11/01/2020
Invitation for residents of Dahisar
दहिसरकरांसाठी आमंत्रण
दहिसर वासीयों के लिये न्यौता
महोदय, महोदया
आपण किंवा आपली इतर परिचित संघटना दहिसर मध्ये काही सांस्कृतिक उपक्रम राबवत असाल तर सर्व जण मिळून एक Dahisar Culture Club निर्माण करू शकतो का ? असा प्रामाणिक विचार मनात आला.
ज्यायोगे सर्व दहिसरवासीय या विविध सांस्कृतिक उपक्रमांत (उदा. नाटक,कथाकथन, स्टँडअप,काव्य सादरीकरण, अभिवाचन, गायन, नृत्य, वादन, व्याख्यान, चर्चासत्र इ.) सहभागी होऊ शकतील.
अशाप्रकारे आपला वैविध्यपूर्ण सांस्कृतिक - वाङ्मयीन वारसा आपल्याला जपता येईल आणि आपल्या पुढील पिढीला देता येईल.
जर आपण Dahisar Culture Club मध्ये सामील होऊ इच्छित असाल तर आमच्या गप्पा मारता न येणा-या/ non chatting group व्हाॅट्सअप गटात सामील व्हावे आणि इतरांना सामील होण्यास आवाहन करावे.
हा गट केवळ संघटन करण्यासाठी तसेच सर्व जणांशी एकाचवेळी संपर्कात रहाण्यासाठी तयार केला आहे.लवकरच एखादा कार्यक्रम आयोजित करून प्रत्यक्षात या संकल्पनेचा विस्तार करता येईल. त्यासाठी सहकार्य करावे ही विनंती.
अट मात्र एकच , आपण दहिसर मध्ये कायमचे वास्तव्य करणारे असावेत.
धन्यवाद
दहिसर कल्चर क्लब
[email protected]
https://www.facebook.com/Dahisar-Culture-Club-101624591379273/
Join WhatsApp
https://chat.whatsapp.com/Imn3F16fqLXHA9dkV169dd
A Culture Club of People living in Dahisar Mumbai. People will be connected culturally and socially