सावली फौंडेशन कोल्हापुर

  • Home
  • India
  • Kolhapur
  • सावली फौंडेशन कोल्हापुर

सावली फौंडेशन कोल्हापुर नाते आकाशा एवढे... मातीशी ..!

सावली फौंडेशन कोल्हापूर

स्थापना - 15 ऑगस्ट 2015
नोंदणी क्रमांक-
महाराष्ट्र/34995/कोल्हापुर
एफ/34629/कोल्हापूर

°°सावली फौंडेशन कोल्हापुर°°

सावली फौंडेशन कोल्हापूर च्या ११ व्या वर्धापनदिनाच्या आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.आपली साथ व प्रेम असेच राहो.धन्यवादस...
15/08/2026

सावली फौंडेशन कोल्हापूर च्या ११ व्या वर्धापनदिनाच्या आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.
आपली साथ व प्रेम असेच राहो.

धन्यवाद
सावली फौंडेशन कोल्हापूर

📚 सावली फौंडेशन, कोल्हापूर 📚      'शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रम २०२६' या सावली फौंडेशनच्या ११ व्या उपक्रमाला कोल्हापूर ...
17/06/2026

📚 सावली फौंडेशन, कोल्हापूर 📚

'शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रम २०२६' या सावली फौंडेशनच्या ११ व्या उपक्रमाला कोल्हापूर शहर व परिसरातील नागरिकांनी व इतर संस्थांनी या वर्षी देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
जमा झालेल्या साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात वह्या, रेनकोट, सँडेल ( चप्पल ), पेन, पेन्सिल, रबर, शार्पनर, पाटी, कंपास व इतर शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणात जमा झाले होते.
हे साहित्य शाहूवाडी तालुक्यातील चांदोली धरण परिसरातील केदारलिंगवाडी, अंबाईवाडी, धनगरवाडा, ढवळेवाडी ( उखळु, शित्तुर वारूर परिसर ) राधानगरी तालुक्यातील डीगेवाडी, दळवेवाडी, जोंधळेवाडी, मिसाळवाडी, धनगरवाडी - भैरीबांबर, भीमनगर, भैरीबांबर धनगरवाडा, रामनवाडी - धनगरवाडा, हणभरवाडी ( किलचा पठार ) करवीर तालुक्यातील सोनूर्ले या वाड्यावस्तीतील एकूण ३०० हुन अधिक गरजू मुलांना तसेच कोल्हापूर शहरातील काही गरजू मुलांना या साहित्याचे वितरण करण्यात आले.
हा उपक्रम गेली दहा वर्षे अव्याहतपणे सुरू आहे आणि दरवर्षीचा दानशूर व्यक्ती, संस्था यांचा प्रतिसाद पाहता या पुढेही सातत्याने सुरू राहील अशी खात्री आहे.
तसेच या उपक्रमासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघटना (कोल्हापूर युनिट) – यांच्याकडून विशेष आर्थिक मदत लाभली व बँक ऑफ महाराष्ट्र कोल्हापूरचे कर्मचारी हे प्रत्यक्ष शैक्षणिक साहित्य वाटपामध्ये आणि संकलनामध्ये सहभागी राहिले.

सावली फौंडेशनतर्फे गरजूंना ही साहाय्य करताना सर्वांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करणा-या राजर्षी छत्रपती शाहू महाराज या महान लोकराजाचे विचार व कार्य आमच्या पुढे दीपस्तंभाप्रमाणे उभे आहे.
या उपक्रमास आपण सर्वांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल 'सावली फौंडेशन, कोल्हापूर' आपले आभारी आहे.

📚 शिक्षण व शिक्षणपूरक साहित्य वितरण उपक्रम २०२६
सावली फौंडेशन, कोल्हापूर 📚

📚 शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम २०२६ 📚सालाबादप्रमाणे यावर्षीही सावली फौंडेशन तर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील वाड्या वस्ती मधी...
13/05/2026

📚 शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम २०२६ 📚

सालाबादप्रमाणे यावर्षीही सावली फौंडेशन तर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील वाड्या वस्ती मधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणोपयोगी व शिक्षणपुरक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या साठी आपण कशी मदत करू शकता ?

आपल्या प्रत्येकाच्या घरी अशा कितीतरी वस्तू असतात, ज्यांचा आपण आणि आपल्या घरातील विद्यार्थ्यांने फारच थोडा वापर किंवा अजिबातच वापर केलेला नसतो. हट्टापायी पाल्याला नव्या वस्तू आणतो आणि मग आधीच्या तशाच पडून राहतात _' ती वस्तू विकण्यापेक्षा कुणाला तरी ती उपयोगी पडली तर अधीक चांगले '_ असं आपल्याला वाटतं असतं...

उदा. वह्या, शालेय पुस्तके, गोष्टीची पुस्तके, पाटी - पेन- पेन्सिल, कंपास पेटी, स्कूल बँग, खेळ साहित्य, व्यायाम साहित्य, कॉम्प्यूटर, सायकल, नवीन जेवणाचा डबा, छत्री व रेनकोट इ. सर्व प्रकार चे शैक्षणिक व शिक्षण पूरक साहित्य.
( 📚- 🖊-✏ - 👟- 🎒- 🏏🏸- 🚴‍♀- 🎨- 🖥- ☂-🖌 )

या वस्तू देवून तुम्ही *सावली* च्या उपक्रमाचा हिस्सा होवू शकता.

आणि या साठी तुम्ही आम्हाला खालील नंबर वर संपर्क साधू शकता किंवा दिलेल्या पत्यावर साहित्य जमा करू शकता.

आमचा नंबर -
निखिल कोळी 8928184543

सावली फौंडेशन गुगल पे नंबर - 8007000767

प्रत्यक्षात साहित्य जमा करण्यासाठी *पत्ता* -

◆ सुदर्शन सोलर, शाहूपुरी 3 री गल्ली, पत्की हॉस्पिटल शेजारी कोल्हापूर.
◆ माऊंटन ऍडव्हेंचर, उमा टॉकीज मागे कोल्हापूर.

साहित्य जमा करण्यासाठी अंतीम दि. 31 मे 2026

📚 सावली फौंडेशन कोल्हापूर 📚

दीपावली उपक्रम २०२५, आभार आपल्यांचे 🙏🏻सावली फौंडेशन कोल्हापूर आणि गुरुकुल सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबव...
19/10/2025

दीपावली उपक्रम २०२५, आभार आपल्यांचे 🙏🏻

सावली फौंडेशन कोल्हापूर आणि गुरुकुल सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या दिवाळी फराळसाठी लागणारे धान्य व साहित्य वाटप उपक्रमास भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

जमा झालेले सर्व साहित्य दीपावली पूर्वी गरजू १०० कुटुंबास वाटप करण्यात आले.

हे साहित्य राधानगरी, करवीर, भुदरगड तालुक्यातील रामनवाडी, सरवडे, पणोरी, धामोड, कुंभारवाडी, दुर्गमानवाड, गारगोटी, कडगाव, म्हासुर्ली, म्हाळुंगे, चुवे, बानगे, सोनगे, निगवे, मंगोली, तुरंबे, अर्जुनवाडा, पिंपळगाव, चुये, वाळवे, रेंदाळ, कासारवाडी, कोनवडे, पिरळ, पालकरवाडी, बोरवडे या व इतर गावातील गरजू १०० कुटुंबाना हे साहित्य किट देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न, सावली फौंडेशन, कोल्हापूर आणि गुरुकुल सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आला. यंदाचे हे ५ वे वर्ष होते.

गरजू बांधवांची दिवाळी गोड करण्याचा या प्रयत्नात, आपण उपक्रमास वस्तू व आर्थिक सहाय्य करत हा उपक्रम पूर्णत्वास नेला, या बद्दल आम्ही आपणा सर्वांचे आभार मानतो. या पुढेही आपले सहकार्य लाभेल अशी आम्ही आशा करतो.

सावली फौंडेशन, कोल्हापूर

01/10/2025

चला करूया गरजू बांधवांची दिवाळी गोड.

सर्व सामान्यांचे दुःख जाणून घेऊन त्यांना शक्य होईल ती मदत करणे हीच खरी ईश्वर सेवा होय. अशीच सेवा आपण दिवाळीच्या निमित्ताने करणार आहोत. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव याच उत्सवात आपण गरजू बांधवांना सहभागी करूया व त्यांची दिवाळी गोड करूया.

मागील वर्षी आपण १०० गरजू कुटुंबांना आपण दिवाळी फराळा साठी लागणारे साहित्य देऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला होता.

सालाबादप्रमाणे यावर्षी देखील आपण सावली फौंडेशन कोल्हापूर आणि गुरुकुल सामाजिक संस्था क वाळवे तर्फे राधानगरी, भुदरगड आणि करवीर तालुक्यातील दुर्गम भागातील १०० गरजू कुटूंबाना दिवाळी फराळ साहित्याचे किट देणार आहोत. या एका किटची किंमत १५०० रु असून या उपक्रमास आपण आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात देणगी देऊ शकता.

आपली मदत त्यांच्या आयुष्यातील एक अनमोल क्षण असेल या क्षणाचे आपण साक्षीदार होऊया.

गुगल पे नंबर
8007000767

अधिक माहितीसाठी संपर्क
8928184543

सावली फौंडेशन, कोल्हापूर

अवयव दान श्रेष्ठ दान जागतिक अवयवदान दिन आणि सावली फौंडेशन कोल्हापूर १० व्या वर्धापनदिनानिमित्ताने फौंडेशनच्या १० सदस्यां...
30/08/2025

अवयव दान श्रेष्ठ दान

जागतिक अवयवदान दिन आणि सावली फौंडेशन कोल्हापूर १० व्या वर्धापनदिनानिमित्ताने फौंडेशनच्या १० सदस्यांनी फॉर्म भरून अवयव दान संकल्प केला.

या मोहिमेत अमृत पाटील, पवन यादव, सुदेश कोळेकर, प्रशांत पाटील, निखिल कोळी, निखिल पोतदार, गणेश निकम, तुषार पाटील, सूरज डांगे, प्रेरणा जाधव यांनी सहभाग घेऊन अवयव दान संकल्प पूर्ण केला.

सावली फौंडेशन कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स को ऑप असोसिएशन लि कोल्हापूर यांच्या कडून सावली फौंडेशन च्या कार्याबद्दल DYSP तानाजी सावंत ...
19/08/2025

कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स को ऑप असोसिएशन लि कोल्हापूर यांच्या कडून सावली फौंडेशन च्या कार्याबद्दल DYSP तानाजी सावंत सर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सर्व सदस्यांचे आणि देणगीदारांचे मनापासून अभिनंदन आणि आभार.

सावली फौंडेशन कोल्हापूर

सावली फौंडेशन कोल्हापूर 10 व्या वर्धापनदिनाच्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा.आपली साथ व प्रेम असेच कायम राहो.सावली ...
15/08/2025

सावली फौंडेशन कोल्हापूर 10 व्या वर्धापनदिनाच्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा.

आपली साथ व प्रेम असेच कायम राहो.

सावली फौंडेशन कोल्हापूर

सावली फौंडेशन कोल्हापूरच्या शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रमाची दैनिक सकाळ वृत्तपत्राने घेतलेली दखल.
02/07/2025

सावली फौंडेशन कोल्हापूरच्या शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रमाची दैनिक सकाळ वृत्तपत्राने घेतलेली दखल.

02/07/2025

सावली फौंडेशन कोल्हापूरच्या शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रमाची S news चॅनेल ने घेतलेली दखल.
सर्व देणगीदार यांचे पुन्हा एकदा आभार 🙏❤️

सावली फौंडेशन कोल्हापूर

Address

ले. आउट नं 4, प्लॉट नं 73, बाबा जरग नगर, कोल्हापुर
Kolhapur
416012

Telephone

+918928184543

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सावली फौंडेशन कोल्हापुर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to सावली फौंडेशन कोल्हापुर:

Shortcuts

Share