20/07/2026
#निर्धार_बाल_संरक्षणाचा अंतर्गत #विधायक_भारतीच्या मधुरा, प्रज्ञा, क्रिसेल आणि स्नेहल यांनी माहीम येथील #कनोसा_हायस्कुल मधील 5वी, 6वी, 7वी आणि 8वी जवळपास 1200 मुलींसोबत त्यांच्या वर्गात एकूण 24 सत्रे घेतली. सदर सत्रांमध्ये मुलींना...
• बाल अधिकारांचा इतिहास
• संयुक्त राष्ट्र संघाची बाल हक्क संहिता
• बाल संरक्षण
• बाल संरक्षणासाठी असलेल्या व्यवस्था आणि यंत्रणा
• सायबर वेलनेस
या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सर्व सत्रांमध्ये मुलींचा सक्रिय सहभाग होता. वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांनी माहिती अधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला. शाळेच्या मुख्याधापिका आणि शिक्षकांचाही प्रतिसाद सकारात्मक होता. विधायक भारतीने तयार केलेले पोस्टर्स शाळेमध्ये लावण्यासाठी शाळेला भेट देण्यात आले.
•••
Santosh Shinde Ankita Shivgan Snehal S S Rane Pradnya Kamble Madhura Ganesh Crissele Rodrigues Vidhayak Bharti