21/02/2026
हिंदुस्थानावर झालेले परकिय आक्रमण काही नवीन नव्हते,
ग्रिक, हुन,शक अशी बरेच आक्रमणे झाली आणि ही सर्व आक्रमणे भारताने पचविले सुद्धा.
परंतु इसवी सनाच्या ७१२ व्या वर्षी महम्मद बिन कासीम चे आक्रमण झाले आणि मुल्तान ते सिंध प्रांतात पहिली पारतंत्र्याची वाळवी लागली , कासीम ने इथल्या भुमी पुत्रांची शरणागती मागितली पण हिंदुस्थान चा लढाऊ बाणा झुकत नव्हता , नंतर घोरी ,खिल्जी, तुघलक,लोधी अशी अनेको आक्रमणाने या भुमीला रक्तरंजित केले ,इस.१५२६ ला दिल्ली जहिरुद्दीन बाबर ने आक्रमक केले आणि दिल्ली हस्तगत केली..
या नंतर मात्र राणा कुंभा, राणा सांगा सारख्या विरांच्या तलवारी लढत लढत धारातिर्थी पडल्या, अकबर च्या काळात भाल्याने स्वतंत्रतेचा भगवा रोवण्यासाठी लढलेल्या महाराणा प्रतापांच्या नंतर तर या भुमीने स्वतंत्रतेचे स्वप्न सुद्धा बघायला धास्ती घेतली असावी..
विजयनगर साम्राज्याच्या तलवारी हिंदुस्थानाची हिंदुपदपातशाही टिकवण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढत होती परंतु विजयनगरच्या रामराया च्या तुटलेल्या शिराने डोळे मिटले व काळरात्र झाली..
सारटी सोमनाथ चे शिवलिंग दिल्ली ला चिखल पुसायला नेण्यासाठी सुल्तानी फौज च्या फौज धावत होत्या, केशवरायची मुर्ती चे तुकडे , मंदिरांचे शिखर तुटले .. व्यापाराला आलेल्या पोर्तुगीजांनी धर्मांध अत्याचार च्या सिमा तोडल्या..
अत्याचाराने ग्रस्त या भारत मातेने क्षात्रभवानी पुढे हात पसरले भोसलेकुलदिपक
शहाजी राजांंनी तलवार म्यान बाहेर काढली..
दख्खनेत मराठ्यांनी झालेल्या काळरात्रीला जणू अंतिम चेतावणी दिली आणि जगदंब कृपेने या भुमीला स्वतंत्रतेचे गोंडस स्वप्न पडले...
स्वतंत्रेचे अधिष्ठान मांडले गेले आणि भगवा फडकला..
शिवनेरी दुमदुमली , जिजाऊंच्या हातात खळखळून हसणारं बाळ अवघ्या सुल्तानी आणि हैवानी रियासती रडवण्यासाठी सज्ज झाला...
हिंदुस्थानाने स्वतंत्रेचा पोवाडा रचला आणि त्याचं पहिलं शब्द लिहीलं गेलं...
" शिवबा....!!"
संजय दिवटे पाटिल