Muskaan - A Step Towards Charity

Muskaan - A Step Towards Charity Some of us sisters have formed a charity group called "Muskaan". We are trying to raise their social status by helping them by all possible ways. Thank you....

Through this group, we are tracking down the needy people and how they can be helped by social service. We have been doing this work since last year and so far, we have donated essential commodities, clothes, grocery, books, etc. to many needy people. We believe that through this, we can also provide all possible financial assistance & emotional support to needy people. Where did the idea for the

"Muskaan" come from? For women, be it a Haldi Kumkum or a festive occasion, a Bhishi party is an opportunity to get together for a chat, to exchange ideas, to openly share joys and sorrows. In year 2020, Corona banned us from reuniting personally, and we went online for a year. Many WhatsApp groups were formed for Bhishi, Friends Forever, Maitrini etc. The reason behind having online chat groups is that to keep ladies stay connected for exchanging thoughts and expressing their emotions. But, since the beginning of these "Bhishi" events, Online Chat Groups, many of us have often thought that having a party or having a picnic with different dress code is not the only purpose for a community. At one point We thought What if we visit some of the NGO's on the occasion of "Bhishi" ?? In the *Maitrini* group, we used to share some favorite recipes, health tips, videos or some other good ideas. The idea was to form a new group for charity was discussed & the *"MUSKAAN"* Charity was formed by the combined efforts of the friends who responded spontaneously to it.

*Meeting, celebrating, having fun on any occasion gives happiness to oneself for a moment, but the thought of being able to share that happiness with others and doing something for them, and doing good deeds gives lifelong satisfaction.*



Team Muskaan is hoping for your help.

07/10/2025
07/10/2025

'जागतिक महिला दिन' विशेष TEAM मुस्कान DRIVE

Drive Head - Jyoti Hankare
Drive location - Amaravati, Maharashtra (08.03.2025)

महिलांचे प्रश्न, त्यांच्या समोरील आव्हानं, प्रत्येक लहान गोष्टी साठी करावा लागणारा संघर्ष. या सर्व गोष्टींवर चर्चा होते ती जागतिक महिला दिनी. जिथं डोळे असणाऱ्या महिलांना इतकी आव्हानं आहेत तिथे अंध महिलांना तर हे जगच अंधारमय आहे. रोजच्या दैनंदिन कामांपासूनच त्यांचा संघर्ष सुरू होतो. म्हणून या महिलांसाठी पंजाबराव राघोबाजी पाटील हॅंडीकॅप इंटिग्रल डेव्हलपमेंट एज्युकेशन अँड मल्टी पर्पज सोसायटी बरोबर अमरावती चे कामकाज चालविणाऱ्या आणि स्वतःही अंध असणाऱ्या सौ. मंदा हांडे- पाटील ही सावित्रीची लेक सतत झटत आहे. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी या अंध महिलांसाठी राज्यस्तरीय महिला संमेलन अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध भागातील काही अशा दिव्यांग माऊली आहेत ज्या, सदर कार्यक्रमाची अगदी वाट पाहत असतात. त्यापैकी बऱ्याच जणींना घराच्या बाहेरही पडायला मिळत नसते. रोजच्या जगण्यातल्या त्यांच्या अडचणी, आरोग्य विषयक समस्या, विविध आव्हानांना कसे समोर जायचे याविषयी या संमेलनात त्यांना मार्गदर्शन केले जाते. शिवाय काही भेटवस्तू दिल्या जातात. नाश्ता आणि जेवण याची सोय केली जाते. कार्यक्रमासाठी एक हॉल घेतला जातो. मार्गदर्शक बोलावले जातात.

या कार्यक्रमास TEAM MUSKAAN च्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, अशी मंदा मॅडमची इच्छा होती. त्या अनुषंगाने, मंदा मॅडमनी आपल्या TEAM MUSKAAN ला निमंत्रण पत्रिकाही पाठविली आहे. या राज्यव्यापी संमेलनाच्या निमित्ताने मी, सौ. ज्योती हंकारे आणि सौ. करुणा लाळगे रेणुका पुजारी TEAM MUSKAAN च्या प्रतिनिधी म्हणून अमरावतीला संमेलनात सहभागी झालो. या 'जागतिक महिला दिन' विशेष कार्यक्रमाच्या दिवशीच म्हणजे 08 मार्चला TEAM MUSKAAN चा DRIVE याच ठिकाणी मंदा मॅडमच्या संस्थेला मदत रूपात करण्याचे ठरविले आणि त्यानुसार 150 अंध महिलांना 150 Pressure Cookers वाटप Team MUSKAAN द्वारे करण्यात आले.

नमस्कार🙏 *ड्राईव्ह ची तारीख* - 13 फेब्रुवारी 2025*ठिकाण* - जनजागृती विद्यार्थी संघ,(JVS )मानखुर्द*ड्राईव्ह हेड*- करुणा ल...
27/02/2025

नमस्कार🙏
*ड्राईव्ह ची तारीख* - 13 फेब्रुवारी 2025
*ठिकाण* - जनजागृती विद्यार्थी संघ,(JVS )मानखुर्द
*ड्राईव्ह हेड*- करुणा लालगे

जनजागृती विद्यार्थी संघ (JVS)मानखुर्द यांचे मार्फत मानखुर्द परिसरातील गरीब व एकल महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी टेलरिंग आणि ब्युटी पार्लर चे प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून या महिला त्यामार्फत कुटुंबाला ही आर्थिक हातभार लावतील.
फेब्रुवारी महिन्याचा आपला ड्राईव्ह आज दिनांक 13 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी घेतला गेला.
आज या JVS संघात टीम मुस्कान चे मेंबर पोचल्या नंतर तेथील मुलांनी मुस्कान टीम चे स्वागत *गम के दीन भी गुजर जायेंगे, जब तक हम जिंदा है तो लडेंगे और अच्छे दीन जरूर आएंगे* या आशयाच्या स्वागत गीताने केले. या गीतातील ओळींना समर्पक असा अनुभव त्याठिकाणी शिकवणाऱ्या शिक्षिका यांनी परिचय देताना सांगितला. त्यांचा स्वतःचा खुप मोठा अपघात झाला होता. त्यातून त्या परत उभ्या राहतील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती, तश्यातच त्यांच्या पायाचे मोठे ऑपरेशन करावे लागले होते. त्यातून बाहेर पडणे त्यांना अशक्य वाटत असताना संघाचे श्री. संतोष सर यांनी त्यांना त्यांच्यातील शिवण कलेची आठवण करून देत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोसाहित केले आणि आज त्या तेथील परिसरातील १०६ महिलांना शिवणकलेचे प्रशिक्षण देत आहेत. दुःखाचे दिवस संपवून त्या आनंदात जगत आहेत.
JVS संघामध्ये प्रशिक्षण घेतल्या नंतर काही महिलांना शिलाई मशीन JVS ने उपलब्ध करून दिले आहे. ज्या महिलांकडे शिलाई मशीन नाही त्यांना सेंटर मध्ये दर तासाला ५ रुपये या दराने जागा आणि शिलाई मशीन संघामार्फत उपलब्ध करून दिले जाते., जेणेकरुन त्या विविध वस्तू बनवून त्यातून उत्पन्न मिळवू शकतात. *त्यापैकी ४० महिलांना आपण टीम मुस्कान कडून टेलरिंग किट दिले.*

*तसेच MSEB सांताक्रूझ कॉलनी व MSEB स्वस्तिक कॉलनी येथील रहिवाश्यांनी दिलेले कपडेही यावेळी परिसरातील लोकांना दिले गेले.*

यावेळी एका गोष्टीचे खुप विशेष वाटले की इतक्या अडचणीत असून सुद्धा या महिलांनी उपलब्ध असलेल्या साधनातून स्वतः शिवलेले ड्रेस, ब्लाउस, वन पीस स्वतः परिधान करून नटून थटून कॅटवॉक करत आपल्या समोर एक छानसा फॅशन शो सादर केला. तो क्षण खूप कौतुकास्पद होता.

संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात त्यातीलच एक म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीमुळे, नशेच्या आहारी जाऊ नये म्हणून मुलांना मैदानी खेळात गुंतवून फुटबॉल प्रशिक्षण व कराटे प्रशिक्षण दिले जाते.
मागच्या ड्राईव्ह मध्ये आपण तेथील मुलांना फुटबॉल शूज दिले होते
त्यावेळी त्यांच्यातील ज्या मुलांना आपण त्यावेळी देऊ शकलो नाही त्यांना आज *एकूण १४ फुटबॉल शूज व कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना ड्रेस शिवण्यासाठी १५ मीटर पांढरे कॉटन चे कापड दिले.*

*मुलांना खाऊ म्हणून क्रीम बिस्कीट पुडा व कोल्ड ड्रिंक दिले.*

टीम मुस्कान प्रति प्रेमाचे प्रतीक म्हणून मुलांनी आपल्यासाठी खास स्वतःच्या हाताने बनवलेले सुंदर ग्रीटिंग कार्ड दिले.

हळदीकुंकू, तीळगुळ, फुल, अल्पोपहार तसेच टाकावू तून टिकावू अश्या जीन्स च्या कापडापासून बनवलेल्या पर्स देऊन आम्ही मुस्कान टीम चे representative म्हणून खूप कौतुक करून घेतले. आमच्या मागे पन्नास सदस्य यासाठी मोलाचा हातभार लावत आहेत म्हणून हे आपण अनुभवू शकतो आहोत हे प्रत्येक क्षणी जाणवत होते.

मुस्कान टीम च्या वतिने *सौ. करुणा लालगे* यांनी टीम मुस्कान च्या कामाची माहिती दिली व JVS संघाचे सर्वेसर्वा श्री व सौ. संतोष सुर्वे सर, मॅडम व टीम चे अतिशय सुंदर शब्दात आभार मानले.

आपण दिलेल्या या छोट्याश्या टेलरिंग किट चा नक्कीच या महिलांना खूप उपयोग होईल.
यासाठी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रीत्या सहभाग असलेल्या आपल्या सगळ्यांना खुप खुप धन्यवाद🙏

*~TEAM WORK DREAM WORK*~

धन्यवाद🙏
टीम मुस्कान😊

Drive date 26.01.2025Drive place Palwi Project by Prabha Heera Pratishthan, PandharpurDrive Head...Pranjali Kolarkar*जगण...
29/01/2025

Drive date 26.01.2025
Drive place Palwi Project by Prabha Heera Pratishthan, Pandharpur
Drive Head...Pranjali Kolarkar

*जगणं समृद्ध करणारा 'पालवी' चा अनुभव*!
नमस्कार,
आपण आपल्या आयुष्यात सुखदुःखाचे अनुभव घेत जगणं समृद्ध झालं असं म्हणत आपल्याच भावविश्वात छान खूष असतो.. मग्न असतो.... परंतु एड्सग्रस्त मुलांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना जगण्याच्या प्रवाहात आणण्यासाठी अविरत धडपडणाऱ्या 'पालवी ' संस्थेची भेट दिल्यानंतर जो अनुभव आला तो खऱ्या अर्थाने जगणं समृद्ध करणारा अनुभव होता... प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या पालवी या संस्थेला भेट दिल्यावर जीवनाची आणखी दुसरी बाजू बघायला मिळाली आणि जगण्याबद्दलची जाणीव अधिक समृद्ध झाली.
आपण केलेला प्रत्येक ड्राईव्ह प्रत्येकवेळी नवीन अनुभव देऊन जातो, drive head la तो अनुभव खूप काही शिकवून जातो, सकारात्मक ऊर्जा देऊन अजून खूप चांगले काम करायचे आहे ही प्रेरणा देतो.
प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या पालवी या प्रकल्पात जानेवारी महिन्याचा ड्राईव्ह दि. 26.01.2025 या दिवशी घेण्यात आला.
विठू माऊलीच्या पवित्र भूमीत मंगलाताई शाह यांनी साधारण २००१ मध्ये अनाथ मुलांसाठी एक आश्रम त्यांच्या घरातच सुरू केला. नंतर त्यांना कोणी सांगितले की वेश्या वस्ती मध्ये जाऊन तिथल्या मुलांसाठी काही करता आले तर बघा.... ते ऐकून मंगला ताई काही रेड लाईट एरिया मध्ये फिरल्या, तेव्हा त्यांना दिसले की तिथे खूप अशी मुले आहेत जे HIV positive आहेत. आणि त्यांच्यासाठी काही करणे आवश्यक आहे.
दरम्यान, मंगल ताईंना एके दिवशी एक कॉल आला की एका गोठ्यात दोन लहान मुलींना कुणीतरी सोडून दिलेले आहे, तुम्ही येऊन बघा. चौकशी केल्यावर कळले की त्या मुलींच्या आजी आजोबांनी त्यांना सोडून दिलेले असून मुलींचे आई वडील दोघेही एड्स ने मृत्युमुखी पडले आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही मुलींना पण एड्स आहे. ताई त्या दोन्ही मुलींना आपल्या सोबत घेऊन आल्या आणि तिथून पालवी प्रकल्पाची सुरुवात झाली.
त्या काळी एड्स उपचारावर जास्त प्रमाणात औषधी उपलब्ध नव्हती त्यामुळे त्या दोन मुलींपैकी जी लहान, दीड वर्षाची होती तिचा काही दिवसात मृत्यू झाला आणि इथून मंगलाताईंचा पालवी सोबत एड्स बाधित मुलांना सांभाळण्याचा प्रवास सुरू झाला.
सध्या या संस्थेमध्ये एकूण
1) HIV positive मुलांची संख्या = 200
2) मतिमंद संख्या = कुणी नाही
3) शिक्षकांची संख्या.= 10
4) मनोरुग्ण महिला =20
5) माहेर प्रकल्प = 20
एकूण 250 जन आहेत
संस्थेमध्ये मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते. तेथे शिलाई मशीन असून विविध प्रकारचे कपडे, गोधड्या, छोट्या पर्से, ई. शिवून विकले जाते. एका छोट्या खोलीत हॉस्पिटल सारखी सोय केलेली असून ४-५ बेड,oxygen cylinder, emergency medicines या सर्व गोष्टींची सोय केलेली आहे.
विशेष म्हणजे आतापर्यंत संस्थेतील 32 मुला मुलींचे विवाह लावून देण्यात आलेले आहे. त्यापैकी 8 जोडपी संस्थे बाहेर राहून आपला संसार करत आहेत तर बाकीचे सर्व जण पालवी मध्ये राहून आपला संसार करताहेत .
सर्व मुलांचे जेवण स्वतः मंगला ताई बनवतात. बाहेरचा कोणताही पदार्थ मुलांना खायला दिला जात नाही. अगदी हॉस्पिटल मध्ये सुद्धा कोणी ऍडमिट असेल तर जेवण, पाणी सर्व पालवी मधूनच दिले जाते. संस्थेची स्वतःची शाळा आहे, मुलांचे सर्व शिक्षण तिथेच होते.
सध्या तिथे सर्वात लहान एड्स बाधित असणारी मुलगी दि. २६ जानेवारी २०२५ रोजी फक्त १७ दिवसांची आहे.
आपला ड्राईव्ह ज्या दिवशी होता म्हणजे २६ जानेवारीला तिथं लग्न होते, दोघेही पालवी मध्येच राहिलेले... लहानचे मोठे झालेले... अतिशय सुंदर, पवित्र वातावरणात ड्राईव्ह संपन्न झाला.
संस्थेने मागणी केल्याप्रमाणे मुस्कान तर्फे महिनाभराचा किराणा तसेच मुलांकरिता राजगिरा लाडू आणि शेंगदाणा चिक्की देण्यात आली.सर्व सामानाची खरेदी पंढरपूर येथेच करण्यात आली. ते काम आमच्या कंपनी चे पंढरपूर येथे कार्यरत श्री......धर्माधिकारी आणि श्री....वसेकर यांनी केली.
तसेच कोल्हापूरचे श्री....कळसकर, श्री.....बावधाने, श्री. किरण.... यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यास मदत केली. तसेच पंढरपूरची मैत्रीण स्वाती ताई.....यांनी संस्थेबद्दल सगळी माहिती दिली, त्या पूर्ण वेळ आमच्या सोबत होत्या. या सगळ्यांचे खूप आभार. आणि तुमचे सगळ्यांचे पण आभार, तुमच्या सहकार्याशिवाय इतके मोठे कार्य शक्य नाही.

ड्राईव्ह हेड - सौ. मयुरी शिंदेतारीख -२३ डिसेंबर २०२४आज मुस्कान टीम तर्फे आपला डिसेंबर महिन्याचा ड्राईव्ह कोकण कलाविकास श...
24/01/2025

ड्राईव्ह हेड - सौ. मयुरी शिंदे
तारीख -२३ डिसेंबर २०२४
आज मुस्कान टीम तर्फे आपला डिसेंबर महिन्याचा ड्राईव्ह कोकण कलाविकास शिक्षण संस्थेच्या युनिकॉर्न चाइल्ड केअर सेंटर मध्ये करण्यात आला.

यासंस्थेची २ केंद्र आहेत. पुण्याला आणि पनवेल ला. पुण्याच्या केंद्रात ३० मुले आहेत. तेथे कविड ग्रस्त अनाथ मुले आहेत. पनवेल येथील केंद्रात एकूण २५ मुले आहेत. ही सर्व मुले स्टेशन वर, फूटपाथ वर राहणाऱ्या लोकांची आहेत. यांचे पालक छोट्या छोट्या गोष्टी,गजरे, हार वगैरे विकतात. आणि ही मुले ट्रेन मध्ये, स्टेशन वर, सिग्नल ल भिक मागत फिरायची. आणी त्यांचे आई वडील त्यांना उत्पन्नाचं एक साधन म्हणून बघत असतं. अशा सर्व मुलांना या संस्थेने एकत्र केले आहे. त्यांच्या आई वडिलांना शिक्षण, संस्कारआणि चांगलं राहणीमान याबद्दल पटवून देऊन, त्यांच्या संमतीने ही सर्व मुलं इथे राहतात.

ही सर्व मुले सेमी इंग्लिश शाळेत शिकतात. स्कूल बस नी येतात जातात. संस्थेच्या केंद्रात त्यांना झोपण्यासाठी बंक बेड्स होते. २४ तास जेवणासाठी एक काकू तिथे राहतात. श्री. संतोष तेथील केअर टेकर आहेत. ते स्वतः MSW (masters of social work) aahet. ते त्यांच्या पत्नीसह तेथे राहतात. रोज सकाळी मुलांचा योगा घेतला जातो. संध्याकाळी त्यांचा अभ्यास घेतला जातो. वेळ जाण्यासाठी विविध क्राफ्ट आणि ड्रॉइंग च्या ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात.

रस्त्यावर फिरायची सवय असलेल्या आणि कधीही कुठेही झोपा, उठा अशा सवई असलेल्या या मुलांना शिस्त शिकवणे, एका जागी राहायला शिकवणे ही मोठी अडचण होती. त्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणे, एका वेळापत्रकात त्यांना बांधून ठेवणं ही मोठी जबाबदरी संस्थेपुढे होती. काल त्या मुलांना भेटून ही सर्व चॅलेंज त्यांनी पूर्ण केल्याचं दिसून आले. त्या मुलांकडे पाहून हीच ती रस्त्यावर फिरणारी मुलं अस अजिबात वाटले नही. त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्या मुलांनी स्वतःची इंग्रजी मध्ये ओळख करून दिली. कोणाला टीचर, कोणाला इंजिनिअर,कोणाला मेकॅनिक बनायचंय अशी इच्छा व्यक्त केली.

मुस्कान टीम तर्फे आपण त्यांना ४ भिंतीवरचे पंखे आणि २ गरम पाण्यासाठी गिझर दिले. मुलांसाठी स्टेशनरी किट्स आणि खाऊ दिला. या बद्दल श्री. संतोष यांनी संपूर्ण मुस्कान टीम चे आभार मानले आहेत.

तेथे मुलांसोबत फोटो वगैरे काढण्यास मनाई होती. त्यामुळे मुलांसोबत फोटोंकढता आले नहित.

Drive Head-  Mrs.Pranjali Kolarkar
24/01/2025

Drive Head- Mrs.Pranjali Kolarkar

30/09/2024

Drive Date - 28 th September 2024
Location- Janjagruti Vidharthi Sangh, Mankhurd Mumbai.

ड्राईव्ह चे ठिकाण -साई आधार संस्था, तळ्याचा पाडा, वसई.ड्राईव्ह हेड - सौ. करुणा लालगेदिनांक - २२ जून २०२४या संस्थेचे संचा...
22/06/2024

ड्राईव्ह चे ठिकाण -साई आधार संस्था, तळ्याचा पाडा, वसई.
ड्राईव्ह हेड - सौ. करुणा लालगे
दिनांक - २२ जून २०२४
या संस्थेचे संचालक श्री. परुळेकर म्हणजेच संस्थेत राहणाऱ्या मुलांचे आबा. आबा चार वर्षाचे असतानाच त्यांचे मातृ पितृ छत हरपले. त्यानंतर आबांच्या नातेवाईकांनी त्यांना न स्वीकारल्याने त्या न कळत्या वयात साई बाबांच्या मंदिराच्या बाहेर भीक मागणे, चोरी करणे असे करून ते पोट भरत होते. त्यानंतर सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळेत जेवण मिळत म्हणून शिक्षण घेतले. शिकत असताना आवडत नसुनही उदरनिर्वाहा करीता चप्पल, कपडे, पैसे चोरी करणे हे त्यांना भाग पडत होते. त्यांनी केलेली शेवटची चोरी म्हणजे सायकल व ही सायकल घेवुन पळून जात असतानाच एका पोलिसांनी त्यांना पकडले आणि रिमांड होम मध्ये भरती केले. मग पुढे कॉलेज चे शिक्षण घेता घेता वॉचमन ची नोकरी लागली.
असेच एकदा वर्ध्यात असताना एक अनाथ भुकेला मुलगा त्यांना भेटला आणि त्यांना त्यांचे लहानपणीचे दिवस आठवले आणि त्यांनी त्याला आश्रय दिला. आणि तिथूनच साई आधारवड संस्थेला सुरुवात झाली.
सध्या इथे 41लहान मोठी मुलं आणि मुली राहतात. सगळ्यात लहान तीन वर्षाची मुलगी आहे. यातील काही मुलांना आई वडील आहेत पण ते त्यांना स्वीकारत नाही, काही मुलांना आई वडील नाहीत. पुणे, अहमदनगर, धुळे, रायगड अश्या विविध गावातुन प्लॅटफॉर्म वर रस्त्यावर, सिग्नल वर राहणारी मुल इथे राहतात. त्या सर्व मुलांचे आबा आणि त्यांची पत्नी स्वतच्या मुलांसारखे संगोपन करतात.

आज आपण मुस्कान टीम कडून या मुलांसाठी चप्पल, रेनकोट, पावसापासून संरक्षण होण्यासाठी ताडपत्री, चटई, बिस्कीट, केक असे घेवून गेलो होतो.
तसेच त्यांच्या आजुबाजुला वीटभट्टी कामगार रहातात त्यांच्या साठी सुद्धा कपडे, साड्या, बेडशीट, किराणा किट, भांडी छत्री, रेनकोट असे घेवून गेलो होतो.
तसेच संस्थेच्या आवारात एक कडूलिंबाचे झाडही आपण मुस्कान टीम तर्फे लावले.

स्वतः ज्या परिस्थिती तुन गेले ती दुसऱ्यावर येवू म्हणून ते गेली अठरा वर्ष ते कार्यरत आहेत.
तिथे रहायला आलेल्या प्रत्येक मुलाची दारुण कथा निरनिराळी आहे.

फक्त स्वतः च्या संस्थेचा विचार न करता परुळेकर सरांनी आजूबाजूच्या परिसरातील कुटुंबांसाठी ही तेवढ्याच आपुलकीने त्यांच्या अत्यावश्यक वस्तू देण्याचे आपल्याला सुचवले ही खुप मोठी गोष्ट निदर्शनास आली.

टीम मुस्कान च्या नावाने एक झाड लावण्यात आले.

ड्राईव्ह हेड - दीपमाला चौकीकरमे  2024एप्रिल और मे का ड्राइव पातालकोट के ग्राम kareyam Ratedh में किया आदिवासी लोगों का य...
11/06/2024

ड्राईव्ह हेड - दीपमाला चौकीकर
मे 2024
एप्रिल और मे का ड्राइव पातालकोट के ग्राम kareyam Ratedh में किया
आदिवासी लोगों का यह गांव चारों तरफ से पहाड़ों से घिरा हुआ है और बीच में यह एक गांव है जो 12 किलोमीटर पहाड़ियों से नीचे जाने पर आता है

यहां पर कल मुस्कान टीम की तरफ से जरूरतमंद लोगों को राशन किट दी गई है
वहां के लोग बहुत खुश थे और पूरी मुस्कान टीम को उन लोगों ने धन्यवाद दिया है 🙏🙏
मुझे भी उनके चेहरों पर खुशी देखकर बहुत आनंद आया और यह सब पूरी टीम के कारण संभव हुआ है

धन्यवाद आप सभी को 🙏🙏👍👍

Address

Mumbai
400071

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Muskaan - A Step Towards Charity posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share