03/01/2025
चिमण्यांचं घरटं पुन्हा नव्याने....🏠
आपल्या दातृत्वाला माझा साष्टांग नमस्कार....🙏🏻
यशोधरा आदिवासी मुलांचे निवासी आश्रम पुन्हा नव्याने उभा राहत आहे. या आश्रमाला चालू होऊन सोळा वर्षे पूर्ण होत आहे. अगदी सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत आणि अनेकदा चढउतारांना सामोरे जात लाभार्थ्यांना अश्रय देण्याचं काम करत आहे. या आश्रमातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन स्वतः निर्णयक क्षमता त्यांच्या मधून दिसून येत आहे. नोकरीच मिळावी अशी अपेक्षा न धरून समाज माध्यमातून एक चांगले प्रकारे व्यावसायिक जीवन जगताना दिसत आहे.
यातूनच गुन्हेगारीचे मूळ नष्ट होत होत आहे असे चित्र पाहायला मिळत आहे.
यशोधरा आदिवासी आश्रमाचा हेतू व ध्येय एकच आहे ते म्हणजे शिक्षणाचा प्रसार करणे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली या आदिवासी बांधवांनी 55 ते 60 वर्ष विना शिक्षणा शिवाय वाया घालवली त्याला कारण ही तसेच होते गुन्हेगारीचा पगडा त्यांच्या माथ्यावर होता म्हणून. पण आता चित्र हे बदललेले दिसत आहे. 75 वर्षातील शिक्षणाची पोकळी भरून काढण्यासाठी हा आदिवासी समाज सज्ज झाला आहे.
आत्ताशी कुठेतरी हा आदिवासी समाज मागील 15 ते 20 वर्षापासून या कमी वेळेमध्ये इतर समाज माध्यमाध्ये मिळुन मिसळून आपलं जिवन जगू लागला.
आतापर्यंत शिक्षण घेतले या आदिवासींनी फक्त जगण्यासाठी पण यापुढे शिक्षण घेतील ते शर्यत जिंकण्यासाठी म्हणजेच नोकरीसाठी.
शर्यतीला सुरुवात झाली आहे गरज आहे तुमच्या पाठबळाची, गरज आहे तुमच्या मार्गदर्शनाची, गरज आहे तुमच्या दातृत्वाची.....🙏🏻
म्हणून
पुन्हा नव्याने बांधत आहोत चिमण्यांचं घरटं....!
25×15 हॉल व पडवी सह पक्क बांधकाम चालू केले आहे.
वीट. 10,000 किंमत 60,000/ हजार.
खडी,डस्ट. 10 ब्रास 50,000/ हजार अंदाजे.
सिमेंट 150 पोती, 150×350=52,500/
स्टिल 1,500 कि,
1,500×53=79,500/
व इतर खर्च=25 हजार.
असे अंदाजे खर्च येत आसुन आपल्या माध्यमातून जे शक्य होत असेल त्या प्रमाणे मदत करून या सामाजिक कार्याला आपलं योगदान लाभावे हि आपेक्षा..... धन्यवाद 🙏🏻
ईश्वर काळे
मनिषा काळे
मो: 8149091844
बँक डिटेल्स:
Adivasi Yugpravartak Samajik Vikas Pratishthan .Bardgaon D.T.Karjat District. Ahmednagar.
Account no. 364202010121783
IFSC Code -UBIN 0536423
Bank Name- Union Bank of India
Branch- Rashin.