25/12/2024
आज दि.२५/१२/२०२४ रोजी जन स्वराज्य सेवा फाउंडेशन संस्था आणि योगेश वनघरे फाऊंडेशन संस्था आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम साजरा करण्यात आला.हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम कसारा येथून १३ किलोमिटर लांब आंब्याची वाडी, जिल्हा परिषद शाळा माळ,कसारा येथे करण्यात आला,यावेळी शाळेतील ३६ विद्यार्थांना, स्कूल बॅग,आणि स्वेटर वाटप करण्यात आले ,यावेळी मान्यवर,श्री प्रकाश सोनवणे,श्री योगेश वनघर , सौ पूनम खान,सौ.स्मिता शिंदे,सौ.हेमांगी गावडे ,श्री पंकज सहारे,श्री शशांक खैरे,श्री कपिल निकम, श्री सतिश सोनवणे,श्री प्रभाकर कुमावत सर आदी उपस्थित होते,तसेच याच प्रकारे जन स्वराज्य सेवा फाउंडेशन सामाजिक ,शैक्षणिक , कार्यात समाजसेवा करत राहील.