25/11/2024
24 नोव्हेंबर 2024 रोजी बागवान सामाजिक संस्था मुंबई (रजि.) मार्फत वधु-वर चा मेळावा मुंबईत प्रथमच नारायण नगर, असल्फा व्हिलेज किरण भाऊ लाडगें हाॅल घाटकोपर (प) मुंबई -400084 येथे संपन्न झाला . सदर मेळाव्यात स्वतः नारायण नगर घाटकोपर (प) चे नगरसेवक मा.श्री.किरण भाऊ लांडगे उपस्थित राहून. बागवान सामाजीक संस्था मुंबई मार्फत भविष्यात होणा-या समाजाचे कार्यक्रम,समस्या,सहकार्यासाठी सदैव तत्पर राहीन असे आश्वासन दिले व त्यांने असेही सांगीतले की सर्व बागवान समाज, मुस्लीम समाज माझ्या कुटूंबीयाप्रमाणे आहे ! सदर मेवाव्यात 200 वधु -वर चे पालक आपल्या मुला-मुलींचे बायोडाटा/फोटो घेऊन समक्ष हजर होते. सदर मेळाव्यात संस्थेचे अध्यक्ष मा.अयुब हुसेन बागवान,उपाध्यक्ष मा,रहेमान भि.बागवान, उपाध्यक्ष मा.सैफन बागवान,सचिव मा.मेहमुद म.बागवान,उप-सचीव फारूख अ.बागवान, उप-सचीव यासीन दस्तगीर बागवान, खजिनदार मा.राजू बा.बागवान,उप-खजिनदार सलीम बागवान, उप-खजिनदार युनूस यु.बागवान, सल्लागार मा.झहीर श,बागवान,सक्रिय सदस्य सलीम म.बागवानसक्रीय सदस्य अजरुद्दिन जंहागीर बागवान, सक्रीय सदस्य शब्बीर चुन्नुमियां बागवान, सक्रिय जेष्ठ मार्गदर्शक मा.हसन उस्मान बागवान, सक्रीय सदस्य मा.सलीम ऊमर बागवान इत्यादी हजर होते !