12/03/2026
स्थळ तात्या टोपे हॉल
तात्या टोपे नगर.
तारीख 14 मार्च आणि 15 मार्च
वेळ सकाळी 10 te रात्री 9
आरोग्य तपासणी वेळ दुपारी 2 te 5
भारतीय स्त्री शक्ती ही एक अराजकीय संघटना असून १९८८ पासून महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात अविरत काम करित आहे. भारतामध्ये जम्मू काश्मीर ते केरळ पर्यंत आणि गुजरात पासून ओरीसा पर्यंत 17 राज्यांमधे व महाराष्ट्रात १८ शाखांमध्ये संघटना अव्याहत पणे कार्य करीत आहे. महिला शिक्षण, आरोग्य,आर्थिक स्वावलंबन, आत्मसन्मान व स्री पुरुष समानता या पंचसूत्री वर संघटनेचे विविध कार्यक्रम उपक्रम प्रकल्प राबविले जातात त्या अंतर्गतच महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व बाजारपेठ मिळावी म्हणून उद्योजिका प्रदर्शन घेण्यात येत आहे
या प्रदर्शनातून भारतीय स्त्रीशक्तीला मिळणाऱ्या निधीचा वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी उपयोग करण्यात येणार आहे.
तरी सगळ्यांनी आपल्या कुटुंबीय व मित्र-मैत्रिणी सोबत प्रदर्शनाला आवश्यक भेट देऊन उद्योजकांचे मनोबल वाढवावे आणि समाजकार्याला आपल्याकडून थोडीशी मदत करावी व आवाहन करण्यात येत आहे.
प्रदर्शनात विविध वस्तु, कपडे, ज्वेलरी, बांबू वस्तु, रांगोळ्या इत्यादी वस्तूंचे stalls आहेत. रसनापूर्तीसाठी विविध प्रकारच्या खाण्यांचे स्टॉल्सही आहेत.
प्रदर्शनात स्त्रियांची मोफत आरोग्य तपासणी देखील करण्यात येणार आहे.
#भारतीयस्त्रीशक्ति