Saath Foundation साथ फाउंडेशन

  • Home
  • Saath Foundation साथ फाउंडेशन

Saath Foundation साथ फाउंडेशन रोडवरील बेघर, निराधार तसेच भीक मागणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करणारी संस्था साथ फाऊंडेशन.
☎️ 7249090906

निसर्गाच्या सानिध्यात चुलीवरचा स्वयंपाक...!📌खरं तर इराख, इराण आणि त्यात अमेरिका यांचे युद्ध सुरु असल्याने भारत देशात येण...
22/04/2026

निसर्गाच्या सानिध्यात चुलीवरचा स्वयंपाक...!
📌खरं तर इराख, इराण आणि त्यात अमेरिका यांचे युद्ध सुरु असल्याने भारत देशात येणाऱ्या कच्च्या तेलाचा मार्ग रखडला आणि त्यामुळे गॅस सिलेंडर वर बरेच निर्बंध आलेत.
साथ फाऊंडेशन द्वारा संचालित स्व.भैय्याजी गुर्जर पुनर्जन्म आश्रम मध्ये दिवसाला साधारण दोन्ही वेळेला 60-60 लोकांचा स्वयंपाक बनतो. आणि त्यामुळे साधारण 5-6 सिलेंडर महिन्याला लागतात.
सद्या स्थितीत सिलेंडर टंचाई चा फटका आश्रम ला सुद्धा बसलेला आहे. आणि नाईलाजाने आजी आजोबांना वेळेवर जेवण मिळावे म्हणून पुन्हा चुलीवर यावे लागले.

11/04/2026

📌 अखेर गीतादेवी बिहार येथील स्वगृही पोहचली.
📌 7 मुलांना जन्म ; 5 मुले मरण पावले.
सविस्तर : 2 वर्षांअदोगर बेघर अवस्थेत कोंढाळी पोलीस स्टेशन हद्दीत सापडलेल्या 35 वर्षीय गिता महतो हिला तत्कालीन ठाणेदार पंकज दादा वाघोडे, पोलीस स्टेशन कोंढाळी मार्फत साथ फाऊंडेशन द्वारा संचालित स्व.भैय्याजी गुर्जर पुनर्जन्म आश्रम बुटीबोरी येथे दाखल केले होते. बिहार येथील बिना गावातील रहीवासी असलेल्या गीताबाई ला आज तिच्या परिवाराच्या स्वाधीन केले.
गीतादेवी गणेश महत, वय 35 वर्ष, रा. बिना, बिहार
सदर महिलेचे लग्न झालेले असुन तिला 7 मुलं झाले ज्यामधून 5 मुले मृत पावले. आणि त्यामुळे चांगल्या अवस्थेत असलेली गीतादेवी हळूहळू मानसिक झाली. पतीचे दुसऱ्या महिलेशी लग्नबाह्य संबंध असल्याने ती अधिक मानसिक झाली आणि त्याच अवस्थेत ती घरा बाहेर पडली. बिहार मधून पायदळ पायदळ महाराष्ट्र मध्ये आणि त्यातच नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी हद्दीत आल्यानंतर पोलीस स्टेशन मार्फत 7 फेब्रुवारी 2024 रोजी साथ फाऊंडेशन द्वारा संचालित स्व.भैय्याजी गुर्जर पुनर्जन्म आश्रम बुटीबोरी येथे दाखल करण्यात आले.
आश्रम प्रशासनाने सुद्धा गीतादेवी ला परिवाराच्या स्वाधीन करण्यासाठी काटेकोर प्रयत्न केले. आणि त्या प्रयत्नांना यश सुद्धा आले. आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी गीतादेवी स्वगृही पोहचली. तेव्हा परिवारातील लोकांनी गीताला बघून अश्रूचा टाहो फोडला.
खरंच आज मनाला आनंद वाटतो आहे. आश्रम चे नाव जे पुनर्जन्म आहे ते सार्थक झाल्या सारख वाटतं.
या कामात साथ फाऊंडेशन ला जे हितचिंतक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रित्या सहकार्य करतात त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे सर्व समाजकार्य शक्य होतं आहे.

📌  आश्रमाच्या जागेचे दान देऊन असंख्य निराधारांना आश्रय देणारे, मोठ्या मनाचे, दयाळू व्यक्तिमत्त्व श्री. अविनाश भाऊ गुर्जर...
28/03/2026

📌 आश्रमाच्या जागेचे दान देऊन असंख्य निराधारांना आश्रय देणारे, मोठ्या मनाचे, दयाळू व्यक्तिमत्त्व श्री. अविनाश भाऊ गुर्जर यांची आज दुपारी 1:55 वाजता प्राणज्योत मावळली…
हा केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नाही, तर समाजासाठी धडपडणाऱ्या एका आधारवडाचा अंत आहे. त्यांनी दिलेल्या योगदानामुळे अनेक बेघर, निराधार जीवांना जगण्याची नवी दिशा मिळाली… त्यांचे हे ऋण कधीही फेडता येणार नाही.
त्यांच्या जाण्याने मन सुन्न झाले आहे… शब्दही थांबले आहेत…
उद्या सकाळी 11 वाजता जुनी वस्ती येथील त्यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघेल.
🙏 ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो… आणि कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो…
💐 भावपूर्ण श्रद्धांजली…

📌Happy Birthday Ushatai 💐उषाताई आज तुझा वाढदिवस, खरं तर 10 एप्रिल 2022 रोजी तुला जेव्हा मानसिक अवस्थेत आश्रम मध्ये दाखल ...
08/03/2026

📌Happy Birthday Ushatai 💐
उषाताई आज तुझा वाढदिवस, खरं तर 10 एप्रिल 2022 रोजी तुला जेव्हा मानसिक अवस्थेत आश्रम मध्ये दाखल केले तेव्हा कुठेही वाटले नव्हते कि तू इतकी बरी होशील.
पण आज उषाताई तू त्या मानसिक पणाला दूर सारून संपूर्ण आश्रम मधील आजी आजोबांमध्ये प्रेम, आपुलकी रुजविण्याचे काम करीत आहे. उषाताई तू उच्चशिक्षित असुन सुसंस्कृत सुद्धा आहे. माझ्या आई पेक्षा तू 3 वर्षांनी मोठी आहे. आणि त्यामुळे देवाने सुद्धा माझ्या सामाजिक कार्यात भर घालण्याकरिता तुझ्या रूपाने एक हक्काची ताई पाठविली आहे.
ताई तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आजच्या महिला दिनी तुला, तुझ्या कार्याला, तुझ्या कर्तुत्वाला माझा सलाम.

📌 आरोग्य जाणीव आणि पर्यावरण जाणीव जागृत करणे तसेच स्त्री मुक्तीची मशाल म्हणून तब्बल 70 दिवसांचा सायकलने प्रवास करून केरळ...
08/03/2026

📌 आरोग्य जाणीव आणि पर्यावरण जाणीव जागृत करणे तसेच स्त्री मुक्तीची मशाल म्हणून तब्बल 70 दिवसांचा सायकलने प्रवास करून केरळ पासून नागपूर पर्यंत चे अंतर पार करणाऱ्या प्रणाली ताई यांनी आश्रम ला भेट दिली.
आज नागपूर येथे सदर सायकल प्रवासाची सांगता होणार आहे. प्रणाली यांनी समाजशास्त्र विषयात पदवी मिळविली असुन त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सायकल नी 25000 km अंतर आज पर्यंत पार केले.
प्रणाली आपणास समोरील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 💐

💐💐💐भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐 भीमाबाई गेल्या...!😞परमात्मा एक चे संस्थापक पूज्यनीय जुमदेव बाबांच्या पुतणी असलेल्या भीमाबाई ...
06/03/2026

💐💐💐भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐
भीमाबाई गेल्या...!😞
परमात्मा एक चे संस्थापक पूज्यनीय जुमदेव बाबांच्या पुतणी असलेल्या भीमाबाई चिचघरे यांचे आज दुपारी 5:15 वाजता साथ फाऊंडेशन द्वारा संचालित स्व.भैय्याजी गुर्जर पुनर्जन्म आश्रम येथे निधन झाले.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
📌आश्रम मध्ये भीमाबाईचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत.

📌आज मध्यरात्री 1:20 वाजता कोंढाळी पोलीस स्टेशन हद्दीत बेघर अवस्थेत आढळलेल्या मुन्नासिंग राजपूत यांना आश्रम मध्ये दाखल कर...
14/02/2026

📌आज मध्यरात्री 1:20 वाजता कोंढाळी पोलीस स्टेशन हद्दीत बेघर अवस्थेत आढळलेल्या मुन्नासिंग राजपूत यांना आश्रम मध्ये दाखल करून घेतले. निच्छितच सदर बेघर व्यक्तीच्या परिवाराची लवकरात लवकर माहिती काढून त्यांना स्वगृही पाठविण्यासाठी साथ फाऊंडेशन प्रयत्न करेल.

Address

Punarjanma Aashram, Old Town, Butibori

Opening Hours

Monday 10:00 - 18:00
Tuesday 10:00 - 18:00
Wednesday 10:00 - 18:00
Thursday 10:00 - 18:00
Friday 10:00 - 18:00
Saturday 10:00 - 18:00
Sunday 10:00 - 18:00

Telephone

+917249090906

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saath Foundation साथ फाउंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Saath Foundation साथ फाउंडेशन:

  • Want your organization to be the top-listed Non Profit Organization?

Share