27/11/2025
शेतकऱ्यांना मिळाला सन्मान! ऊरूण ईश्वरपूर येथील सर्व शेतकरी बांधवांना शासनाच्या सर्व पात्र शासकीय योजनांचा लाभ आता निश्चित मिळणार आहे. अन्नदाता शेतकरी बांधवांचा सन्मान हाच देशाचा खरा सन्मान!
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब व राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकरीहितासाठी आखलेल्या सर्व पात्र योजना आम्ही ऊरूण ईश्वरपूर परिसरात प्रभावीपणे राबवणार आहोत.
शेतकरी वर्गाला आमची ठाम हमी — आपला हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. आपल्या प्रत्येक अडचणीत आम्ही तुमच्या सोबत उभे आहोत! महायुतीचे उरूण ईश्वरपूर नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार मा. विश्वनाथ (बापू) डांगे यांच्या नेतृत्वामुळे सकारात्मक परिवर्तन साध्य होऊ शकते.
नाव बदललं… आता नवी ओळख निर्माण करूया,
उरूण ईश्वरपूर घडवूया!"
#शेतकरी