08/10/2026
वाटलं नव्हतं अशी पोस्ट इतक्या लवकर करावी लागेल तुमचं अचानक निघून जाणं हे विश्वास न ठेवण्यासारखं आहे तुमच्याबद्दल काय बोलावं आणि काय लिहावं मराठी माणूस म्हणून तुम्ही जो कलाविश्वात एक वेगळा ठसा उमटावला कदाचीत कलाकारांच्या येणाऱ्या कित्येक पिढ्या तो पुसू शकत नाही किंवा तुमची ती जागा भरून काढू शकतं नाही
तुम्ही फक्त कलाविश्वातच नाही तर सामाजिक क्षेत्रात सुद्धा जे इतकं काम केलं ते एखाद्या राजकारण्याला सुद्धा लाजवेल इतकं मोठं आहे मग ते दुष्काळग्रस्त भागात पाण्यासाठी योजना असो को आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला हातभार देणे असो फार मोठी गोष्ट असते आपल्या रुपयातील आठाणे एखादयाला देण्याची वृत्ती असणे खूप कमी लोकांमध्ये असते तुम्ही स्वतःच घरं न भरता देणाऱ्याने देत जावे असे गरजवंताना देत गेलात.
तुमच्या ह्या प्रवासाला आमचा सलाम वं भावपुर्ण श्रद्धांजली.
विचार सामान्यांचे