17/02/2025
दिमाखात व थाटात संपन्न झाला #परिवर्तन_गुणवंत_गौरव_सोहळा.!
************
*36 पैकी 34 विद्यार्थ्यांची पालक व मार्गदर्शकांसह उपस्थिती*
*****************
*निरपेक्ष व #वारकरी_सात्विक_भावाने_पार_पडलेला_हा_सोहळा_कौतुकास्पद असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी एस.एम.कुकडे यांचे मनोगत*
******************
परिवर्तन सामाजिक विकास संस्थेने 10 फेब्रुवारी रोजी कागल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध सराव परीक्षा घेतली होती.या परीक्षेला एकूण 4300 विद्यार्थी बसले होते.फक्त परीक्षा घेऊन संस्था थांबली नाही तर यामधील चौथी मधील टॉप 23 व सातवीमधील टॉप 13 विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह मार्गदर्शक शिक्षक शिक्षकांचा पण समारंभ पूर्वक गौरव सोहळा संस्थेने काल रविवार दि.16 रोजी सायंकाळी कौलगे येथे संस्था कार्यालयाच्या प्रांगणात घेतला होता.
या सोहळ्यास गुणवंत विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक आवर्जून उपस्थित होते.तालुका शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण विस्तार अधिकारी एस.एम.कुकडे तसेच काही केंद्रप्रमुख,पेपरसेटर शिक्षक उपस्थित होते.
सायंकाळी 7 ते 9 या वेळेत हा समारंभ पार पडला.कोणतीही घाई गडबड,गोंधळ,आवरा आवर न करता अगदी शिस्तबद्धपणे हे जवळपास 50 सत्कार झाले.यासाठी परिवर्तन टीमने व्यवस्थित नियोजन केले होते.याबरोबर चौथी मधील टॉप 202 व सातवीमधील टॉप 104 विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देखील ज्या त्या केंद्रामार्फत पोहोच केली जाणार आहेत. मुख्य परीक्षेची चाळणी येत्या 23 फेब्रुवारी रोजी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना व मार्गदर्शकाना अजून प्रेरणा मिळावी म्हणून जाणीवपूर्वक संस्थेने हा कार्यक्रम चाळणी अगोदर घेतला आहे.
यावेळी बोलताना शिक्षण विस्तार अधिकारी कुकडे साहेब यांनी कागल तालुक्यातील गुणवत्तेच्या प्रवासात परिवर्तनने जे योगदान सुरू केले आहे ते निश्चितच खूप प्रेरणादायी आहे असे मनोगत व्यक्त करून आमच्या प्रयत्नांना वारकरी परंपरेचे मिळणारे बळ कौतुकास्पद असल्याचे सांगितले.तसेच परिवर्तन चे मुख्य प्रवर्तक आदरणीय सचिनदादा पवार यांनी यापुढे देखील अगदी निरपेक्ष भावनेने परिवर्तन शिक्षण विभागासोबत राहील व आमच्या परीने जे शक्य आहे ते सहकार्य करण्याचा शब्द देत,ज्ञान हेच मानवी जीवनाच्या उत्कर्षाचे मुख्य माध्यम असल्याचे देखील सांगितले...
एकूणच हा सोहळा दिमाखदारपणे पार पडला.पसायदान व स्नेहभोजनाने सांगता झाली.
-मधुकर भोसले