26/01/2024
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अँटॉप हिल शाखेतर्फे 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त 75 फूट तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली. ही तिरंगा पदयात्रा विद्यालंकार महाविद्यालय पासून सुरू होऊन संगमनगर मार्केट मार्गे भरणी नाका येथे संपन्न झाली. या पदयात्रेला अँटॉप हिल परिसरातील तरुण व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन अभाविप मुंबई महानगर मंत्री निधी गाला या उपस्थित होत्या. तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदित्य जयस्वाल, अँटॉप हिल नगर मंत्री विनीत बिंद व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.