SAKAR

SAKAR SAKAR is a NGO, which is committed towards the cause of making the world a better place to live in for the orphans.

You don’t have my flesh & bones

You haven’t received my blood and cells

I haven’t grown you in my womb,

But still O’dear,

Your Place is reserved in my heart

My child you are mine and no one Else’s

On one hand there are these unfledged, cherubic little ones, fighting for subsistence on the planet, longing for a loving family and on the other hand some poignant parents, deprived of parenthood

or some parents eager to shoulder social responsibility towards these Children…. What if both hands embrace, their entire life will be rapturous. SAKAR as a unifying entity builds a bridge of relationship by bringing these two sets of people together. With this thought we can say, that one can experience the joys becoming parents without giving birth to Child. The decision of adopting a Child is emotional but should be based on… thought process. The baby must be adopted from a registered, Government Recognized, Licensed Child Care Institute only. SAKAR is one such registered Government Recognized and Licensed voluntary organization based in Aurangabad. Recently SAKAR has also been recognized as Specialized Adoption Agency (SAA) by the Government. SAKAR is committed towards the cause of making the world a better place to live in, for the orphans whom we call “The Blessed Ones” by finding loving homes for them.

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही जॉन्सन  अँड जॉन्सन (Johnson and Johnson) कंपनीच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी साकार संस्थेला सदिच...
15/12/2025

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson and Johnson) कंपनीच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी साकार संस्थेला सदिच्छा भेट दिली. या भेटीत श्री. आर. एफ. चव्हाण (Union President), श्री. तरुण कुमार (Training Department Head & Credo Champion), श्री. नितीन बेंडके (Executive) तसेच श्री. अभिजित विधाते यांची उपस्थिती होती.

या भेटी दरम्यान साकार संस्थेच्या कार्याची माहिती घेतली, तसेच संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या बालकल्याण, दत्तक प्रक्रिया व पुनर्वसन विषयक उपक्रमांची सविस्तर चर्चा केली . “मदतीचा एक हात” या भावनेतून कंपनीकडून संस्थेला विविध उपयुक्त साहित्य स्वरूपात सहकार्य करण्यात आले. यामध्ये व्हॅक्यूम क्लिनर (Vacuum Cleaner), मायक्रोवेव्ह ओव्हन (Microwave Oven), फूड प्रोसेसर (Food Processor) तसेच डायपर (Diaper – M Size) या वस्तूंचा समावेश होता.

या प्रसंगी साकार संस्थेच्या अध्यक्षा मा. डॉ. नीलिमा पांडे मॅडम यांनी संस्थेच्या ध्येय-धोरणांसह आजवर राबविण्यात आलेल्या कार्याचा सविस्तर माहिती दिली. तसेच संस्थेच्या सचिव सौ. सुचित्रा देशपांडे मॅडम यांनी दैनंदिन कार्यपद्धती, कर्मचारी सहभाग व भावी उपक्रमांविषयी माहिती दिली.

पदाधिकाऱ्यांनी साकार संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक करत, भविष्यात सहकार्याच्या शक्यतांबाबत सकारात्मक चर्चा केली.

या भेटीदरम्यान साकार संस्थेचे कर्मचारी श्री. अभिजित घोडके, श्री. ज्ञानेश्वर डोंगरे व श्री. भीमराव नरोटे उपस्थित होते.

*ममत्व जपणाऱ्या माता*                   आज जगभर mother 's day साजरा होतोय... मातृत्वाचा  आदर ही तर आपली संस्कृतीच आहे.. ...
10/05/2025

*ममत्व जपणाऱ्या माता*
आज जगभर mother 's day साजरा होतोय... मातृत्वाचा आदर ही तर आपली संस्कृतीच आहे.. मातृदेवो भव! अस आपण म्हणतो.
पण तिला देवत्व देण्या पेक्षा आताच्या पिढीला "आई" ला माणूस म्हणून जपण्याची,तिच्या भावनांचा आदर करण्याची कल्पना जास्त भावते..
म्हणूनच ही mother's day ची परदेशी प्रथा आपल्या कडे ही रूढ होताना दिसते आहे.. एक पाऊल पुढे जाऊन,"आई" या व्यक्ती पेक्षा आईपणाचा किंवा वात्सल्य भावनेच्या कृतज्ञतेचा, सन्मानाचा हा दिवस व्हावा असं वाटतं...
कारण आपल्याच कुटुंबातली इतरही नाती ह्या ममत्वा ची जबाबदारी पेलत असतात, यात वडील भाऊ-बहीण यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
पण जन्मतःच कुटुंबा विरहित वाढत असलेली तान्हुली मात्र याला अपवाद असली तरी त्यांच्या जीवनात दोन मातांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
एक जन्मदाती आणि दुसरी पोषणकर्ती!जन्मदात्री आई किंवा जन्मदात्या पित्या सारखीच माया करणाऱ्या नंद आणि यशोदे ची थोरवी ही तेवढीच आहे ना ! ह्या दोन्ही हि मातांशिवाय अगदी पोटच्या पोरा प्रमाणे सांभाळ करणारी,बाळांना वात्सल्याने भरविणारी, त्याचे कोड कौतुक करणारी आणि त्याला शिस्तीत वाढवून वळण लावणारी तिसरी माता म्हणजे आमच्या "सदन माता!
असे मानले जाते की आई हे देवरूप आहे. देवाला प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहता येत नाही म्हणून त्यांनी आईची निर्मिती केली.
आमच्या आया ह्या देवरूपच आहेत.
स्वतःची कौटुंबिक जबाबदारी पार पाडत, अगदी नुकत्याच जन्मलेल्या तान्हु ल्यांपासून तर सहा वर्षे वयापर्यंतच्या बालकांचे अगदी आत्मीयतेने संगोपन करणाऱ्या ह्या माता धन्य होय!
विविध आरोग्य लाभलेल्या, संख्येने मोठ्या असलेल्या बालकांची, काळजी आणि त्यांचे संरक्षण याची धुरा सांभाळत असलेल्या या मातांना प्रसंगी त्यांच्या वैयक्तिक सुख सोयींचा त्याग तर करावा लागतोच.
पण संकट काळी प्रसंगावधान राखून बालकांचे स्वास्थ सांभाळण्याची पराकाष्ठा ही करावी लागते.
शिवाय कुटुंबासमान वातावरण संस्थेत निर्माण करताना बालकांच्या त्या "आई" तर असतातच पण वडील भाऊ बहीण ह्या सुद्धा भूमिका त्याच निभावत असतात.
म्हणून शिशु संगोपन गृहाच्या त्या आद्यकर्त्या, आधारस्तंभ आणि निराधार निरपराध बालकांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे कार्य करणाऱ्या "महान माता" ही असतात. आजच्या मातृदिनाच्या दिवशी अशा सगळ्या सदन मातांना सन्मानपूर्वक त्रिवार वंदन ! आणि त्यांच्यातील माणूस पणाला सलाम!🙏🏼🫡

कृपया या कार्यक्रमास आपण अवश्य यावे ही नम्र विनंतीसाकार परिवार
05/04/2025

कृपया या कार्यक्रमास आपण अवश्य यावे ही नम्र विनंती
साकार परिवार

01/03/2025

This is our 6th blog under the Manthan Project where we seek to address common issues, misconceptions, myths related to adoption through our blogs. These blogs are thoughtfully curated based on our experience of decades, doubts from parents or general public or sometimes even the adopted kids once they grow up and have questions.
Our team of well qualified experts share their valuable insights through these blogs and we hope you find them useful as well.
Your suggestions, queries, doubts are most welcome. Do reach out to us in case you want us to address them in our upcoming blogs or live sessions which we announce on our page as well as the special WhatsApp group.

Here is the link to our latest blog which addresses the doubt of adoptive parents as to how to deal with the entire adoption process, what needs to be dealt with and how etc. These questions are addressed in a series of blogs which you will find on our page.

https://sakar-manthan.blogspot.com/2025/01/all-advice-in-world-will-never-help-you.html

27/01/2025

मंथन म्हणजे नेमके काय? शास्त्रीय परिभाषेत "अभ्यासातून, विचार प्रक्रियेतून जे प्रतिबिंबित होते, ते मंथन". बाळ दत्तक...

🌟 Together for Tomorrow: GeBBS CSR Connect 🌟 On January 7, 2025, GeBBS Healthcare Solutions India hosted Together for To...
11/01/2025

🌟 Together for Tomorrow: GeBBS CSR Connect 🌟
On January 7, 2025, GeBBS Healthcare Solutions India hosted Together for Tomorrow: GeBBS CSR Connect', a remarkable program uniting changemakers with a shared vision of creating a lasting impact.
Representatives from SAKAR, through its project KSH*TIJ, were honored to participate.
The event was a platform for GeBBS' CSR partners and NGOs to showcase their work, interventions, and accomplishments during FY 2024-25.
SAKAR introduced its mission and showcased the achievements of KSH*TIJ under its partnership with GeBBS.
SAKAR was recognized and felicitated with a token of appreciation for its outstanding contributions in the past three quarters.
💙Thank you, GeBBS Healthcare Solutions India for fostering such impactful partnership and supporting meaningful initiatives.

डॉ.रवींद्र कोल्हे आणि स्मिताताई कोल्हे म्हणजे मेळघाटातील आदिवासींच्या दृष्टीने मानवाच्या सगळ्याच समस्यांवर उपाय,नव्हे उप...
24/11/2024

डॉ.रवींद्र कोल्हे आणि स्मिताताई कोल्हे म्हणजे मेळघाटातील आदिवासींच्या दृष्टीने मानवाच्या सगळ्याच समस्यांवर उपाय,नव्हे उपचार करणारे डॉक्टर!
अतिशय दुर्गम भागात ,जिथे आरोग्यसेवा च नाही,साधा रस्ताच नाही,तिथे दुसऱ्या काय सुविधा पोहोचणार, तिथे आरोग्य सेवा सुरू करण्याच्या ध्येयाने,प्रेरित होऊन गेलेले हे डॉक्टर दाम्पत्य किमान म्हणजे एक रुपया एवढीच रुग्णांकडून फी घेऊन,नानाविध रुग्णांवर उपचार करतात,अत्यंत बिकट परिस्थितीतून त्यांना वाचवतात.
त्याच प्रमाणे मेळघाटचा कुपोषणाच्या प्रश्नाचे शास्त्रीय विश्लेषण करून त्यावर मात केली जाते.
एवढेच नाही,तर शेती पशुपालन,भौतिक सुविधा,शिक्षण या क्षेत्रात तर अगदी पायापासून कळसा पर्यंत ज्यांची कामगिरी आहे .जिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाहीत,अंधश्रद्धापूरक, पशू बळी,या सारख्या प्रथा महतप्रयासाने बंद पाडल्या जातात.
महिला सक्षमीकरणाचे मोलाचे काम होते आणि हे सर्व घडवून आणताना,जिवावर बेतलेला संघर्ष ज्यांना सोसावा लागतो,तरीही ते मागे ढळत नाहीत, अश्या थोर व्यक्ती, सामाजिक संत, डॉ. रवी आणि डॉ. स्मिताताई जेंव्हा आमच्या छोट्याशा संस्थेस भेट देतात,त्यावेळी बोल उठतात,"साधुसंत येती घरा, तोची दिवाळी दसरा"!
सामाजकार्य क्षेत्रात उत्तुंग शिखर गाठणारे आणि राष्ट्रपती पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ.रवींद्र कोल्हे आणि स्मिताताई कोल्हे,यांना सहृदय मानाचा मुजरा 👏👏

*"आईपण"भावना आहे!gender नक्कीच नाही* अजून एक आमची आठवण! ही पण २०१५ पूर्वीची, म्हणजे ऑनलाईन प्रक्रिया सुरू होण्या पूर्वीच...
23/11/2024

*"आईपण"भावना आहे!gender नक्कीच नाही*

अजून एक आमची आठवण!
ही पण २०१५ पूर्वीची, म्हणजे ऑनलाईन प्रक्रिया सुरू होण्या पूर्वीची!
बेंगुरुळू येथील एक सद्गृहस्थ संस्थेच्या कार्यालयात आले, आणि म्हणाले, "मला रजिस्ट्रेशन करायचे आहे." समाजकार्यकर्त्यां ने त्यांना सांगितले की, "पण तुम्हाला दोघांना यावे लागेल", तुमच्या पत्नीला पण घेऊन या".
ते म्हणाले," मी सिंगल आहे, आणि मला बाळ दत्तक घ्यायचे आहे."
त्यांच्या या वाक्याने अवाक व्हायला झाले.
कायदा माहीत होता की एकल पालक पण दत्तक घेऊ शकतात.
पण आज पर्यंत कुणी सिंगल पुरुषाने दत्तका पालकासाठी नोंदणी केली नव्हती.
मग त्यांना सांगितले की, "तुम्हाला male child घ्यावे लागेल ," ते , "हो" म्हणाले.
त्यानंतर त्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण तर केली, पण शेवट पर्यंत धाकधूक मात्र होती.
ह्यांना जमेल ना?
आज हो म्हणतायेत, पण पुढे बाळाचे सर्व नीट करतील ना?
पण त्यांचे मनोगत वाचल्यावर तुम्हालाही कळेल, "आईपण" ही भावना आहे "gender" नाही.
वाचा त्यांचे मनोगत.👇

SAKAR

I'm so glad that the law changed in 2015 which allowed me to become a single parent of a 4 month old bundle of joy.
It was destiny that brought us together because he resembles me a lot.
The first 18-20 months were constantly together bonding with each other.
My support system is absolutely fantastic, they are always there for both of us.
He's such a people person who makes friends easily from 5-70 years of age.
He's a very active child who's constantly doing something or another.
He loves drawing, colouring etc and recently has developed interest in reading too.
I don't remember how life was before him.
He's very very loving with me and everyone else in his life.
He can be the cause of my stress at times..as kids his age typically are.
Now my focus is entirely about his education,
quality of life and future.
These are his formative years which will determine the kind of adult he'll grow up to be.
An Adopted Father.

Address

Aurangabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when SAKAR posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to SAKAR:

Share