26/01/2026
ज्यासाठी मनापासून प्रयत्न केले, तो संकल्प दरवर्षीप्रमाणे सुफळ संपन्न झाला!
प्रजासत्ताक दिनानिमित सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेले यंदाचे ६ वे रक्तदान महाशिबीर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. यंदा ३२८७ रक्तपिशव्यांचे संकलन झाले असून हे शक्य झाले ते रक्तदाते नागरिक बांधवांच्या उदात्त भावनेमुळे व सहभागामुळेच...
प्रत्येक रक्तदात्याने दिलेले योगदान म्हणजे कोणासाठी तरी नवे जीवन आहे, ही जाणीव मनाला समाधान देणारी आहे. यंदाच्या असेल किंवा या मागच्या महाशिबीराच्या यशामागे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, स्वयंसेवक व फाऊंडेशनच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे मोलाचे सहकार्य लाभले. दिवसभर न थकता त्यांनी केलेली सेवा निश्चितच प्रेरणादायी व ऊर्जादायी आहे. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.
गेल्या काही वर्षांपासून रक्तदान महाशिबीर हा समाजाप्रति असलेली आमची जबाबदारी बनली आहे. प्रत्येक वर्षी मिळणारा रक्तदात्या नागरिकांचा प्रतिसाद, विश्वास तसेच पाठिंबा पुढील वर्षासाठी अधिक जोमाने आयोजन करण्यासाठी ऊर्जा देतो. रक्ताची गरज व त्याचे महत्त्व लक्षात घेता हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्याचा आमचा निर्धार कायम आहे.
पुन्हा एकदा सर्व रक्तदाते, सहकारी, हितचिंतकांचे व शुभेच्छुकांचे मनापासून आभार...
रक्तदान महाशिबीर २०२७ मध्ये पुन्हा भेटूयात!