Snehchhaya Prakalp

Snehchhaya Prakalp SNEHCHHAYA is Residential Project for Education and Rehabilitation of very poor, orphan, tribal, widow, migrant affected people, Sucided famer family Children.

स्नेहछाया परिवाराचे  इत्यंभूत सेवा कार्या बद्दल सविस्तर वृत्त प्रकाशित केल्याबद्दल साप्ताहिक महा लोकप्रियताचे संपादक आदर...
31/03/2026

स्नेहछाया परिवाराचे इत्यंभूत सेवा कार्या बद्दल सविस्तर वृत्त प्रकाशित केल्याबद्दल साप्ताहिक महा लोकप्रियताचे संपादक आदरणीय श्री संतोष गोतावळे व सहसंपादक श्री दत्तात्रय मुजमुले सर आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏

आजचा दिवस स्नेह, माया आणि आनंदाने भरलेला ❤️आदरणीय श्री. नितिन घोलप (मोशी, पुणे) यांनी सुकन्या कु. राजवी यांच्या वाढदिवसा...
25/03/2026

आजचा दिवस स्नेह, माया आणि आनंदाने भरलेला ❤️
आदरणीय श्री. नितिन घोलप (मोशी, पुणे) यांनी सुकन्या कु. राजवी यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहछाया परिवारातील बालगोपाळांसोबत आनंदाचे क्षण वाटले ✨
चार घास आपुलकीचे, मायेची ऊब आणि अन्नदानातून दिलेला आनंद — लेकरांच्या चेहऱ्यावर उमटलेला हसू म्हणजेच खरा वाढदिवसाचा उत्सव 🎉
आपल्या या सुंदर उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार सर 🙏
घोलप परिवाराचेही मनापासून धन्यवाद 💐
🎂 राजवी ला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
तिच्या आयुष्यात आनंद, यश आणि उज्ज्वल भवितव्य लाभो हीच सदिच्छा 🌸

अपेक्स इंटरनॅशनल स्कूलतर्फे प्रा. दत्तात्रय इंगळे व सौ. सारिका इंगळे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदानपुणे (चऱ्होली), दि. 2...
27/12/2025

अपेक्स इंटरनॅशनल स्कूलतर्फे प्रा. दत्तात्रय इंगळे व सौ. सारिका इंगळे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान
पुणे (चऱ्होली), दि. 26 डिसेंबर :
इन्स्पायर फाउंडेशन संचलित अपेक्स इंटरनॅशनल स्कूल, चऱ्होली (पुणे) यांच्या वतीने स्व. तुकाराम लक्ष्मणराव काळजे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार 2025–26 प्रा. दत्तात्रय संदीपानराव इंगळे व सौ. सारिका दत्तात्रय इंगळे ( माई) यांना प्रदान करण्यात आला.
स्नेहछाया परिवार च्या माध्यमातून वंचित, उपेक्षित, अनाथ व दुर्लक्षित बालकांच्या शिक्षण, संगोपन व पुनर्वसनासाठी केल्या जाणाऱ्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार बहाल करण्यात आला.
या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, शाल-श्रीफळ, विठ्ठल–रुक्माई यांची मूर्ती व अकरा हजार रुपये रोख असे होते. हा सन्मान सोहळा अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी येथे
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच अपेक्स इंटरनॅशनल स्कूलचे अध्यविद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या साक्षीने उत्साहात पार पडला.
पुरस्कार स्वीकारताना प्रा. दत्तात्रय इंगळे यांनी हा सन्मान आज 26 डिसेंबर रोजी सामाजिक कार्याचे आदर्श बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी अर्पण करत स्नेहछाया परिवारातील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. पुरस्काराबद्दल प्रा. दत्तात्रय इंगळे यांनी अध्यक्ष श्री संतोष काळजे सर, सचिव श्री राहुल टोणगे सर , श्री दत्तात्रय वाळके सर , श्री.गणेश ठोकळ सर मान्यवर व शाळा व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार मानले तसेच अपेक्स इंटरनॅशनल स्कूलच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

07/12/2025

स्नेहछाया परिवार द्वारा
" मायेची ऊब उपक्रम 2025"
थंडीत कुडकुडणार्या ऊसतोड मजुरांच्या
लेकरांना लहान जीवांसाठी ब्लॅंकेट वाटप
करण्यात आले...

01/11/2025
स्नेहछाया परिवाराच्या वतीने आज डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन .... आज विद्यार्थी दि...
15/10/2025

स्नेहछाया परिवाराच्या वतीने
आज डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या
जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन ....

आज विद्यार्थी दिन विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा ....

" वाचन प्रेरणा दिन"
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने .... शुभेच्छा
सर्वांनी अवांतर पुस्तके ग्रंथ वाचावेत...
जास्तीत जास्त वाचन करून वाचन संस्कृतीचेजतन करावे "वाचाल तर वाचाल!"......

31/07/2025

धन्यवाद व वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा ताईसाहेब.....
धन्यवाद जगदंब ग्रुप, दिघी, पुणे

पत्रकार आदरणीय सौ.रश्मीताई अरुण मुंगळे यांनी स्नेहछाया परिवारास सहकुटुंब सदिच्छा भेट दिली, प्रकल्प कार्याचा आढावा घेतला,...
06/07/2025

पत्रकार आदरणीय सौ.रश्मीताई अरुण मुंगळे
यांनी स्नेहछाया परिवारास सहकुटुंब सदिच्छा
भेट दिली, प्रकल्प कार्याचा आढावा घेतला,
कौतुक केले मुक्तसंवाद साधला व कर्तव्यनिधी
दिला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏

Address

Dighi

Telephone

+18605009860

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Snehchhaya Prakalp posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share