सवात होणारे बरेच गैरप्रकार आपल्या सर्वाना माहित नाहीत काय? यातूनवाया जाणारी तरुण पिढी पहिली नाही काय? तरुण मुलांचा वापर करून असे कार्यक्रम सुरु करायाचे. आपल्या नावाचे बॅनरबाजी करायची यापेक्षा यासर्वातून कोणता वेगळा हेतू हि मंडळी साध्य करीत आहेत.? कोणते सामाजिक उपक्रम गणेशोत्सवाच्या निमितताने राबवले जात आहेत. तुम्हाला गणेशत्सवाचं साजराच करायचा असेल तर. गणपतीची स्थापना करण्यावर अधिक भर देण्यापेक्षा स्वच्छता. रक्तदान शिबीर , गरीब मुलांना पुस्तकांचं वाटप करणं , तरुण मुलांना योग्य दिशा देण्यासाठी कार्य्रमाचे आयोजन करणं असे कित्येक सामाजिक हिताचे उपक्रम राबवलेत तर खऱ्या अर्थाने टिळकांचा गणेशोत्सव सुरु झाला असं म्हणता येईल.

तेव्हा हे राजकारणीहो स्वतःच्या सार्थसाठी समाजात विघटन करण्याचं आधी बंद करा. नाहीतर एक दिवस हाच समाज तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही . आणि मग तो गणपतीही तुम्हाला वाचवू शकणार नाही.

धन्यवाद.
सुहास शिर्के.

77th Independence Day Celebration at F , sector 12
15/08/2023

77th Independence Day Celebration at F , sector 12

Happy Independence Day Celebration by FTOWA residents ....🇮🇳
15/08/2023

Happy Independence Day Celebration by FTOWA residents ....🇮🇳

Happy Independence day celebration
15/08/2023

Happy Independence day celebration

Independence day celebration
15/08/2023

Independence day celebration

15/08/2023

77th Independence Day Celebration by FTOWA......💐🇮🇳💐
🙏🤝🙏✊🙏🤝🙏

Happy 77th Independence Day....🇮🇳👏🇮🇳💐🇮🇳🙏🇮🇳*FTOWA*🙏🤝🙏✊🙏🤝🙏
14/08/2023

Happy 77th Independence Day....
🇮🇳👏🇮🇳💐🇮🇳🙏🇮🇳
*FTOWA*
🙏🤝🙏✊🙏🤝🙏

Happy Republic Day.....🎊🙏🇮🇳🙏🎊
27/01/2023

Happy Republic Day.....
🎊🙏🇮🇳🙏🎊


08/11/2022

सभी रहिवासीयोंको गुरू नानक जयंती की शुभकमनाये 🙏

Address

Navi Mumbai
410210

Telephone

+918097369409

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when F Type owners welfare association, Kharghar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to F Type owners welfare association, Kharghar:

Share