04/09/2025
आज पिंप्री खंदारे गावात श्री. एकनाथ वाघ, चिखला यांची हार्वर्ड विद्यापीठ, अमेरिका येथे निवड झाल्यामुळे पिंप्री खंदारे गावाकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एकनाथ वाघ यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला आणि त्यांनी गावकऱ्यांना आश्वासित केले कि *एकलव्य इंडिया, फाउंडेशन* च्या माध्यमातून पुढील काळात आपल्या भागातील विद्यार्थ्यांना परदेशी शिकायला जाण्याकरिता फाउंडेशन च्या माध्यमातून संपूर्ण मदत व मार्गदर्शन करण्यात येईल. एकलव्य पूर्ण ताकदीनीशी त्यांच्या पाठीमागे उभं राहील. यावेळी एकनाथचा सत्कार करण्यात आला.
त्यावेळी श्री. प्रल्हाद ढाकणे (माजी सरपंच), श्री. भास्कर चौधर (माजी उपसरपंच), शिवाजी उगलमूगले सर (शिक्षक), प्रदिप पवार (एकलव्य फाउंडेशन), मधुकर ढाकणे, प्रल्हाद घुगे, किसन मुंढे, प्रभाकर चौधर (माजी पोलीस पाटील), शिवहारी ढाकणे,राजू आघाव, प्रभाकर बोरकर, रामदास सानप, परमेश्वर उगलमूगले, सचिन चौधर, ऋषिकेश सानप, सिद्धेश्वर हजबे, सुनिल ढाकणे (एकलव्य इंडिया फाउंडेशन),आशिष हजबे,शिवकुमार उगलमूगले, आदिनाथ कायंदे व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.