Shri Sanskar Matimand Mulinche Balgruh V Karyashala

  • Home
  • India
  • Dhule
  • Shri Sanskar Matimand Mulinche Balgruh V Karyashala

Shri Sanskar Matimand Mulinche Balgruh V Karyashala

२००९ साली अनाथ,निराधार मुला-मुलींना आसरा कसा देता येईल हा विचार मनात आल्याने कुटुंब प्रमुखांशी चर्चा करून तसेच शहरातील विविध मान्यवर व्यक्तींशी चर्चा घडवून धुळे शहरातील देवपूर भागात श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह प्रत्यक्षात साकार करण्यास सुरुवात झाली. कालांतराने संस्थेच्या माध्यमातून बालाजी नगर,साक्री रोड येथे नवीन इमारत उभी करण्यात आली त्या ठिकाणी ज्यांना कसलाही आधार नाही,आई-वडील नाही,समाजात

ील रूढी-परंपरा यातील फरक माहित नाही. अश्या अनाथ मतिमंद मुलींचे पालन पोषण करून त्यांचे कायमस्वरूपी पालकत्व स्विकारून आजमितीस १२५ अनाथ मुलींचा सांभाळ केला जात आहे.तसेच धुळे शहरातील १०० विधवा स्रियांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून सरकारी अनुदान प्राप्त करून देण्यात आले. याच माध्यमातून महिला मेळावा,व्यावसायिक शिबिर इतर सामाजिक उपक्रम घडवून आजगायत सौ.मंगला सुनिल वाघ यांचे कार्य चालू आहे.अगोदरच्या ४ वर्षात यमुनाई संस्थेला अस्तित्त्वासाठी संघर्ष करावा लागला कारण सर्व सेवाकार्य त्यांच्या स्वःताच्या स्रोतांवर चालले होते. राज्य सरकारने प्रशंसनीय कामकाज लक्षात घेऊन यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ संचालित श्री संस्कार मतिमंद मुलींच्या बालगृहाला अनुदान प्राप्त करून दिले त्याचबरोबर शहरातील विविध सेवाभावी संस्थेची मदत घेऊन बालगृहाचा विस्तार वाढवण्यास सुरुवात करण्यात आली.

ही गुढी फक्त परंपरा नाही, ही आमच्या मुलींच्या आत्मविश्वासाची उंच पताका आहे.श्री संस्कार मतिमंद मुलींची कार्यशाळा, धुळेसं...
05/03/2026

ही गुढी फक्त परंपरा नाही, ही आमच्या मुलींच्या आत्मविश्वासाची उंच पताका आहे.
श्री संस्कार मतिमंद मुलींची कार्यशाळा, धुळे
संपर्क : हिरल वाघ मो. +919168754031

05/12/2025

♿️दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त या वर्षाची थीम सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग सर्व समावेशक समाज घडविणे’ या अनुषंगाने दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी अंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळाधुळे येथे मा. प्रविण कुलकर्णी, सचिव (न्यायाधीश) जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, धुळे. यांच्या अध्येक्षतेखाली (दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील तरतुदी व हक्कांविषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन मा. प्रविण कुलकर्णी, सचिव (न्यायाधीश) जिल्हाविधी सेवा प्राधीकरण, धुळे. यांचे शुभहस्ते हेलन केलर व लुईस ब्रेल यांच्याप्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिव्यांग सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनांप्रसंगी मा. ॲङ ज्ञानेश्वर महाजन, मुख्य लोक अभिरक्षक, जिल्हा विधीसेवा प्राधीकरण, धुळे श्री. नितीन खंडेराय जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे. श्री. संजय सैंदाणे सहायक आयुक्त, समाज कल्याणविभाग, धुळे. ॲङ कविताताई पवार, सदस्या, राज्य दिव्यांग कल्याण समिती, महाराष्ट्र शासन, श्री. शशिकांत सुर्यवंशी, जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना, धुळे. श्री. सुरेश बोरसे, अध्यक्ष, दिव्यांग विकास संस्था, धुळे. श्री. सुनिल वाघ, मार्गदर्शक, यमुनाई संस्था, धुळे. श्री. मालसिंग पावरा, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, दिव्यांग कल्याण विभाग, जि.प.धुळे. मा. श्री. मुकंद भट, कार्यालयीन अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, धुळे. तसेच दिव्यांग शाळेतील विद्यार्थी/ विद्यार्थीनी व दिव्यांगांच्या विशेष शाळेतील मुख्याध्यापक विशेष शिक्षक/ शिक्षकेत्तरकर्मचारी परिसरातील दिव्यांग व्यक्ती सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी अंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त कार्यक्रमाचेमुख्य आकर्षक अंध शाळा धुळे, यांनी या प्रसंगी सादर केलेले स्वागतगीत व इश्तवन तसेच देश भक्तीपर गीत, याशिवाय श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह धुळे येथील प्रवेशित विद्यार्थीनींनी नाटिका सादर केली होती. यास उपस्थितांचासकारात्मक प्रतिसाद मिळाला व प्रमुख पाहुण्या मार्फत रोखीचे बक्षीस देण्यात आले व शब्दशुमनाने स्तुती केली.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्रीमती. दिपाली खराटे विशेष शिक्षीका, तरआभार प्रदर्शन श्रीमती. पुनम सुर्यवंशी वरीष्ठ मुख्याध्यापीका, श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह धुळे यांनी केले.

दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासनजिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद, धुळेव श्री संस्कार मतिमंद मुलींचे ब...
02/12/2025

दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद, धुळे
व श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने

३ डिसेंबर – आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन
तसेच ३ डिसेंबर २०२५ ते ९ डिसेंबर २०२५ – दिव्यांग सप्ताह
या निमित्ताने आयोजित विशेष मार्गदर्शन कार्यक्रमासाठी
आपणास सादर निमंत्रण.

‘सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग सर्वसमावेशक समाज घडविणे’ तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील तरतुदी व हक्क या विषयावर

मा. प्रविण एन. कुलकर्णी (न्यायाधीश),
सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धुळे
यांचे विद्यार्थी व दिव्यांग बांधवांना बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे.

📅 दिनांक: ०३ डिसेंबर २०२५
⏰ वेळ: दुपारी १.०० वाजता
📍 स्थळ: श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह, बालाजी नगर, साक्री रोड, धुळे

कार्यक्रमास आपण उपस्थित राहून दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठीच्या या उपक्रमास सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

🔺यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ संचलित श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा येथे आज "जागतिक मानसिक आर...
10/10/2025

🔺यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ संचलित श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा येथे आज "जागतिक मानसिक आरोग्य दिन" साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी डॉ. हेलन ॲडम्स केलर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मा.श्री.निखिल वाघ सर यांनी केले. व श्रीमती सुनिता आढावे मॅडम आणि श्रीमती मनीषा गुरव मॅडम यांनी आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व विद्यार्थिनीना समजावून सांगितले. यावेळी शाळेच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका श्रीमती पुनम सूर्यवंशी मॅडम, कार्यशाळा अधीक्षिका श्रीमती हिरल वाघ मॅडम, बालगृह प्रभारी अधीक्षिका श्रीमती ज्योती सोनवणे मॅडम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व बालगृहातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

👭संस्थेत शारदीय नवरात्रोत्सव 🚩
29/09/2025

👭संस्थेत शारदीय नवरात्रोत्सव 🚩

🔺यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ संचलित, श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा, धुळे आयोजित दिव्यांग क्...
29/09/2025

🔺यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ संचलित, श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा, धुळे आयोजित दिव्यांग क्षेत्रातील विशेष शिक्षकांचे "बौद्धिक दिव्यांगत्च असलेल्या व्यक्तींसाठी जागरूकता आणि समर्थन वाढविण्यासाठी शिक्षण आणि जनजागृती." याविषयाचे तीन दिवशीय C.R.E. प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले. यावेळी प्रशिक्षण कार्यक्रमास
🔺मा.श्री. मालसिंग पावरा साहेब (जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी,धुळे)
🔺मा.श्री. सूनीलजी वाघ साहेब (यमुनाई संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक)
🔺श्रीमती. पूनम सूर्यवंशी (वरिष्ठ मुख्याध्यापिका, श्री संस्कार बालगृह)
🔺श्रीमती. हिरल वाघ (कार्यशाळा अधिक्षिका, श्री संस्कार कार्यशाळा) यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.

कार्यक्रम यशस्वी संपन्न करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

👭संस्थेत शारदीय नवरात्रोत्सव निमित्त दुर्गा देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. नवरात्रोत्सवात गरबा आणि वेगवेगळे कार्यक्रम ...
26/09/2025

👭संस्थेत शारदीय नवरात्रोत्सव निमित्त दुर्गा देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. नवरात्रोत्सवात गरबा आणि वेगवेगळे कार्यक्रम घेऊन प्रवेशित मुलींमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा आणि त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा एक प्रयत्न.🚩

 #श्रीगणेशोत्सव २०२५ #धुळे शहर गणेश मंडळ.. #भेट
03/09/2025

#श्रीगणेशोत्सव २०२५
#धुळे शहर गणेश मंडळ..
#भेट

🚩 भाग्योदय,🚩आज परम पूज्य. आनंद जीवनजी स्वामी, पूज्य. पुरुषोत्तम स्वामी, स्वामीनारायण मंदिर, धुळे. यांचे श्री संस्कार अना...
18/08/2025

🚩 भाग्योदय,
🚩आज परम पूज्य. आनंद जीवनजी स्वामी, पूज्य. पुरुषोत्तम स्वामी, स्वामीनारायण मंदिर, धुळे. यांचे श्री संस्कार अनाथ मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा आणि श्री यमुनेश्र्वर महादेव मंदिरास भेट.
मुलींच्या आरोग्य आणि शैक्षणिक प्रगतीसाठी आशिर्वाद मिळाले.

🚩संत ज्ञानेश्वर माऊलींचा 750 वा जन्मोत्सव व सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त पूज्य. सुदर्शन महाराज गायकवाड, संत ज्ञान...
18/08/2025

🚩संत ज्ञानेश्वर माऊलींचा 750 वा जन्मोत्सव व सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त पूज्य. सुदर्शन महाराज गायकवाड, संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी पाठशाळा, गोंदुर यांचे संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

Address

Dhule

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Sanskar Matimand Mulinche Balgruh V Karyashala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shri Sanskar Matimand Mulinche Balgruh V Karyashala:

Share