Agrovision Foundation, Nagpur, Maharashtra

Agrovision Foundation, Nagpur, Maharashtra Agrovision Foundation was established in 2015 as a social but apolitical NGO exclusively to serve the

शेतीतील अवशेष जाळू नका त्यापासून बायोचार तयार करा!बायोचारच्या मदतीने जमिनीची सुपीकता वाढवणे, शेती अधिक शाश्वत बनवणे आणि ...
08/09/2026

शेतीतील अवशेष जाळू नका त्यापासून बायोचार तयार करा!

बायोचारच्या मदतीने जमिनीची सुपीकता वाढवणे, शेती अधिक शाश्वत बनवणे आणि शेतीतील अवशेषांचा योग्य वापर करणे याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घ्या.

अॅग्रोव्हिजन फाउंडेशन आणि डॉ. बावस्कर टेक्नॉलॉजी (अॅग्रो) प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकऱ्यांसाठी विशेष परिषद.

२६ सप्टेंबर २०२६
सकाळी १० ते दुपारी २
हॉटेल तुली इम्पेरियल, रामदासपेठ, नागपूर

प्रवेश पूर्णपणे विनामूल्य!
नोंदणी आवश्यक आहे.

*तूर पिकावरील शेतकरी मेळव्याचे यशस्वी आयोजन*आज दिनांक १ मार्च २०२६ ला अँग्रोव्हिजन फाउंडेशन , गिन्नी ऍग्रो प्रॉडक्ट्स  ल...
02/03/2026

*तूर पिकावरील शेतकरी मेळव्याचे यशस्वी आयोजन*

आज दिनांक १ मार्च २०२६ ला अँग्रोव्हिजन फाउंडेशन , गिन्नी ऍग्रो प्रॉडक्ट्स लि. , व पर्यावरण रिसोर्स सेंटर, संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने *तूर पिकावर शेतकरी मेळाव्याचे* आयोजन शुभारंभ सेलीब्रेशन लॉन, कळमेश्वर, येथे यशस्वी रित्या करण्यात आले.

#तूरपीक #तूरपीक #शेतीमार्गदर्शन #शेतकरीमेळावा #कृषीउपक्रम #शेतकरीविकास

27/02/2026
*व्यावसायिक कुक्कुटपालन प्रशिक्षण*आज *दि. 30 जानेवारी 2026* रोज शुक्रवारला *अॅग्रोव्हिजन फाउंडेश व कुक्कुटपालन संसोधन व ...
30/01/2026

*व्यावसायिक कुक्कुटपालन प्रशिक्षण*

आज *दि. 30 जानेवारी 2026* रोज शुक्रवारला *अॅग्रोव्हिजन फाउंडेश व कुक्कुटपालन संसोधन व प्रशिक्षण केंद्र, माफसू नागपूर* तर्फे *व्यावसायिक कुक्कुटपालन प्रशिक्षनाचे* यशस्वी आयोजन कुक्कुटपालन संसोधन व प्रशिक्षण केंद्र, फुटाळा तलाव रोड, माफसू नागपूर येथे करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून अॅग्रोव्हिजन फाउंडेशन चे सल्लागार डॉ. सी डी मायी, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जयंत कोरडे उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुक्कुटपालन संसोधन व प्रशिक्षण केंद्र माफसूचे प्रमुख डॉ मुकुंद कदम, डॉ दर्शना भैसारे सहाय्यक प्राध्यापक तसेच डॉ केणे माजी पशुवैद्यकीय अधिकारी, श्री वी बी दहिकार, संचालक R-seti महाबँक व श्री चंद्रकांत नागपुरे R-seti हे उपस्थित होते.

#कुक्कुटपालन #कुक्कुटपालनप्रशिक्षण #कुक्कुटपालनकार्यशाळा #पोल्ट्रीफार्मिंग #जास्तनफा #नागपूर

*गच्चीवरील भाजीपाला लागवड कार्यशाळा*आज *दि. 24 जानेवारी 2026* रोज शनिवारला *अॅग्रोव्हिजन फाउंडेश व ज्ञानप्रकाश लोकसंस्था...
24/01/2026

*गच्चीवरील भाजीपाला लागवड कार्यशाळा*

आज *दि. 24 जानेवारी 2026* रोज शनिवारला *अॅग्रोव्हिजन फाउंडेश व ज्ञानप्रकाश लोकसंस्था* तर्फे *गच्चीवरील भाजीपाला लागवड* या विषयावर यशस्वी आयोजन मनीष नगर, नागपूर येथे करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून अॅग्रोव्हिजन फाउंडेशन चे सदस्य कॅप्टन डॉ. एल बी कलंत्री, डॉ. सुनील सहतपुरे उपस्थित होते तसेच मार्गदर्शक म्हणून ज्ञानप्रकाश लोकसंस्थेचे संचालक श्री श्रीपाद राठोड, श्रीमती जयश्री राठोड उपस्थित होते.

#गच्चीवरीलभाजीपाला #कृषीकार्यशाळा #गच्चीशेती #शहरीशेती #स्वयंरोजगार

*मशरूम लागवड कार्यशाळा*दि. १७ जानेवारी २०२५* रोज शनिवारला *अॅग्रोव्हिजन फाउंडेश* तर्फे *मशरूम लागवड* या विषयावर यशस्वी आ...
19/01/2026

*मशरूम लागवड कार्यशाळा*

दि. १७ जानेवारी २०२५* रोज शनिवारला *अॅग्रोव्हिजन फाउंडेश* तर्फे *मशरूम लागवड* या विषयावर यशस्वी आयोजन मनीष नगर, नागपूर येथे करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून अॅग्रोव्हिजन फाउंडेशन चे सचिव डॉ सी डी मायी सर उपस्थित होते तसेच मार्गदर्शक म्हणून ऑरगॅनो मशरूमचे संचालक डॉ प्रिया बावस्कर व श्री अनिल बावस्कर उपास्थित होते.

*शेळीपालन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन*आज *दि. १९ डिसेंबर २०२५* रोजी *अॅग्रोव्हिजन फाउंडेशन व कृषी विज्ञान केंद्र, सी आय सी ...
20/12/2025

*शेळीपालन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन*

आज *दि. १९ डिसेंबर २०२५* रोजी *अॅग्रोव्हिजन फाउंडेशन व कृषी विज्ञान केंद्र, सी आय सी आर* नागपूर मार्फत *शेळीपालन कार्यशाळेचे* यशस्वी आयोजन कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस अनुसंधान संस्था, खापरी , नागपूर येथे करण्यात आले.

या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलताना, *डॉ. व्ही. एन. वाघमरे,* संचालक, भा.कृ अनु.प.- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यानी शेतकऱ्यांना जोडधंदा शेळीपाळण फायदेशीर आणि आर्थिक मदतीस उपयोगी आहे असे सांगितले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अॅग्रोव्हिजन फाउंडेशनचे सचिव *डॉ सी डी मायी,* उपस्थित होते त्यांनी शेतकऱ्याना सतत फायदेशीर असणारे जोडधंदा बद्दल माहिती दिली, माफसुचे *डॉ. जे पी कोरडे,* आधिष्ठाता, पशूवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच *डॉ. के. महादेव रेड्डी,* प्रमुख, केवीके,भा.कृ.अनु.प.-सी.आय.सी.आर, हे उपस्थित होते.

या प्रशिक्षणास प्रमुख मार्गदर्शक म्हणून *श्री अभय सिंग मारोडे,* शेळीपालक उद्योजक, पळशीझासी बुलढाणा तसेच कृषी विज्ञान केंद्र सी आय सी आर चे शास्त्रज्ञ *डॉ उल्हास गलकाटे* , माजी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नागपूरचे *डॉ युवराज केणे* हे उपस्थित होते.

अ‍ॅग्रोव्हिजन फाउंडेशन व के.व्ही.के.-सी.आय.सी.आर., नागपूर आयोजित एकदिवसीय 'शेळीपालन'  प्रशिक्षण, शुक्रवार दि. १९ डिसेंबर...
08/12/2025

अ‍ॅग्रोव्हिजन फाउंडेशन व के.व्ही.के.-सी.आय.सी.आर., नागपूर आयोजित एकदिवसीय 'शेळीपालन' प्रशिक्षण, शुक्रवार दि. १९ डिसेंबर २०२५, स्थळ: के.व्ही.के.-सी.आय.सी.आर. पांजरी नागपूर, अधिक माहितीसाठी संपर्क-८३०८५२०५०२,९७६४०८६९६३

Address

Nagpur
Nagpur
440010

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agrovision Foundation, Nagpur, Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Agrovision Foundation, Nagpur, Maharashtra:

Shortcuts

Share