UMED Foundation, Kolhapur

UMED Foundation, Kolhapur COVID-19 Relief Initiative - Awareness campaign & Ration help.

Donate on www.umedseva.com .We also work towards empowerment and education towards under privileged kids. adress
Umed Foundation Sangrul ,
Main Road,
At post - SANGARUL, Taluka - KARVEER,
KOLHAPUR, MAHARASHTRA 416204
India

श्री ब.ह.पाटील सेवाभावी संस्था ,खुपीरे यांच्या वतीने उमेद फौंडेशन ला सामाजिक गौरव पुरस्कार मा.श्री आमदार चंद्रदीप नरके स...
09/08/2026

श्री ब.ह.पाटील सेवाभावी संस्था ,खुपीरे यांच्या वतीने उमेद फौंडेशन ला सामाजिक गौरव पुरस्कार मा.श्री आमदार चंद्रदीप नरके साहेब व मा.खा. संजय मंडलिक साहेब मा.श्री. अजित नरके (संचालक.गोकुळ दूध संघ,) मा.श्री संजय ब.पाटील (संचालक. कुंभी कारखाना) यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले
यावेळी उमेदीयन मा.श्री. एस .पी. चौगले सर (संचालक कुंभी बँक ),श्री सचिन बगाडे यांनी पुरस्कार स्विकारला.
तसेच मा.श्री इंद्रजित पाटील जि.प. सदस्य, एस.आर.पाटील (संचा. गोकुळ दूध संघ) मा.श्री . अविनाश पाटील (संचा.कुंभी कारखाना ),श्री प्रकाश पाटील साहेब,श्री आनंदराव पाटील साहेब व इतर मान्यवर,सभासद उपस्थित होते
सर्व देणगीदार , दाते , उमेद टीम यांचे अभिनंदन व आभार !

उमेद फौंडेशन सेवा परिवार
097641 81938

अभिनंदन,! 🌹सर्व उमेद टीम .!🌹श्री. ब.ह. पाटील सेवाभावी संस्था, खुपीरे यांच्या वतीने -..🔰 सामाजिक गौरव पुरस्कार--- 🌷उमेद फ...
06/08/2026

अभिनंदन,!
🌹सर्व उमेद टीम .!🌹
श्री. ब.ह. पाटील सेवाभावी संस्था, खुपीरे यांच्या वतीने -..🔰 सामाजिक गौरव पुरस्कार--- 🌷उमेद फौंडेशन "ला जाहीर🌷
पुरस्कार वितरण -
🔰शनिवार, दि. 8/8/2026, स 9 वा.
ठिकाण- श्री लक्ष्मी सह. दूध संस्था, खुपीरे ता. करवीर
आपला नम्र
उमेद फौंडेशन
097641 81938

02/08/2026

विद्या मंदिर घुंगुर (ता. शाहुवाडी) तसेच खापणेवाडी व आधाववाडी (ता. पन्हाळा), जि. कोल्हापूर येथील जिल्हा परिषद शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम एस. एस. कम्युनिकेशन, कोल्हापूर, कोल्हापूर ड्रीम टीम फाउंडेशन आणि उमेद फाउंडेशन यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. शिक्षणासाठी आपला सहवास आणि सहकार्य असेच कायम राहो. 🙏📚

उमेद मायेचं घर मधील आर्यन चा नोकरीचा पहिला दिवस....!🙏आठवीला असताना वडिलांचे छत्र हरवलेला आर्यन उमेद मायेचं घर मध्ये दाखल...
01/08/2026

उमेद मायेचं घर मधील आर्यन चा नोकरीचा पहिला दिवस....!🙏

आठवीला असताना वडिलांचे छत्र हरवलेला आर्यन उमेद मायेचं घर मध्ये दाखल झाला होता.
उमेद ने त्याचे व्यवसायिक शिक्षण ITI कोर्स पूर्ण करून घेतला.
आज तो आपल्या सर्वांच्या मदतीने, एकत्रित टीम वर्क, सहकार्याने, स्वतःच्या पायावर उभा राहून स्वावलंबी बनला आहे.

आर्यन चे पुढील शिक्षण सुरूच राहील पण तो आता नवी उमेद बनून त्याच्या आईचा घराचा, आधार,बनला आहे.
याबद्दल आर्यन चे, त्याच्या कुटुंबाचे व सर्व उमेद टीम चे, दात्यांचे अभिनंदन! 💐🙏

आपला नम्र

उमेद फौंडेशन सेवा परिवार*
उमेद मायेचं घर सामाजिक प्रकल्प पत्ता - कोल्हापूर गगनबावडा रोड , सांगरुळ फाटा,गणेश नाळवा ,कोपार्डे ता करवीर कोल्हापूर
विभागीय कार्यालय - वैभववाडी जि सिंधुदुर्ग
7972395675 /9764181938
www.umedseva.com

जागवू संवेदना.....!उमेद फौंडेशन मार्फत एका गरजू हुशार विद्यार्थ्याला उमेद लॅपटॉपबँक मार्फत उच्च शिक्षणासाठी लॅपटॉप तर एक...
10/07/2026

जागवू संवेदना.....!
उमेद फौंडेशन मार्फत एका गरजू हुशार विद्यार्थ्याला उमेद लॅपटॉपबँक मार्फत उच्च शिक्षणासाठी लॅपटॉप तर एका गरजू युवकास उमेद कौशल्य सहाय्य विभाग मार्फत प्लम्बिंग व्यवसाय किट उमेदीयन प्रा एस पी चौगले सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.*
यावेळी उमेदीयन प्रकाश गाताडे, साखरशाळा सेंटर हेड सचिन बगाडे, समन्व्यक ओंकार चौगले व उमेद मायेचं घर मधील मुलं उपस्थित होती...
आपली मदत अशा अनेक गरजू तरुणाईला शिक्षणासाठी व स्वावलंबी होण्यासाठी अनमोल आहे.

*उमेद फौंडेशन सेवा परिवार*
कोल्हापूर गगनबावडा रोड, कोपार्डे,
ता करवीर जि कोल्हापूर
9764181938/7972395675

✒️📚📕उमेदीयन अभय पाटील यांच्या माध्यमातून शै.पालकत्व मोहीम साठी दीड लाख रुपयांच्या वह्या प्राप्त...       शैक्षणिक पालकत्...
05/07/2026

✒️📚📕
उमेदीयन अभय पाटील यांच्या माध्यमातून शै.पालकत्व मोहीम साठी दीड लाख रुपयांच्या वह्या प्राप्त...
शैक्षणिक पालकत्व मोहिमेत अभय ने सिंहाचा वाटा उचलून शैक्षणिक पालकत्व मोहीम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे... त्याचबरोबर या मदतीतून गरजू विद्यार्थ्यांच्या पर्यंत मदत पोहचवण्यासाठी उमेदीयन अभय ने खूप मेहनत घेतली आहे... तसेच उमेद मायेचं घर साठी लागणारे वस्तूरुप साहित्य... विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी लागणारे सर्व साहित्य... अन्नदान... इ.गोष्टी उमेदीयन अभय पाटील यांच्या माध्यमातून नेहमी प्राप्त होत असतात... तसेच उमेदच्या सर्व मोहिमेत अभय नेहमीच तत्परतेने सहभागी होतो..उमेदसाठी तन, मन,धन देऊन अभय नेहमीच निस्वार्थी सेवा देत असतो... त्याच्या या कार्याबद्दल उमेद फौंडेशन ला नेहमीच आदर असून ...उमेद तर्फे अभय च्या या अभूतपूर्व योगदानाबद्दल मन:पूर्वक आभार..
2026 च्या शैक्षणिक पालकत्व मोहिमेत उमेदीयन अभय पाटील यांच्या माध्यमातून खालील मदत प्राप्त झाली आहे..
१.ड्रीम टीम फाउंडेशन = ४५०० वह्या (१,००,०००रु)
२. कळे पोलीस ठाणे = ५१ डझन वह्या(१५,०००रु)
3. राऊळ बाबा ग्रुप कळे =५१ डझन वह्या (१५,०००रु)
4. रोहित यादव कळे = २० डझन वह्या (६,०००रु)
5. कळे पोलीस (शेलार साहेब) = १० डझन वह्या (३,०००रु)
6. वाढदिवस मदत कळे =५ डझन वह्या (१,५००रु)..
🙏🙏🙏🙏🙏

*उमेद शैक्षणिक पालकत्व मोहीम 2026*🙏     *वाटप शाळा*येलूर हायस्कूल येलूर ता. वाळवा जि. सांगली येथील लाभार्थी विद्यार्थी स...
29/06/2026

*उमेद शैक्षणिक पालकत्व मोहीम 2026*🙏
*वाटप शाळा*
येलूर हायस्कूल येलूर
ता. वाळवा
जि. सांगली
येथील लाभार्थी विद्यार्थी संख्या = 06

🎒*सन 2014 पासून चे एकूण शैक्षणिक पालकत्व लाभार्थी विद्यार्थी =7977*

🎒*आजपर्यंत दिलेले स्कुल कीट =7983*

अनाथ,वंचित,गरजू,एक पालकत्व मुलांकरिता उमेद फौंडेशन मार्फत सुरु असलेल्या उमेद शैक्षणिक पालकत्व मोहीमेअंतर्गत आतापर्यंत


🔰 *सन 2026 चे एकूण शैक्षणिक* पालकत्व घेतलेले विद्यार्थी -
उल्का उद्योग समूह = 500
सामाजिक देणगीदार = 250
एकूण लाभार्थी विद्यार्थी= 750

आपला नम्र...
*उमेद फौंडेशन सेवा परिवार*
9764181938 / 7972395675
उमेद शैक्षणिक पालकत्व मोहीम 2026 पोस्ट : 10
दिनांक 29/06/2026

#वंचितांचेशिक्षण #शिक्षण
#उमेदफौंडेशन

*उमेद शैक्षणिक पालकत्व मोहीम 2026*🙏     *वाटप शाळा*विद्या मंदिर सावर्डे ता. राधानगरी जि. कोल्हापूर येथील लाभार्थी विद्या...
29/06/2026

*उमेद शैक्षणिक पालकत्व मोहीम 2026*🙏
*वाटप शाळा*
विद्या मंदिर सावर्डे
ता. राधानगरी
जि. कोल्हापूर
येथील लाभार्थी विद्यार्थी संख्या = 8

🎒*सन 2014 पासून चे एकूण शैक्षणिक पालकत्व लाभार्थी विद्यार्थी =7969*

🎒*आजपर्यंत दिलेले स्कुल कीट =7977*

अनाथ,वंचित,गरजू,एक पालकत्व मुलांकरिता उमेद फौंडेशन मार्फत सुरु असलेल्या उमेद शैक्षणिक पालकत्व मोहीमेअंतर्गत आतापर्यंत


🔰 *सन 2026 चे एकूण शैक्षणिक* पालकत्व घेतलेले विद्यार्थी -
उल्का उद्योग समूह = 500
सामाजिक देणगीदार = 250
एकूण लाभार्थी विद्यार्थी= 750

आपला नम्र...
*उमेद फौंडेशन सेवा परिवार*
9764181938 / 7972395675
उमेद शैक्षणिक पालकत्व मोहीम 2026 पोस्ट : 09
दिनांक 28/06/2026

#वंचितांचेशिक्षण #उमेद

*उमेद शैक्षणिक पालकत्व मोहीम 2026*🙏     *वाटप शाळा*विद्या मंदिर शेळोशी ता. गगनबावडा   जि. कोल्हापूर येथील लाभार्थी विद्य...
29/06/2026

*उमेद शैक्षणिक पालकत्व मोहीम 2026*🙏
*वाटप शाळा*
विद्या मंदिर शेळोशी
ता. गगनबावडा
जि. कोल्हापूर
येथील लाभार्थी विद्यार्थी संख्या = 10

🎒*सन 2014 पासून चे एकूण शैक्षणिक पालकत्व लाभार्थी विद्यार्थी =7959*

🎒*आजपर्यंत दिलेले स्कुल कीट =7969*

अनाथ,वंचित,गरजू,एक पालकत्व मुलांकरिता उमेद फौंडेशन मार्फत सुरु असलेल्या उमेद शैक्षणिक पालकत्व मोहीमेअंतर्गत आतापर्यंत


🔰 *सन 2026 चे एकूण शैक्षणिक* पालकत्व घेतलेले विद्यार्थी -
उल्का उद्योग समूह = 500
सामाजिक देणगीदार = 250
एकूण लाभार्थी विद्यार्थी= 750

आपला नम्र...
*उमेद फौंडेशन सेवा परिवार*
9764181938 / 7972395675
उमेद शैक्षणिक पालकत्व मोहीम 2026 पोस्ट : 08
दिनांक 28/06/2026

Vijaay Kerba
#वंचितांचेशिक्षण #शिक्षण #उमेद

Address

Umed Foundation, Sangrul . Main Road , A/P/Sangrul . Tal/Karveer Dist-Kolhapur
Kolhapur
416204

Alerts

Be the first to know and let us send you an email when UMED Foundation, Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to UMED Foundation, Kolhapur:

Shortcuts

Share