Shankarrao Patil Charitable Trust

Shankarrao Patil Charitable Trust Carry out various programs, implementing numerous projects for students, youths, farmers and women.

जावेद हबीब अकॅडमीच्या वतीने दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई येथे जावेद हबीब सर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष हेअर सेमिना...
02/09/2026

जावेद हबीब अकॅडमीच्या वतीने दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई येथे जावेद हबीब सर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष हेअर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारसाठी आपल्या अकॅडमीमधून एकूण २६ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या सेमिनारमध्ये जावेद हबीब सर यांनी विद्यार्थ्यांना हेअर कटिंग, ब्लो ड्राय, हेअर कलर आणि हायलाइट्स यामधील आधुनिक व प्रगत तंत्रांची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. बदलत्या फॅशन ट्रेंडनुसार ग्राहकांच्या केसांचा प्रकार, चेहऱ्याची ठेवण आणि व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन योग्य हेअर कट निवडण्याची पद्धत तसेच कटिंगमध्ये अचूकता आणि फिनिशिंग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच ब्लो ड्राय करताना केसांना योग्य व्हॉल्युम, टेक्स्चर आणि फिनिश कसे द्यावे, हे प्रात्यक्षिकातून समजावून सांगण्यात आले. हेअर कलर व हायलाइट्समध्ये आधुनिक कलर टेक्निक्स, योग्य शेडची निवड, कलर प्लेसमेंट आणि आकर्षक फिनिशिंग याबाबतही विद्यार्थ्यांना नवीन माहिती मिळाली.

या सेमिनारचा विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रात्यक्षिक कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि आधुनिक हेअर इंडस्ट्रीतील नवीन तंत्रज्ञान व ट्रेंड समजून घेण्यासाठी मोठा फायदा झाला. प्रत्यक्ष तज्ज्ञाकडून प्रशिक्षण मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास तसेच भविष्यात ग्राहकांच्या गरजेनुसार व्यावसायिक सेवा देण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित होण्यास मदत झाली.

विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने या उपक्रमात सहभाग घेण्यात आला.

एकूणच, हा सेमिनार विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, कौशल्यविकासासाठी उपयुक्त आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला.

दर शनिवारी, वेळ: सायंकाळी 5 ते 6 वा.📍अल्फा बाईट कॉम्प्युटर्स, इंदापूर नगरपालिकाच्या मागे, 40 फुटी रोड, इंदापूर.
29/08/2026

दर शनिवारी, वेळ: सायंकाळी 5 ते 6 वा.

📍अल्फा बाईट कॉम्प्युटर्स, इंदापूर
नगरपालिकाच्या मागे, 40 फुटी रोड, इंदापूर.

👗 Diploma in Fashion Designing🎓 कौशल्यपूर्ण प्रशिक्षण | प्रॅक्टिकल लर्निंग | क्रिएटिव्ह करिअर.फॅशन डिझाईनिंगच्या क्षेत्र...
29/08/2026

👗 Diploma in Fashion Designing

🎓 कौशल्यपूर्ण प्रशिक्षण | प्रॅक्टिकल लर्निंग | क्रिएटिव्ह करिअर.

फॅशन डिझाईनिंगच्या क्षेत्रात तुमचं करिअर घडवण्याची सुवर्णसंधी! 🌟

🧵 डिझाईनिंगपासून गारमेंट मेकिंगपर्यंत
🎨 क्रिएटिव्हिटीपासून प्रोफेशनल स्किल्सपर्यंत
💼 स्वतःचा व्यवसाय किंवा उत्तम करिअर घडवण्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण!

📢 Admissions Open!

आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या फॅशन करिअरची सुरुवात करा! 💫

26/08/2026

✨ ‘त्वचेचे संरक्षण आणि सौंदर्याला चालना’ ✨

काल संस्थेमध्ये आयोजित मोफत त्वचा व सौंदर्य कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद! 🌸

डॉ. अवधूत खबाले यांनी त्वचेची योग्य काळजी, पिंपल्स व सौंदर्यविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

📹 कार्यशाळेची खास झलक पाहा! ✨

इंदापूर येथे 'त्वचेचे संरक्षण आणि सौंदर्याला चालना' मोफत कार्यशाळा उत्साहात संपन्न; डॉ. अवधूत खबाले यांनी दिले मोलाचे मा...
26/08/2026

इंदापूर येथे 'त्वचेचे संरक्षण आणि सौंदर्याला चालना' मोफत कार्यशाळा उत्साहात संपन्न; डॉ. अवधूत खबाले यांनी दिले मोलाचे मार्गदर्शन

इंदापूर येथील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री सिद्धीदाता त्वचा व सौंदर्य क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'त्वचेचे संरक्षण आणि सौंदर्याला चालना' या विशेष मोफत कार्यशाळेचे आयोजन मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यशाळेला इंदापूर परिसरातील नागरिक, तरुण-तरुणी आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उदंड प्रतिसाद दिला.

सदर कार्यक्रमाचे आयोजन शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार श्री. तुषार रंजनकर व विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ट्रस्टचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर यांनी प्रास्ताविक केले.

आपल्या प्रास्ताविक भाषणात श्री. अरविंद गारटकर यांनी ट्रस्टतर्फे सामाजिक व आरोग्य क्षेत्रात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. बदलती जीवनशैली, वेगाने बदलणारे हवामान आणि वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेच्या विविध समस्या निर्माण होत असून अशा काळात त्वचेची योग्य ती काळजी घेणे कसे अत्यंत गरजेचे बनले आहे, यावर त्यांनी आपल्या भाषणात विशेष भर दिला.

कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले नामवंत त्वचा, केस व सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अवधूत विठ्ठल खबाले (एम.डी. मेडिसिन, डर्मेटोलॉजी, कॉस्मेटोलॉजी व ट्रायकोलॉजी पदविका) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. निरोगी व सुंदर त्वचेसाठी दैनंदिन जीवनात स्वच्छता, ओलावा टिकवणे, उन्हापासून संरक्षण आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण या चार सुवर्णनियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सोप्या भाषेत पटवून दिले.

तसेच चेहऱ्यावरील अ‍ॅक्ने अर्थात पिंपल्सच्या समस्येवर बोलताना डॉ. खबाले यांनी सांगितले की, अतिरिक्त तेलनिर्मिती, बॅक्टेरियाचा संसर्ग, बंद छिद्रे, संप्रेरकांमधील बदल, ताणतणाव, अपुरी झोप आणि चुकीच्या कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सचा वापर यांमुळे पिंपल्स होतात. पिंपल्स फोडल्यास त्वचेवर कायमचे डाग पडू शकतात, त्यामुळे स्वतःहून कोणतेही प्रयोग न करता तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य उपचार घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर सर, सौ. अश्विनी गारटकर, संस्थेचे इन्चार्ज दिपक जगताप, कर्मचारी सागर कांबळे, अमोल राऊत, केदार गोसावी व स्वाती कोल्हे उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या मनातील त्वचा व सौंदर्याविषयक विविध शंकांचे निरसन करून घेतले आणि शेवटी आभार प्रदर्शनाने या यशस्वी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शनिवार,दि. 22 ऑगस्ट रोजी ओजस बालसंस्कार वर्ग घेण्यात आला. या वर्गामध्ये १२ विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी,विद्यार्थ्यां...
24/08/2026

शनिवार,दि. 22 ऑगस्ट रोजी ओजस बालसंस्कार वर्ग घेण्यात आला. या वर्गामध्ये १२ विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी,विद्यार्थ्यांना लघुपटाच्या माध्यमातून संस्कारमूल्ये व जीवनोपयोगी संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी लघुपट उत्स्फूर्तपणे पाहून त्यातून मिळालेल्या संदेशावर चर्चा केली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मनोरंजनासोबतच त्यांच्यामध्ये चांगले संस्कार, विचार करण्याची क्षमता आणि सामाजिक जाणीव निर्माण होण्यास मदत झाली.

24/08/2026
उन्मेष कौशल्य महोत्सव २०२६ अंतर्गत दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी नथ मेकिंग कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये १०...
22/08/2026

उन्मेष कौशल्य महोत्सव २०२६ अंतर्गत दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी नथ मेकिंग कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेमध्ये १० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यशाळेचे प्रशिक्षण फॅशन विभाग प्रमुख सौ. वैष्णवी झगडे मॅडम यांनी दिले. यावेळी विद्यार्थ्यांना तीन वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक नथी प्रत्यक्ष बनवून शिकवण्यात आल्या.

विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नथ बनवण्याचे कौशल्य आत्मसात केले. 💐✨

उन्मेष कौशल्य महोत्सव २०२६ मध्ये दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी बेसिक ज्वेलरी मेकिंग कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत विद्यार्थ...
22/08/2026

उन्मेष कौशल्य महोत्सव २०२६ मध्ये दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी बेसिक ज्वेलरी मेकिंग कार्यशाळा पार पडली.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कल्पकता, कौशल्य आणि कलात्मकतेचा सुंदर मिलाफ साधला.

कार्यशाळेदरम्यान, विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या आकर्षक ज्वेलरी तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. स्वतःच्या हाताने ज्वेलरी तयार करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी विशेष उत्साहवर्धक ठरला.
संस्थेच्या अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व कौशल्यांना व्यासपीठ मिळत आहे.

काल संस्थेच्या फॅशन विभागामध्ये माजी प्रशिक्षिका सौ.त्रिशला पाटील मॅडम यांच्या जागी नवीन प्रशिक्षक म्हणून रुजू झालेल्या ...
11/08/2026

काल संस्थेच्या फॅशन विभागामध्ये माजी प्रशिक्षिका सौ.त्रिशला पाटील मॅडम यांच्या जागी नवीन प्रशिक्षक म्हणून रुजू झालेल्या वैष्णवी झगडे मॅडम यांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

हे स्वागत संस्थेच्या रिसेप्शन विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सौ.स्वाती कोल्हे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. स्वाती मॅडम यांना संस्थेत रुजू होऊन दोन महिने पूर्ण झाले असून, या अल्प कालावधीत त्यांनी आपल्या कामातून उत्कृष्ट कामगिरी, जबाबदारीची जाणीव आणि कामाप्रती असलेली सकारात्मक वृत्ती दाखवून दिली आहे.

स्वाती मॅडम यांची कामाप्रती असलेली जबाबदारी, प्रामाणिकपणा, शिस्त आणि सकारात्मक कार्यशैली यांचा आदर्श नवीन प्रशिक्षक सौ. वैष्णवी झगडे मॅडम यांनाही मिळावा आणि त्यातून त्यांनी आपल्या नवीन जबाबदारीत प्रेरणा घेऊन उत्तम कामगिरी करावी, या उद्देशाने त्यांच्या हस्ते वैष्णवी मॅडम यांचे स्वागत करण्यात आले.

तसेच, एका विभागातील चांगली कार्यसंस्कृती आणि उत्तम कामगिरीची प्रेरणा इतर विभागांमध्येही पोहोचावी, यामुळे संस्थेच्या एकूण कार्यक्षमतेत आणि प्रगतीत सकारात्मक वाढ होईल, हा यामागील उद्देश आहे. फॅशन डिझायनिंग विभागाच्या ॲडमिशन, विद्यार्थिनींना मार्गदर्शन आणि दैनंदिन कामकाजातही हीच सकारात्मक कार्यपद्धती दिसून यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सौ. वैष्णवी झगडे मॅडम यांना त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थिनींना उत्तम प्रशिक्षण मिळून फॅशन विभागाची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि प्रगती अधिक उंचावो, हीच सदिच्छा. 🌷

Address

Indapur

Opening Hours

Monday 9am - 6:30pm
Tuesday 9am - 6:30pm
Wednesday 9am - 6:30pm
Thursday 9am - 6:30pm
Friday 9am - 6:30pm
Saturday 9am - 6:30pm

Telephone

+917058333033

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shankarrao Patil Charitable Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shankarrao Patil Charitable Trust:

Shortcuts

Share