Shri. Chhatrapati Shivaji Jr. Collage - HSCVC Sagroli

Shri. Chhatrapati Shivaji Jr. Collage - HSCVC Sagroli Shri Chhatrapati Shivaji Highschool &Jr.College(Technical &HSC Vocational) Shardanagar,Sagroli Nanded

Future Electricians..
16/04/2026

Future Electricians..


“From classroom to real work – our students fixing electrical systems confidently.”
10/04/2026

“From classroom to real work – our students fixing electrical systems confidently.”

*तंत्र विभागाची उद्योगविश्वाशी प्रेरणादायी सांगड*आज तंत्र विभागास पुणे येथील टूलकॉन सिस्टिम कंपनीचे संचालक श्री.अजय मुंग...
02/04/2026

*तंत्र विभागाची उद्योगविश्वाशी प्रेरणादायी सांगड*
आज तंत्र विभागास पुणे येथील टूलकॉन सिस्टिम कंपनीचे संचालक श्री.अजय मुंगडे तसेच प्रीसीटेक सिस्टिम कंपनीचे संचालक श्री.माधव विभुते यांनी भेट दिली.
या भेटीदरम्यान तंत्र विभागातील विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रीमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगार संधींबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना भविष्यात नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी कोणते अँडव्हान्स कोर्सेस आवश्यक आहेत, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मान्यवरांनी हायस्कूल विभागातील अटल लॅब,व्ही-1, व्ही-3 तसेच व्यवसाय विभागास भेट देऊन समाधान व्यक्त केले.
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले अत्याधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण हे मेट्रो सिटीमधील विद्यार्थ्यांनाही सहज उपलब्ध होत नाही, अशा शब्दांत त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
त्यानंतर त्यांनी त्यांच्या इंडस्ट्री मध्ये चालत असलेली उत्पादन प्रक्रिया,त्यासाठी आवश्यक असलेली यंत्र सामुग्री त्याचबरोबर दोन चाकी पासून ते विमानापर्यंत तयार करण्यात येणारे भाग याविषयी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे माहिती दिली.
या प्रसंगी संस्थेच्या शैक्षणिक समन्वयिका आदरणीय सौ.श्रद्धाताई देशमुख,आदरणीय श्रेयाताई देशमुख तसेच व्यवसाय विभागातील सर्व सहकारी उपस्थित होते.

Looking at these achievements, one question arises in every mind – ‘Can I be the next success story?’”
02/04/2026

Looking at these achievements, one question arises in every mind – ‘Can I be the next success story?’”



01/04/2026
*इंटर्नशिप ओरिएंटेशन कार्यक्रम यशस्वी संपन्न*संस्थेमध्ये इयत्ता ११ वी व्यवसाय व क्रॉप सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी इ...
18/03/2026

*इंटर्नशिप ओरिएंटेशन कार्यक्रम यशस्वी संपन्न*
संस्थेमध्ये इयत्ता ११ वी व्यवसाय व क्रॉप सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रामचे जिल्हाप्रमुख सौ.मीनाक्षी आटकुलवार यांनी विद्यार्थ्यांना इंटर्नशिप कशा प्रकारे उपलब्ध करून दिली जाणार आहे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. शिक्षण घेत असतानाच प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देणाऱ्या या उपक्रमाची माहिती देताना त्यांनी इंटर्नशिपचा कालावधी, त्याचे विविध फायदे तसेच भविष्यातील करिअर संधी याविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. संभाजी गायकवाड यांनी कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी इंटर्नशिपचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्यक्ष अनुभवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व कौशल्य विकासास चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास संस्थेच्या शैक्षणिक समन्वयिका आदरणीय सौ. श्रद्धाताई देशमुख तसेच विभागातील सर्व सहकारी उपस्थित होते. कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरला.

01/03/2026

रोजगाराची सुवर्णसंधी – ग्रामीण तरुणांसाठी भव्य मेळावा

संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी चे संस्थापक चेअरमन कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने दि. 12 मार्च 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता, सगरोळी येथे भव्य *रोजगार मेळावा-उद्यमिता 2026* चे आयोजन करण्यात येत आहे.

या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार असून ग्रामीण भागातील 10 वी, 12 वी, ITI, डिप्लोमा व पदवीधर युवक-युवतींना थेट मुलाखतीद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

नोंदणी व सहभाग पूर्णपणे विनामूल्य असून, इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या *Link* वर क्लिक करून पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.

ग्रामीण युवक-युवतींसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdLwBVu0Sk1SiRIg03Ws9VflXtILWF7jClHx7-Nd2DSsbDObA/viewform?usp=header

*संस्थेच्या पाच विद्यार्थिनींना डिजिटल सहाय्य — मोफत लॅपटॉप वितरण*संस्थेतून विविध विभागांतून बारावी उत्तीर्ण होऊन पुढील ...
27/02/2026

*संस्थेच्या पाच विद्यार्थिनींना डिजिटल सहाय्य — मोफत लॅपटॉप वितरण*
संस्थेतून विविध विभागांतून बारावी उत्तीर्ण होऊन पुढील उच्च शिक्षणासाठी विविध क्षेत्रांत शिक्षण घेत असलेल्या गरीब व होतकरू मुलींना क्राफ्ट्समाला स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्स इंडिया यांच्या तर्फे मोफत लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.
उच्च शिक्षण घेत असताना निवास व भोजनासोबतच इतर शैक्षणिक साहित्यांचीही गरज भासते. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक विद्यार्थिनींना या गरजा पूर्ण करणे कठीण जाते. याची दखल घेऊन संस्थेतर्फे दरवर्षी अशा गरजू विद्यार्थिनींसाठी लॅपटॉप सहाय्य मिळावे यासाठी स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्स इंडिया यांच्याकडे अर्ज पाठविले जातात. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र विद्यार्थिनींची निवड केली जाते.
यावर्षी एकूण पाच विद्यार्थिनींची निवड करण्यात आली असून त्यांना Lenovo कंपनीचे लॅपटॉप प्रदान करण्यात आले. या डिजिटल सहाय्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी मदत होणार आहे.
आजपर्यंत एकूण चौदा विद्यार्थिनींनी या उपक्रमाचा लाभ घेतला असून संस्थेचा हा उपक्रम गरजू मुलींच्या उच्च शिक्षणाला बळ देणारा ठरत आहे.

🌟 टेक्नोवेशन 2026 – अभिमानाचा क्षण 🌟दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी आयबीटी अंतर्गत विज्ञान आश्रम पाबळ (कोथरूड, पुणे) येथे...
26/02/2026

🌟 टेक्नोवेशन 2026 – अभिमानाचा क्षण 🌟
दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी आयबीटी अंतर्गत विज्ञान आश्रम पाबळ (कोथरूड, पुणे) येथे “टेक्नोवेशन” या राज्यस्तरीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून एकूण 100 प्रकल्प या स्पर्धेत सादर करण्यात आले.
या प्रतिष्ठित उपक्रमात आपल्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलने उत्साहाने सहभाग नोंदविला. आपल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला “पीक संरक्षण यंत्र” हा प्रकल्प उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, पालक तसेच विविध शाळांतील विद्यार्थ्यांना अत्यंत आवडला. सर्वांनी प्रकल्पाचे, विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना व प्रशालेला प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले व त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून दिपाली जोगदंड (व्यावसायिक कौशल्य विभाग प्रमुख तथा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे प्रमुख) उपस्थित होत्या.
तसेच कार्यक्रमासाठी चैतन्य नाडकर्णी (प्रमुख, विज्ञान आश्रम पाबळ) व योगेश कुलकर्णी (संचालक, विज्ञान आश्रम पाबळ) तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या त्रिवेणी संगमातून भविष्यातील विद्यार्थी सक्षम, कौशल्यसंपन्न व समाजातील उत्पादक घटक म्हणून तयार होईल, असा आशावाद सर्व मान्यवरांनी व्यक्त केला.या प्रकल्प सादरीकरणात शुभम दुबकलोड आणि ऋषिकेश पवार 9 वी या विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांना श्री श्याम मोहरे आणि श्री अशोक मिद्दलवार यांचे मार्गदर्शन लाभले

🌟 *यशोगाथा : परिश्रमातून घडलेले यश* 🌟*ऋत्विक बालाजीराव गज्जलवार हा श्री छत्रपती शिवाजी ज्यु.कॉलेज सगरोळी अंतर्गत असलेल्य...
29/01/2026

🌟 *यशोगाथा : परिश्रमातून घडलेले यश* 🌟
*ऋत्विक बालाजीराव गज्जलवार हा श्री छत्रपती शिवाजी ज्यु.कॉलेज सगरोळी अंतर्गत असलेल्या उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण विभागातील (मेकॅनिकल टेक्नॉलॉजी) सन २०१७ ते २०१९* या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी होता.
ऋत्विकने संस्थेच्या सरदार वसतिगृहात वास्तव्यास राहून आपले शिक्षण पूर्ण केले.त्याने *सन २०१९ मध्ये १२ वी बोर्ड परीक्षा ७३.८०* टक्के गुणांसह यशस्वीरित्या उत्तीर्ण केली.
त्यानंतर त्याने *शासकीय तंत्रनिकेतन,नांदेड येथून डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम सन २०२१ मध्ये ८०.५०* टक्के गुणांसह पूर्ण केला.
आपली शैक्षणिक वाटचाल पुढे सुरू ठेवत त्याने *MIT कॉलेज, छत्रपती संभाजीनगर येथून B.Tech (Mechanical Engineering)* हा पदवी अभ्यासक्रम सन २०२४ मध्ये 7.27 CGPA सह यशस्वीरित्या पूर्ण केला.
नुकतीच त्याची *UMASONS AUTO COMPO pvt.Ltd.छ.संभाजीनगर येथे Quality Control* विभागात *Junior Engineer* म्हणून निवड झाली आहे,ही बाब आमच्या विभागासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.
💐*ऋत्विकच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!* 💐

*जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीत व्यवसाय शिक्षण विभागातर्फे तीन प्रकल्पांचे यशस्वी सादरीकरण*आज श्री गुरु गोबिंदसिंघजी शासक...
23/01/2026

*जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीत व्यवसाय शिक्षण विभागातर्फे तीन प्रकल्पांचे यशस्वी सादरीकरण*
आज श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या प्रदर्शनीत श्री छत्रपती शिवाजी ज्यु. कॉलेज अंतर्गत असलेल्या व्यवसाय विभागामार्फत *स्मार्ट ब्लाइंड कर्व्ह अ‍ॅक्सिडेंट प्रिव्हेंटिव्ह सिस्टिम व पीक संरक्षण यंत्र हे दोन प्रकल्प तसेच क्रॉप सायन्स विभागातील *Smart free range cow shed auto sensor* हा एक प्रकल्प सहभागी झाला होता.
या प्रकल्पांना जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री. एस. व्ही. सूर्यवंशी सर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ज्या ठिकाणी इतर विभागांमधून मर्यादित प्रकल्प सादर होतात, त्या ठिकाणी सगरोळी येथून तब्बल तीन प्रकल्प सहभागी झाल्याबद्दल त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले.
सदर जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीचे निकाल दिनांक 26 जानेवारी रोजी जाहीर होणार असून, सध्या सर्व सहभागी संस्थांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
या प्रदर्शनीत एकूण 09 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. श्याम मोहरे, श्री. अशोक मिद्दलवार आणि श्री. व्यंकटेश वानखेडे हे उपस्थित होते.

आज  पूर्वव्यवसाय अभ्यासक्रम V1, V3 तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना श्री. शरद जाधव सर(विज्ञानाश...
03/01/2026

आज पूर्वव्यवसाय अभ्यासक्रम V1, V3 तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना श्री. शरद जाधव सर(विज्ञानाश्रम पाबळ) यांचे *“व्यवसाय अभ्यासक्रमातील संधी”* या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले.
मार्गदर्शनादरम्यान शरद सरांनी विद्यार्थ्यांना समाजातील गरजांची ओळख करून देत, कमीत कमी भांडवलावर सुरू करता येणारे विविध उद्योग, त्यासाठी आवश्यक असणारी किमान कौशल्ये, नावीन्यपूर्ण कल्पनांचे महत्त्व, तसेच सहनशीलता आणि मेहनत करण्याची तयारी या गुणांची गरज याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच त्यांनी विविध अल्पकालीन कौशल्याधारित अभ्यासक्रम, सरकारी व शासकीय योजना, उपलब्ध शिष्यवृत्ती आणि त्यांचा लाभ कसा घ्यावा याबाबत उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना दिली.
हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त, प्रेरणादायी आणि भविष्याचा योग्य मार्ग दाखवणारे ठरले.

Address

Shardanagar Sagroli TQ. Biloli Dist. Nanded
Nanded
431731

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 1pm

Telephone

+917875563732

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri. Chhatrapati Shivaji Jr. Collage - HSCVC Sagroli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shri. Chhatrapati Shivaji Jr. Collage - HSCVC Sagroli:

Share