शिवदुर्ग मित्र, लोणावळा - Shivdurga Mitra , Lonavla

  • Home
  • India
  • Lonavla
  • शिवदुर्ग मित्र, लोणावळा - Shivdurga Mitra , Lonavla

शिवदुर्ग मित्र, लोणावळा - Shivdurga Mitra , Lonavla Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from शिवदुर्ग मित्र, लोणावळा - Shivdurga Mitra , Lonavla, Non-Governmental Organization (NGO), 341, Shivai, Nangargaon, Lonavla.
(1)

10/04/2026

*राजगुरूनगर खेड पोलीस स्टेशन येथे नोंदवलेल्या खुनाच्या केसमधील महत्वाचा पुरावा मोबाईल फोन विहिरीतुन शोधण्यात शिवदुर्गला यश*

राजगरुनगर, खेड पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 16/03/2026 रोजी 103 (1) BNS मयत धनंजय मारुती घेवडे यांच्या खुनाच्या केसमधील आरोपी ललीत खोल्लम व नंदलाल होले यांनी महत्वाचा पुरावा असलेला मोबाईल फोन खेड पोलीस स्टेशन पासुन 16 किमी वाफगाव येथील विहिरीत टाकलेला होता. विहीर खोल होती विहिरीत गाळ होता. व मोबाईल शोधायचे काम शिवदुर्गला आले.
श्री शंकर भवारी साहेब यांचा फोन आला घटनेबद्दल माहिती दिली. व मदतीसाठी विनंती केली. आमची कामे उरकली स्कुबा सिलेंडर रिफिल करुन घेतले व टिम निघाली.
तळेगाव चाकण रोड नेहमीप्रमाणे ट्रँफिक जँम व पाऊस वादळ चालु झाले होते खेड पोलीस स्टेशनला पोचलो. श्री सुभाष चव्हाण साहेब पोलीस निरीक्षक खेड यांनी सर्व माहिती दिली आपूलकीने चौकशी केली. व घटना स्थळाकडे रवाना झालो. तीस चाळीत मिनिटात जागेवर पोचलो. आरोपीने कुठून कूठे कसा मोबाईल फेकला ते सांगितलं व आम्ही कामाला लागलो. विहिरीत स्कुबा करताना पाण्यातील मोटर कनेक्शन बंद करायला सांगितलं फ्यूज काढून ठेवायला सांगितलं. खाली मोटार सोडलेली असते त्यामुळे त्याची वायर व इतर तीन दोऱ्या व पाईप साठी काही दोऱ्या याचे जाळे असते. त्यात आपला स्कूबाडायवर अडकण्याची शक्यता असते. एखादी दोरी खालुन वरून गेली तर जिवावर बेतू शकते. सगळा सेट अप रेडी केला आकाश मोरे हा खाली जाणार होता. महेशभाऊ मसने मध्ये एका स्टेपवरुन त्याला मार्गदर्शन व बीले करणार होते. महेश भाऊसाठी एक बीले वरुन आनंद गावडेसर कंट्रोल करीत होते. प्रकाश रत्नाकर सर्व साहित्य व सर्व कामावर सिनियर म्हणून लक्ष ठेऊन होते. सुनिल गायकवाड यांनी सेट अप लावला महेश मध्य भागी असलेल्या ठिकाणी जाऊन थांबले. वरुन आकाशला सर्व साहित्य स्कुबासुट, सिलेंडर घालुन खाली सोडायचं होते. तसे सुरक्षित खाली सोडले.
आता तपास, शोध, पंचनामे आँनलाईन व इन कँमेरा करायला लागतात. त्यामूळे सर्व कायदेशीर बाबी पुर्ण करून काम चालू झाले.
आकाश खाली पोचला साधारण एक फुटापेक्षा जास्त गाळ विहिरीत होता येवढी छोटी वस्तू या गाळातून शोधने अवघड होते पावसाचे वातावरण होते ढग अंधारुन आले होते त्यामुळे आत काही दिसायचा प्रश्नच न्हवता. गाळ हलून गढूळ पाणी होत होते. एक तासापेक्षा जास्त वेळ महेश भाऊ व आकाश यांचे नियोजन चाललेले होते. आकाशला वरुनही एक बीले दिला होता. तो अडचण करीत होता तो काढून टाकला. सिलेंडर वर लक्ष ठेवावे लागत होते, बचत करून त्याचा वापर आकाश करीत होता. किती काळ शोध मोहिम चालेल काही सांगु शकत नाही. आकाश एक एक भाग नीट तपासून घेत होता. परत काम करायला नको हिच भावना असते व आजच मोहिम फत्ते करायची यासाठी सर्व जण मनलावून काम करत असतात. साधारण साडेसहा नंतर मोबाईल सापडला वर्णन केलेला मोबाईल आकाशला हातात आला होता. आता परत आकाशला अर्ध्यावर वर ओढून घेतले. महेश भाऊ आकाश दोघेही अर्ध्यावर असलेल्या पायऱ्यावरुन हळु हळु वर आले मोबाईल साहेबाना दिला पंचनामा पुर्ण केला.
पोलीस निरीक्षक श्री सुभाष चव्हाण साहेब पुर्ण वेळ आमच्या बरोबर थांबून शोधमोहिमेवर लक्ष ठेवून होते त्यांच्या सर्व सहकारी लागेल ती मदत करीत होते.
सर्व अधिकारी व स्टाफचे आभार.
आजची टीम
महेश मसने
आकाश मोरे
प्रकाश रत्नाकर
आनंद गावडे
सुनिल गायकवाड
शिवदुर्ग मित्र, लोणावळा
रेस्कु टीम
संपर्क
9822500884
8308296655

ग्रेट भेट महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक डाँ. सदानंद दाते साहेब यांची सदिच्छा भेट 🙏दिनांक 03/01/2026 रोजी श्री सदानंद दात...
07/04/2026

ग्रेट भेट
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक डाँ. सदानंद दाते साहेब यांची सदिच्छा भेट 🙏
दिनांक 03/01/2026 रोजी श्री सदानंद दाते साहेबांनी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक पदाची सुत्र हातात घेतली.
शिवदुर्ग मित्र, लोणावळा संस्थेचे व साहेबांची ओळख व संबध 2009 सालापासुन आहेत. त्यामुळे साहेबाना शुभेच्छा देण्यासाठी सर्व जण आतुर झालेलो होतो. मग साहेबांची वेळ घेतली व भेटायला गेलो. कोणालाही साहेबांबद्दल सांगितले तर प्रत्येकाच्या तोडून एकच शब्द येत होता देवमाणूस आहे. आम्ही तर 2009 साली फोर्स वन पासून अनुभवत होतोच.एकदम सरळ मार्गी, अत्यंत कडक शिस्तीचे साहेब कितीही मोठ्या पदावर गेले तरीही स्वभावात काही बदल झाला नाही. तीच आपुलकी, तोच आपलेपणा आजही जाणवला. सर्वांची आपुलकीने चौकशी केली. जुने सर्व प्रसंगाची साहेबांनी आठवण करुन दिली .
गडकोट, शोध बचाव मोहिमेबाबत छान चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेविषयी काही योजना सांगितल्या.
भेटून सर्व शिवदुर्ग टिम धन्य धन्य झाली.
अशा गुरु समान साहेबाना खुप खूप शुभेच्छा 🙏

The wait is almost over…!Only 47 days to go until climbers from across the country come together to test their strength,...
06/04/2026

The wait is almost over…!

Only 47 days to go until climbers from across the country come together to test their strength, technique, and mindset at one of the most thrilling events of the year

Welcome to the Lonavala Open National Bouldering Championship 2026 – 4th Edition
Where every move matters, every grip counts, and every second pushes you closer to the top

Registrations are now OPEN
Click on the link and register: https://forms.gle/BTJ4bRGYhqfbc55v5

championship

29/03/2026

दिनांक 08/03/2026
जागतिक महिला दिनाला शिवदुर्ग मित्र लोणावळाच्या कु. वैष्णवी भांगरे यांचा सन्मान करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त, लोणावळा नगरपरिषद व महिला बाल कल्याण समिती आयोजित कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचे समाजातील उत्कृष्ट योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
शिवदुर्ग मित्र, लोणावळाची संचालीका, तसेच शिवदुर्ग अँनिमल रेस्कुची प्रमुख कु. वैष्णवी रविंद्र भांगरे यांनी केलेल्या अनेक अँनिमल रेस्कु व साहसी शोध बचाव मोहिमेतील सहभागाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
लोणावळा नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री राजेंद्र सोनवणे तसेच सौ सारीकाताई सुनिल आण्णा शेळके यांच्या शुभहस्ते हा सन्मान करण्यात आला.
धन्यवाद लोणावळा नगरपालिका, महिला बाल कल्याण समिती, सभापती सौ स्वप्नाताई अतुल कदम व सौ. संयोगिताताई साबळे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Late post🙏🧗🏻‍♀️ श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट, डेरवन आयोजित युथ गेम्स 2026 (चिपळूण)📅 दिनांक: 28 फेब्रुवारी 2026 ते 0...
24/03/2026

Late post🙏
🧗🏻‍♀️ श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट, डेरवन आयोजित युथ गेम्स 2026 (चिपळूण)
📅 दिनांक: 28 फेब्रुवारी 2026 ते 01 मार्च 2026
या स्पर्धेदरम्यान झालेल्या लीड क्लायंबिंग स्पर्धेत आपल्या शिवदुर्ग क्लायंबिंग टीम मधील एकूण पाच क्लायंबर्सनी सहभाग नोंदवला होता.
यामधे
🔹 15 वर्षाखालील मुले (गट):
• मौला बशीर सैय्यद – 🥉 तृतीय क्रमांक (Bronze Medal)
🔹 18 वर्षाखालील मुले (गट):
• आयुष संदीप पवार – 🥇 प्रथम क्रमांक (Gold Medal)

👏 सर्व विजेते आणि सहभागी स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन!

💐 पुढील स्पर्धांसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

–शिवदुर्ग मित्र लोणावळा

शिवराज 🚩🚩🚩🚩
19/03/2026

शिवराज 🚩🚩🚩🚩

६७ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादग्रस्त उपांत्य फेरीनंतर पंचांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्यावर ३ वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
-

15/03/2026

शिवदुर्ग मित्र लोणावळा प्रस्तुत
श्री प्रविण नंदकुमार देशमुख लिखित व दिग्दर्शीत महानाट्य
शिवशंभू शौर्यगाथा..
अलिबाग रायगड येथील प्रयोग

13/03/2026

शिवदुर्ग मित्र, लोणावळा म्हणजे
व्यायामाची आवड निर्माण करणे, खेळाडू घडवणे, खेळाला प्रोत्साहन देणे, सामाजिक कामाची आवड निर्माण करणे.. इतिहासाची आवड निर्माण करणे, इतिहास घडवणे.
आपल्या मुलांना सहभागी व्हायचे असेल तर नक्की संपर्क साधा.
योगेश उंबरे सर
सचिन गायकवाड सर

08/03/2026

सिहंगड इन्स्टीट्यूट लोणावळा मधील NSS चे शिबीर आंबवणे, ता. मुळशी, जि पुणे येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबीरा अतर्गत शिवदुर्ग मित्र, लोणावळा संस्थेचे कार्य व या साहस उपक्रम त्यामधून निर्माण होणाऱ्या व्यवसाय नोकरीतील संधी याविषयी माहिती देण्यात आली.
काही व्हिडीओच्या माध्यमातून व काही प्रात्यक्षिके करुन दाखवली शिवदुर्ग करीत असलेल्या उपक्रमामध्ये सर्वांनी सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमासाठी शिवदुर्गचे सदस्य राष्ट्रीय खेळाडू कु. आदित्य बलकवडे यांनी विषेश सहकार्य केले. तसेच सिहंगड काँलेजचे प्रोफेसर, स्टाफ यांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

शिवदुर्ग मित्र लोणावळा मध्ये सामिल होण्यासाठी
हेल्पलाईन नंबर
9822500884
8308296655

Address

341, Shivai, Nangargaon
Lonavla
410401

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवदुर्ग मित्र, लोणावळा - Shivdurga Mitra , Lonavla posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to शिवदुर्ग मित्र, लोणावळा - Shivdurga Mitra , Lonavla:

Share